जगात उडाला हाहाकार! इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पाजवळ अमेरिकेचा हल्ला? इराणी अधिकाऱ्याने..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यामध्येच आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. इराणी अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानंतर जगाची झोप उडाली. अमेरिकेकडून धक्कादायक पाऊल उचलण्यात आल्याचे यावरून दिसतंय.

जगात उडाला हाहाकार! इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पाजवळ अमेरिकेचा हल्ला? इराणी अधिकाऱ्याने..
Bushehr Nuclear Power Plant
| Updated on: Jul 30, 2026 | 9:02 AM

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढला. दोन्ही देश मोठे हल्ले करत आहेत. अमेरिकेच्या जॉर्डन येथील लष्कर तळावर इराणने मोठा हल्ला केला. इराणच्या अनेक भागात मोठे हवाई हल्ले अमेरिकेकडून करण्यात आली. यादरम्यानच आता इराणकडून अत्यंत मोठा आरोप करण्यात आला. एका इराणी अधिकाऱ्याने अमेरिकेवर थेट बुशेर अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हवाई हल्ला केल्याचा आरोप केला. हा मोठा आरोप आहे. बुशेर येथे इराणचा मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. तिथे जवळच अमेरिकेने हल्ला केल्याचा दावा इराणच्या अधिकाऱ्याने केला. इराणच्या या दाव्याने जगाचे टेन्शन वाढले आहे. इराणी सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेकडून हा हल्ला दुपारच्या सुमारास करण्यात आला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणवरील हल्ले थांबवल्याचे जाहीर केल्यानंतर हा हल्ला करण्यात आला.

संघर्ष संपावा, ही जगाची इच्छा असताना हे युद्ध अधिक घातक बनले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात झालेला तात्पुरता युद्धविराम करार देखील धोक्यात आला. दोन्ही बाजूकडून हल्ले केले जात आहेत. सुरुवातीला अमेरिकेने इराणवर नवीन हवाई हल्ले केले. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने पश्चिम आशियातील अमेरिकेच्या मित्रांना टार्गेट केले.

बहरीनमध्ये तीनदा सायरन वाजल्याची माहिती मिळतंय. इराणने कुवेत आणि कतारमध्येही अमेरिकेच्या लष्कर तळावर क्षेपणास्त्रे डागली. जॉर्डनमध्येही सायरन वाजले. जिथे जिथे अमेरिकेचे लष्करतळ आहेत, तिथे मोठे हल्ले इराणकडून केले जात आहेत. अमेरिकेने इराणवरील हल्ले थांबवल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर काही वेळातच हल्ले झाले.

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा परिणाम या दोन देशांपुरता मर्यादित राहत नाही. याचा थेट परिणाम जगावर होतो. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसते. त्यामध्येच अमेरिका पुन्हा एकदा टॅरिफच्या मूडमध्ये आहे. अमेरिकेच्या संसदेत रशियाची आर्थिक बाजू कमकुवत करण्यासाठी विधेयक पास झाला. त्याच्या माध्यमातून रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशावर मोठा टॅरिफ लावला जाणार आहे. त्यात भारत आणि चीन यांच्यासबह अजून काही देशांचा समावेश आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us