AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोजतबा खामेनेई जिवंत आहेत? इराणच्या राष्ट्रपतींनी सांगितली भेटीची संपूर्ण कहाणी; थेट पुरावेच दिले, म्हणाले…

Mojtaba Khamenei News: अमेरिकी-इस्रायली मीडियाच्या दाव्यांदरम्यान मोजतबा खामेनेईंबाबत इराणकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. यानंतर आता मोठी खळबळ उडाली आहे.

मोजतबा खामेनेई जिवंत आहेत? इराणच्या राष्ट्रपतींनी सांगितली भेटीची संपूर्ण कहाणी; थेट पुरावेच दिले, म्हणाले...
| Updated on: Sep 25, 2026 | 4:15 PM
Share

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबद्दल अनेक चर्चा होत आहेत. याबाबत अमेरिकन आणि इस्रायली माध्यमांमध्ये त्यांच्या प्रकृतीबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः मोजतबा आजारी असल्याचे जाहीर केले आहे. यावर आता न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेल्या इराणी राष्ट्रपतींनी अमेरिकन पत्रकारांना बोलावून मोजतबा यांच्या प्रकृतीची पुष्टी केली आहे.

यावेळी बोलताना इराणचे राष्ट्रपती पेझेश्कियान म्हणाले की, मी महिन्याभरापूर्वी मोजतबा यांना भेटलो. ते पूर्णपणे निरोगी आहेत. मी त्यांच्याशी सुमारे सात तास बोललो. आम्ही दोघेही एकाच ठिकाणी बसलो होतो. आम्ही अधूनमधून चाललोसुद्धा. त्यांच्या शरीराचे सर्व अवयव व्यवस्थित आहेत. त्यांचे हात कापले गेले किंवा इतर काही झाले, हे दावे खरे नाहीत. मी ते स्वतः पाहिले आहे.

ते म्हणाले की, इराणला युद्धासाठी भाग पाडले गेले आहे. आमच्या सर्वोच्च नेत्याची हत्या करण्यात आली. इराण ट्रम्प यांची हत्या घडवून आणू शकतो का, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, तसे नाही. इराण कधीही तसा विचार करत नाही. हे निश्चितपणे अमेरिकेनेच घडवून आणले आहे. अमेरिकेने युद्धात आमचे मोठे नुकसान केले आहे. ते आणखी नुकसान करू शकते, पण इराणची जनता वॉशिंग्टनसमोर शरणागती पत्करणार नाही.

इराणचे दुसरे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर ८ मार्च रोजी मोजतबा यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड झाली आहे. मतदानाचा अधिकार असलेल्या ५० धार्मिक नेत्यांनी मोजतबा यांची निवड केली. सर्वोच्च नेते झाल्यापासून मोजतबा भूमिगत आहेत. अमेरिकी किंवा इस्रायली गुप्तचर यंत्रणांना अद्याप मोजतबा यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र इराणच्या सर्व प्रमुख निर्णयांमध्ये मोजतबा यांचा सहभाग असतो. सोशल मीडियावर त्याच्या नावाने निवेदने जारी केली जात आहेत.

Follow Us
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत,
दिवाळीपूर्वीच काळाचा घाला! शेडची भिंत कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील नेत्याच...
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास तीच खरी दिवाळी! शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ..
Diwali 2026 : भव्य रांगोळी, झगमग रोषणाई... दिवाळी पहाटचा उत्साह; पहा सुंदर व्हिडीओ...
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ