इराण आणि अमेरिका शांततेत इस्रायलचा खोडा, बैरुतवर केला मोठा हल्ला….

इराण आणि अमेरिकेतील शांतता करारावर रविवारी सह्या होणार होत्या. मात्र, इस्रायलने अचानक लेबनॉनची राजधानी बैरुतच्या दाहियावर बॉम्ब हल्ले केल्याने आता पुन्हा एकदा शांतता चर्चा संकटात सापडली आहे.

इराण आणि अमेरिका शांततेत इस्रायलचा खोडा, बैरुतवर केला मोठा हल्ला....
israel attacked
| Updated on: Jun 14, 2026 | 8:58 PM

इराण आणि अमेरिका तसेच इस्रायलमध्ये गेल्या चार महिन्यांपासून संघर्ष सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण जगाच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मात्र, असे असताना इराण आणि अमेरिका दोन्ही देशांत डील शेवटच्या टप्प्यात असताना इस्रायलने यात खोडा घातला आहे. इस्रायलने रविवारी पुन्हा लेबनॉनची राजधानी बैरुतच्या दाहिया प्रांतात मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ लोक जखमी झाले आहेत. बैरुतच्या आकाशात धुराचे मोठाले ढग पाहायला मिळाले आहेत.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्वत: या हल्ल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. आम्ही बैरुतच्या दाहिया भागात हेजबुल्लाह संघटनेच्या अड्ड्यांवर हल्ला केला आहे. इस्रायल आपल्या भूमीवर हल्ले सहन करु शकत नाही. मात्र या हल्ल्याने इराण चवताळला आहे आणि अमेरिकेसोबत सुरु असलेल्या वाटाघाटी बिघडण्याची शक्यता आहे.

एका आठवड्याआधी का झाले?

एका आठवड्याआधी देखील इस्रायलने बैरुतच्या या भागाला लक्ष्य करीत हल्ले केले होते. त्याला उत्तर म्हणून इस्रायलने देखील हल्ला केला होता. म्हणजे हा एकमेकांवरील हल्ल्याचा घटनाक्रम सुरुच आहे. इस्रायल आधी हल्ला करतो नंतर इराण त्याच्यावर पुन्हा हल्ला करतो.

ताजा हल्ला कसा झाला ?

हेजबुल्लाहने उत्तर इस्रायलमध्ये हल्ले केले होते. यासाठी ही प्रत्त्युत्तरादाखल केलेली ही कारवाई आहे, असे इस्रायलचे सैन्य आणि पंतप्रधान नेतान्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.

इराणचे काय वक्तव्य ?

हल्ल्यानंतर लागलीच इराणच्या सैन्याचे कमांडरनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, ‘लेबनॉनमध्ये इस्रायलचा हा अन्याय विना उत्तर राहणार नाही’

इराणचा मोठा इशारा …

याहून मोठी गोष्ट म्हणजे इराणचे शांतता चर्चेत बोलणारे नेते मोहम्मद बाघेर घालीबाफ यांनी सोशल मीडियावर अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की दाहिया वरील या हल्ल्याने सिद्ध केले आहे की अमेरिका एकतर त्याच्या बोलण्यावर ठाम राहाण्याची इच्छाशक्ती बाळगून नाही, वा त्याच्या आता ताकत नाही. इस्रायलला हिरवा झेंडा दाखवून तुम्ही सवलती मिळवू शकत नाही. चांगला पोलिसवाला आणि वाईट पोलिसवाला याचा खेळ आता जुना झाला आहे. जर तुम्ही तुमचा शब्द पूर्ण करु शकत नाही. तर पुढील बोलणी होणे अशक्य आहे. याचा अर्थ इराणने थेट अमेरिकेशी डील होणे आता खूप कठीण असल्याचे म्हटले जात आहे.

 

Follow Us