ट्रम्प यांना भेटले डुप्लिकेट पुतिन? त्या चर्चांमुळे एकच खळबळ, दावा तरी काय?

Donald Trump-Vladimir Putin : अलास्का येथील ट्रम्प आणि पुतिन यांच्या बैठकीकडे जगाचे लक्ष लागले होते. पण या बैठकीची आणखी एक विचित्र दावा समोर येत आहे. त्यात अनेक जण ट्रम्प हे नकली व्लादिमीर पुतिन यांना भेटल्याचा दावा करत आहेत.

ट्रम्प यांना भेटले डुप्लिकेट पुतिन? त्या चर्चांमुळे एकच खळबळ, दावा तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प,व्लादिमीर पुतिन
| Updated on: Aug 17, 2025 | 4:28 PM

15 ऑगस्ट रोजी अलास्का येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. ही बैठक निष्फळ ठरली. पण या दरम्यान एक विचित्र दावा समोर येत आहे. त्यानुसार, ट्रम्प यांना नकली पुतिन भेटले. पुतिन यांचे बॉडीडब्बल, हुबेहुब दिसणारी माणसं आहेत. त्यावरून इंटरनेटवर धुमशान सुरू आहे. त्यानुसार, जे पुतिन ट्रम्प यांना भेटले ते खरे नाहीत. अर्थात याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

का होतेय तशी चर्चा?

आता ही चर्चा का होत आहे, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. तर पुतिन यांचे चालणे-बोलणे आणि फिटनेस यावरून हा अंदाज काही जण लावत आहेत. सोशल मीडियावर याविषयीची चर्चा सुरू आहे. काहींच्या मते पुतिन यांच्या चेहऱ्यांची ठेवण आणि अलास्कात आलेले पुतिन यांच्या चेहऱ्यात कमालीचा बदल होता. त्यांची चाल, वागणं यातही फरक जाणवत होता. पुतिन हे ट्रम्प यांना भेटताना कमालीचे उत्सुक दिसले. पण मुळात ते सामाजिक भान बाळगणारे आहेत. ते चेहऱ्यावर आनंद येऊ देत नाहीत. पुतिन यांचे अनेक बॉडी डबल असल्याचा दावा सुद्धा करण्यात येतो.

अरे हे तर हसमुख पुतिन

एका युझर्सने लिहिले आहे की, हे खरं पुतिन नाहीच पण त्यांनी यावेळी जो डुप्लिकेट व्यक्ती पाठवला, तो ही अगदी मिळता जुळता पाठवला नाही, तो पुतिन नसल्याचे दिसून येते. उलट यावेळी रशियाने हसमुख पुतिन पाठवला आहे. उत्तर कोरियात किम जोग यांना भेटण्यासाठी आणि काही छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी अशा नकली व्यक्ती पाठवण्यात येतात असे त्याचे म्हणणे आहे.

काय सांगते हाताची हालचाल

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे चालताना एका लयबद्ध रुपात चालतात. त्यांच्या चालीचा एक ढब आहे. त्यात ते उजवा हात स्थिर ठेवतात तर डावा हात हवेत झोके घेतो. जास्त हलतो. पण या वेळी ट्रम्प यांना भेटायला जे पुतिन आले, त्यांच्या हालचाली या संशयाला बळ देणाऱ्या होत्या. त्यांची देहबोली सामान्य पुतिनसारखी नव्हती. तसेच हे पुतिन खूपच आनंदी दिसत होते. या गोष्टी संशयाला जागा निर्माण करणाऱ्या असल्याचे युझर्सचे म्हणणे आहे.