AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explained : डोनाल्ड ट्रम्प भारतावर इतके का चिडलेत? त्यांच्या मनात काय? नाराजीच खरं कारण काय?

US Tariff On India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सध्या काय झालय? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पंतप्रधान मोदी आणि भारताला जवळचा मित्र म्हणणारे ट्रम्प यांनी भारताविरोधातच निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. ते सतत भारताविरोधात भूमिका घेऊन राज्यकर्त्याच्या अडचणी वाढवत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाराजीमागच खरं कारण काय? ते समजून घेऊया.

Explained : डोनाल्ड ट्रम्प भारतावर इतके का चिडलेत? त्यांच्या मनात काय? नाराजीच खरं कारण काय?
ट्रम्प यांनी मोदी सरकारला डिवचले
| Updated on: Aug 01, 2025 | 3:34 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. तूर्तास त्यांनी हा निर्णय आठड्याभरासाठी टाळला आहे. त्यानंतर ट्रम्प भारतीय अर्थव्यवस्थेला डेड म्हणाले. भारत जगातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. त्याच्याबद्दल ट्रम्प यांनी असे शब्द वापरले. स्वत:ला कधी भारताचा विश्वासू मित्र म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना काय झालय?. भारतावर इतकं नाराज होण्याचं कारण काय? भारतावर ते इतके का चिडलेत?.

भारत आणि अमेरिकेमध्ये 800 कोटीचा कृषी व्यापार होतो. भारत मुख्यत्वे अमेरिकेला तांदूळ, झींगा मासा, मध, वनस्पतीअर्क असलेलं एरंडेल तेल आणि काळी मिरी निर्यात करतो. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिवच्या रिपोर्टनुसार, भारत अमेरिकेच्या कृषि उत्पादनांवर सरासरी 37.7 टक्के टॅरिफ लावतो. अमेरिकेत याच भारताच्या कृषी उत्पादनांवर 5.3% टक्के कर आहे. आता 25 टक्के टॅरिफ लावल्यानंतर ट्रम्प यांनी भारताची इकोनॉमी डेड झाल्याचं म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प पक्के बिझनेसमॅन

पेशाने व्यावसायिक असलेले डोनाल्ड ट्रम्प आपल्याला जे हवं ते मान्य करुन घेण्यासाठी दबावाचा खेळ खेळत आहेत. भारतासोबत ट्रेड डीलवरुन त्यांनी आक्रमक रणनिती अवलंबलीय. म्हणून त्यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्यासह अतिरिक्त दंड वसूल करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानसोबत तेल भंडार विकसित करण्याची बातमी देऊन भारताला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

अमेरिकेला काय हवय?

भारत आणि अमेरिकेमध्ये अजून ट्रेड डील होत नाहीय, त्याचं मुख्य कारण कृषी उत्पादन आहेत. भारताने मका, सोयाबीन, गहू यावरील टॅरिफ कमी करावा, अशी अमेरिकेची इच्छा आहे. पण भारताने त्यांचा हा प्रस्ताव मान्य करण्यास नकार दिला. कारण अमेरिका आपल्या कृषी उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सब्सिडी देतो. भारतीय शेतकरी त्या समोर टिकू शकणार नाहीत. अमेरिकेत शेतकऱ्यांना वर्षाला जवळपास 55 लाख रुपये सब्सिडी मिळते. तेच भारतीय शेतकऱ्यांना फक्त 25 हाजर सब्सिडीपोटी मिळतात. भारतात जेनेटिकली मॉडिफाइड पीकं उदहारणार्थ सोयाबीन आणि मका यांच्या आयातीला विरोध आहे.

अमेरिकेची अजून एक मोठी मागणी काय?

डेअरी उत्पादनांची बाजारपेठे खुली करण्याची अमेरिकेची आणखी एक मोठी मागणी आहे. असं केल्याने कोट्यवधीच्या रोजगारावर संकट येईल असा भारताचा तर्क आहे. स्टेट बँकेच्या एका रिपोर्ट्नुसार, अमेरिकी डेअर प्रोडक्ट्स भारतात आल्याने आपल्या देशात दुग्ध उत्पादनाच्या किंमती 15 टक्क्याने कमी होतील. यामुळे शेतकऱ्यांच वर्षाला 1 लाख कोटीच नुकसान होईल. म्हणून भारत अमेरिकेच्या डेअरी उत्पादनांचा मार्ग रोखत आहे.

भारताची भूमिका काय?

भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा 16 टक्के आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर कृषी क्षेत्रातूनच सर्वात मोठ्या लोकसंख्येला रोजगार मिळतो. म्हणून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतलेल्या कुठल्याही निर्णयाचा व्यापक परिणाम होईल. म्हणून सरकार खूप विचारपूर्वक या मुद्यांवर बोलत आहे. आम्ही आमचं हित डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेणार हे भारताने आधीच स्पष्ट केलय.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.