मोजतबा खामेनेई यांचा अमेरिकेला मोठा दणका, थेट तो दावा, अमेरिकन सैन्याला..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. अमेरिकेकडून होर्मुज खाडीबद्दल मोठा दावा करण्यात आला. त्यातच अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही असे प्रतिउत्तर इराणकडून देण्यात आले. मोजतबा खामेनेई यांनी थेट उत्तर दिले.

मोजतबा खामेनेई यांचा अमेरिकेला मोठा दणका, थेट तो दावा, अमेरिकन सैन्याला..
Mojtaba Khamenei
| Updated on: Sep 28, 2026 | 6:57 PM

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाद काही मिटताना दिसत नाही. इराणने अमेरिकेला युद्धविराम प्रस्ताव दिला. मात्र, तो प्रस्ताव अमेरिकेने फेटाळून लावला. त्यातच आता इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी अत्यंत मोठा दावा केला. अमेरिकन सैन्याला होर्मुजच्या सामुद्रधुनीतून माघार घेण्यास भाग पाडण्यात आले आहे. असा त्यांनी मोठा दावा केला. त्यांनी म्हटले, इराणचे शूर योद्धे आणि होर्मुजचे रक्षक यांच्या हातून झालेल्या पराभवानंतर अरबी समुद्राच्या पलीकडे आगेकूच करण्याचे धाडस अमेरिकेत अजिबात उरले नाही. आता यानंतर अगदी लवकरच अरबी समुद्रातही त्यांची उपस्थिती नष्ट करू. अरबी समुद्रातही ते राहणार नाहीत.

विशेष म्हणजे मोजतबा खामेनेई यांचे हे विधान अशावेळी आले, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझचे थेट नाव बदलून ट्रम्प स्ट्रेट ठेवले. होर्मुज खाडी अमेरिकेचा महत्वाचा भाग असल्याचा मोठा दावा सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जात आहे. मात्र, इराणचेच पूर्णपणे नियंत्रण होर्मुज खाडीवर आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही.

Loading...

यादरम्यानच इराणने अगदी ठामपणे सांगितले की, स्ट्रेट ऑफ होर्मुझवर त्यांचा पूर्ण अधिकार आहे आणि कोणाच्याही विधानांमुळे याच्या स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही. इराणच्या लष्कराचे चीफ ऑफ स्टाफ रिअर ॲडमिरल हबीबोल्लाह सय्यारी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, शत्रुने काहीही विधाने केली तरीही ही वस्तूस्थिती आहे की, होर्मुज खाडीवर फक्त आणि फक्त इराणचे वर्चस्व आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होर्मुज खाडीबद्दल सतत दावा केला जात आहे.

त्यातच मोजतबा खामेनेई यांनी मोठा दावा केला. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाद थांबावा ही जगाची इच्छा आहे. कारण या देशांमधील वाद वाढला की, कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ होते. जागतिक बाजारही अस्थिर होतो. इराण आणि अमेरिका युद्धाच्या झळा जगाला बसत आहेत. भारतातही मोठी महागाई वाढताना दिसली. त्यातच पुन्हा वाद वाढताना दिसतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us