भारताचा तांदूळ खुपतोय डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळ्यात, थेट बैठकीत केले मोठे विधान, म्हणाले, भारत…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतीय वस्तूंच्या मागे हात धरून लागले आहेत. प्रत्येक गोष्टीवर त्यांना टॅरिफ लावायचा आहे. त्यामध्येच आता भारताच्या तांदळावर मोठा टॅरिफ लावण्याचा तयारीत ते आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुतिन यांच्या भारत दाैऱ्यानंतर बैचेन झाल्याचे बघायला मिळतंय. आता त्यांनी थेट भारताच्या तांदळावर अतिरिक्त टॅरिफ लादण्याचे संकेत दिले आहेत. तशी बैठकही नुकताच पार पडली. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील एका बैठकीत अमेरिकन शेतकऱ्यांसाठी 12 अब्ज डॉलर्सच्या नवीन मदतीची घोषणा केली. मात्र, यावेळी त्यांनी विदेशातून अमेरिकेत आयात होणाऱ्या तांदळाविषयी भाष्य केले. केनेडी राईस मिल्स आणि 4 सिस्टर्स राईसच्या संस्थापक सीईओ, तांदळाच्या व्यापारी मेरिल केनेडी यांनी त्यांना तांदळाच्या किंमती घसरल्याबद्दल सांगितले होते. आयात देशांतर्गत उत्पादकांसमोर आव्हान निर्माण करत आहे. यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांचे नुकसान होतंय. बाहेरील स्वस्त तांदळामुळे अमेरिकन तांदळाला मार्केट राहिले नाही.
यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांना एक यादी देण्यात आली, ज्यामध्ये अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आयात होणाऱ्या देशांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. या यादीमध्ये भारताच्या नावाचाही समावेश आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात तांदूळ निर्यात केला जातो. भारतासोबतच थायलंड आणि चीनचेही नाव यादीत आहे. यामुळे पुढील काही दिवस अमेरिका तांदळावर मोठा टॅरिफ लावू शकते. भारताचा तांदळाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी भाष्य केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांना विचारले की, मला भारताबद्दल सांगा… भारताला हे करण्याची परवानगी का आहे? त्यांना टॅरिफ भरावे लागतात, त्यांना तांदळावर सूट आहे का?… त्यावर उत्तर देताना ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंटने म्हटले की, नाही, सर… आम्ही अजूनही त्यांच्या व्यापार करारावर काम करत आहोत, म्हणून…
यादरम्यान मध्येच बोलत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, हो, पण सोडून देऊ नये… म्हणजे, मी ते इतरांकडून ऐकले आहे. तुम्ही ते करू शकत नाही… आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले की, भारताच्या तांदळावर टॅरिफ लागण्याचे स्पष्ट संकेत आहेत. अमेरिकेने काही गोष्टींवरील टॅरिफमध्ये भारताला सवलत दिली. मात्र, आता हळूहळू करून प्रत्येक गोष्टीवर अमेरिका टॅरिफ लावत आहे.
