तिसऱ्या महायु्द्धाकडे वाटचाल? कालची बैठक फिस्टकल्याचे जगात काय होणार परिणाम?
Vladimir Putin-Donald Trump Meeting : फेब्रुवारी 2022 पासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची बैठक झाली. काय होणार त्याचे जगावर परिणाम?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी मोठे वक्तव्य केले. काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांनी बैठक घेतली. 3 तास दोन्ही जागतिक नेत्यांमध्ये चर्चा झाली. फेब्रुवारी 2022 पासून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. ही बैठक निष्फळ ठरल्याचे वृत्त काल आले होते. त्यामुळे जगाची चिंता वाढली होती. पण पुतिन यांच्या वक्तव्याने आता शांततेच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची शक्यता आहे. अलास्का यात्रा उपयोगी ठरली. मॉस्को शांततेसाठी एक पाऊल पुढे टाकेल असे वक्तव्य पुतिन यांनी केले. पण युक्रेन मुद्दावर तोडगा न निघल्याने पुढे काय होणार हा प्रश्न कायम आहे.
युद्ध लवकर संपवण्याचा आदर
“दीर्घकाळापासून या मुद्दावर याप्रकारची थेट चर्चा झाली नव्हती. आमचा रोख शांततेत मांडता आला. युक्रेनसोबतचे युद्ध लवकरात लवकर संपवण्याचे अमेरिकन प्रशासनाच्या विचारांचा आणि प्रयत्नांचा आम्ही सन्मान करतो. असा आमचा पण विचार आहे. यासर्व मुद्दांवर शांततेने तोडगा निघावा हे आमचेही धोरण आहे.” असे पुतिन यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.
महत्त्वपूर्ण फैसल्याच्या जवळ
अत्यंत स्पष्ट, महत्त्वपूर्ण फैसल्याच्या जवळ आम्ही पोहचल्याचे पुतिन यांनी स्पष्ट केले. वृत्त संस्था एएफपीने याविषयीची माहिती दिली. अलास्कामध्ये शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांची बैठक झाली होती. फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर रशियाने हल्ला केला होता. आता तीन वर्षांनी शुक्रवारी दोन्ही नेत्यांमध्ये 3 तास चर्चा झाली.
आता सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोदिमीर जेलेन्स्की सोमवारी वॉशिग्टन येथे जाणार आहे. जेलेन्स्की यांच्यावर रशियासोबतचे युद्ध थांबवण्यासाठी दबाव असेल. त्यांना हे युद्ध थांबवण्यासाठी सहमती द्यावी लागण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प जेलेन्स्की यांच्यासमोर काय प्रस्ताव ठेवता त्यावर या युद्धाचे भविष्य अवलंबून आहे. जर ही चर्चा फिस्कटली तर तीन वर्षांपासून सुरु असलेल्या या युद्धाचे ढग गडद होण्याची भीती सुद्धा व्यक्त होत आहे. युक्रेन गेल्या तीन वर्षांपासून दोस्त राष्ट्रांच्या मदतीने रशियाची चिवट लढा देत आहे. रशियातील अनेक शहरांना युक्रेनने लक्ष्य केले आहे.
