Oil LPG Update : मोदी सरकारला मानलं, जे देश कोणाला माहित सुद्धा नाहीत तिथून भारत सरकारने आणलं तेल, LPG

Oil LPG Update : मध्य पूर्वेतील युद्धामुळे जगातील अनेक देशांसमोर तेल, गॅस संकट निर्माण झालय. भारतही अपवाद नाहीय. पण मोदी सरकारने ऊर्जा सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जे काम केलय त्याला तोड नाही. जे देश कोणाला माहितही नाहियत, ज्या देशांना कोणी मोजत नाहीय, अशा देशांशी भारत सरकारने संपर्क साधून काम मार्गी लावलय.

Oil LPG Update : मोदी सरकारला मानलं, जे देश कोणाला माहित सुद्धा नाहीत तिथून भारत सरकारने आणलं तेल, LPG
PM Narendra Modi
| Updated on: Apr 04, 2026 | 12:26 PM

सध्या जगातील अनेक देशांमध्ये मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम दिसून येत आहे. कुठे पेट्रोल-डिझेलच्या किंमती प्रचंड वाढवल्या आहेत, तर कुठे लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. काही देशांमध्ये नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करण्याचं आवाहन केलं जात आहे. मिडिल ईस्टच्या या युद्धाने तेल आणि गॅस संकट निर्माण केलय. ज्या जलमार्गावरुन जगातील 20 टक्के तेल वाहतूक होते, त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये इराणकडून हल्ले सुरु आहेत. त्यांनी हा जलमार्ग ठप्प करुन ठेवलाय. या जल मार्गावरुन वाहतुकीसाठी सर्वच देशांना इराणची परवानगी घ्यावी लागत आहे. तेल आणि गॅस संकटाचा भारतामध्ये सुद्धा परिणाम दिसतोय. पण जगातील अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. कारण भारत कूटनिती आणि अन्य मार्गांनी तेल, गॅस पुरवठा बाधित होऊ नये यासाठी पावल उचलली आहेत.

भारत जगातील तिसरा मोठा तेल आयात करणारा देश आहे. भारताचं जवळपास 40 ते 50 टक्के कच्च तेल स्ट्रेट ऑफ हॉर्मुजच्या मार्गाने येतं. जगातील अन्य मोठे देश तेल संकटाने अडचणीत असताना भारत हे सर्व कसं जमवतोय? भारताची स्ट्रॅटजी काय आहे?. भारताने कूटनितीने समस्येवर समाधान शोधताना अगदी छोट्या-छोट्या देशांना आपल्यासोबत घेतलं आहे. ज्या देशांबद्दल फार माहिती नाहीय, अशा देशांना सोबत घेऊन बऱ्याच प्रमाणात भारताने आपल्या समस्येवर मार्ग शोधलाय. मागच्या महिन्याच्या तुलनेत भारतात कच्च तेलं, LPG आणि LNG च्या साठ्यात वाढ झाली आहे असं पेट्रोलियम मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

भारताला वर्षाला किती टन LPG लागतो?

भारत दर दिवसाला 5.5 ते 5.6 मिलियन बॅरल कच्च तेल आयात करतो. युद्ध सुरु होण्याआधी 40 ते 45 टक्के कच्चं तेल हॉर्मुज मार्गे यायचं. भारताला वर्षाला 31 मिलियन टन LPG लागतो. त्यात आपण 60 टक्के गरज आयतीने भागवतो. भारतात आयात होणारा 90 टक्के गॅस हॉर्मुज मार्गेच येतो. नैसर्गिक गॅसची गरज 191 mmscmd आहे. यात 51 टक्के आपण आयात करतो. यात 60 टक्के गॅस मध्य पूर्वेच्या देशांमधून येतो.

भारत तेल, गॅससाठी जगातल्या किती देशांच्या संपर्कात?

सध्या निर्माण झालेल्या संकट स्थितीत भारत LPG आयतीसाठी अमेरिका, रशिया, कॅनडा, नॉर्वे आणि पश्चिम आफ्रिकेतील नायजेरिया, अल्जेरिया, घाना, कांगो आणि अंगोला या देशांच्या संपर्कात आहे. यातील अनेक देशांमधून पुरवठा सुद्धा सुरु झाला आहे. LNG साठी कॅमरुन, इक्वेटोरियल गिनी आणि मोज़ाम्बिक सारख्या देशांशी संपर्क साधला आहे. सौदी अरेबिया आणि UAE हॉर्मुजला बायपास करणाऱ्या पाइप लाइन मार्गे पुरवठा करत आहेत.

 

Follow Us