AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भेट पुतिन-ट्रम्प यांची, डंका मात्र भारताचा! खरंच बैठक भारताने केली हायजॅक? ती मोठी अपडेट काय?

Putin-Trump : अलास्का येथे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी ट्रम्प यांची भेट झाली. त्यांच्यात चर्चाही झाली. पण त्यातून काही फलनिष्पत्ती समोर आली नाही. या भेटीवेळी ट्रम्प यांना भारताची आठवण आली. त्यांनी त्यावरून रशियाला डिवचले. काय म्हणाले ट्रम्प?

भेट पुतिन-ट्रम्प यांची, डंका मात्र भारताचा! खरंच बैठक भारताने केली हायजॅक? ती मोठी अपडेट काय?
भारताचीच चर्चा
| Updated on: Aug 16, 2025 | 8:58 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्का येथे बैठक पार पडली. या बैठकीच्या केंद्रस्थानी युक्रेन असेल असे निश्चित मानण्यात येत होते. पण बैठकीपूर्वी आणि नंतरही ट्रम्प यांनी भारताच्या नावाचा जप केला. इतकेच काय पुतिन यांनी सुद्धा भारताच्या नावाचा घोष सुरू केला. त्यामुळे ही बैठक भारताने हायजॅक केल्याची मिश्किल टिप्पणी अधिकारी करू लागले. व्लादिमीर पुतिन म्हणाले की मुद्दा सोडवण्यात भारताची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना भारताचा उल्लेख केला. रशियाने त्यांच्या एक महत्त्वाचा भागीदार, ग्राहक गमावल्याचा टोला त्यांनी रशियाला लगावला.

शुक्रवारी अलास्का येथे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जवळपास तीन तास चर्चा झाली. अर्थातच अगोदरच अंदाज लावल्याप्रमाणे ही बैठक निष्फळ ठरली. या बैठकीतून काहीच हाती लागले नाही. पुतिन हे काही दबले नाही. त्यांनी ट्रम्प यांची शेखी जिरवली. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही नेत्यांमध्ये चांगली बैठक झाल्याचे सांगितले. तर युक्रेन संकटावर कोणताही तोडगा निघाला नसल्याचे ते म्हणाले.

पुतिन यांचा करारा जवाब

पुतिन यांनी अलास्कासाठी निघतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आर्थिक करार करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी रशियाने त्यांचा सर्वात जवळचा मित्र, भारत ग्राहक म्हणून गमावल्याचा टोला लगावला. भारत रशियाकडून जवळपास 40 टक्के इंधन खरेदी करतो. हा मित्र गमावल्याने रशियाचे मोठे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. मग त्यांनी चीनकडे मोर्चा वळवला. चीन सुद्धा रशियाकडून सर्वाधिक इंधन खरेदी करतो असे ते म्हणाले. आता चीनवर जर मी अजून मोठे टॅरिफ लादले तर चीनची आणि रशियाची अवस्था वाईट होईल, असा इशारा त्यांनी दिला.

पण भारताचीच चर्चा

युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. त्यातून काही फलनिष्पत्ती झाली नाही. तर दुसरीकडे या बैठकीपूर्वी आणि बैठकीनंतर पुतिन आणि ट्रम्प यांच्या तोंडी भारताचेच नाव दिसले. दोघांनी भारत हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले. रशियाला वठणीवर आणण्यासाठी ट्रम्प यांनी भारत कार्ड खेळल्याचे बोलले जात आहे. तर रशियाने कुटनीतीसाठी भारताची गरज असल्याचे बोलून दाखवले. त्यामुळे भारताने स्वतंत्र रणनीती आखल्यास अमेरिकेला जेरीस आणता येऊ शकते. काल पंतप्रधानांनी थेट टॅरिफचे नाव घेतले नाही. त्यांनी आता भारत स्वतःची रेषा मोठी करणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा