AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा मोठा झटका, टॅरिफमध्ये आणखी वाढ करणार!

मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारतावर आणखी टॅरिफ लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. रशियामुळे युक्रेनमध्ये किती लोक मरत आहेत, याची भारताला काळजी नाही, असंही ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा मोठा झटका, टॅरिफमध्ये आणखी वाढ करणार!
donald trump
| Updated on: Aug 04, 2025 | 9:21 PM
Share

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या एका घोषणेमुळे भारताला चांगलाच धक्का बसला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचे भारत सरकारकडून विश्लेषण केले जात आहे. ट्रम्प यांचा या निर्णयाने भारताला नेमका काय फटका बसणार आहे? किती कोटींचे नुकसान होऊ शकते? तसेच अमेरिकेने लावलेला हा टॅरिफ कमी कसा करता येऊ शकतो? यावर भारताचा अभ्यास चालू आहे. दरम्यान, एकीकडे ट्रम्प यांच्या 25 टक्के टॅरिफ आकारण्याच्या धक्कादायक निर्णयातून सावरत असताना भारताला ट्रम्प यांनी आणखी एक मोठा धक्का दिला आहे. आम्ही भारतावर आणखी टॅरिफ लावणार आहोत, अशी मोठी आणि धक्कादायक घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.

भारतावर आणखी टॅरिफ लावण्यात येणार

मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारतावर आणखी टॅरिफ लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. रशियामुळे युक्रेनमध्ये किती लोक मरत आहेत, याची भारताला काळजी नाही, असंही ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. भारत केवळ मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करत नाहीये तर खरेदी केलेल्या तेलाचा बहुतेक भाग भारत खुल्या बाजारात नफ्यासाठी विकत आहे, असा मोठा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची ही भूमिका म्हणजे…

तसेच रशियन युद्धयंत्रणेमुळे युक्रेनमध्ये किती लोक मारले जात आहेत, याची भारताला परवा नाही. त्यामुले भारताच्या टॅरिफमध्ये लक्षणीय वाढ करण्यात येणार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची ही भूमिका म्हणजे संपूर्ण भारतासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

भारत नेमकी काय भूमिका घेणार?

दरम्यान, ट्रम्प यांनी केलेल्या पोस्टमध्ये ते भारतावर नेमका आणखी किती टक्के टॅरिफ वाढवणार आहेत, याची सविस्तर माहिती दिलेली नाही. पण रशियाच्या युक्रेनसोबतच्या युद्धविषयक धोरणामुळे आणि या युद्धाबाबत भारताच्या भूमिकेमुळे ट्रम्प यांनी ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता भारत ट्रम्प यांच्या या धोरणावर नेमकी काय भूमिका घेणार? तसेच भारत या आव्हानातून कसा मार्ग काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी