Pakistan News: पाकिस्तानात भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा, महिन्याभरात चौथा दहशतवादी यमसदनी

दहशतवादी काशिफ अली युवकांचे ब्रेनवॉश करत होतो. ते जिहादच्या नावावर तरुणांना भडकवून त्यांचा समावेश दहशतवादी संघटनेत करत होता. काशिफ अनेक मशिदी आणि मदरसांचा प्रमुख होता. तो पाकिस्तानमधील युवकांना लष्करमध्ये भरती करुन भारताविरोधात तयार करत होता.

Pakistan News: पाकिस्तानात भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा, महिन्याभरात चौथा दहशतवादी यमसदनी
terrorist
| Updated on: Feb 17, 2025 | 3:47 PM

Pakistan News: पाकिस्तानात भारताच्या शत्रूंना निवडून निवडून ठार मारले जात आहे. अज्ञान मोटरसायकलवर काही लोक येतात आणि भारतात दहशत माजवणाऱ्या दहशतवाद्यांच्या खात्मा करत आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानात अज्ञात मोटरसायकलस्वारांनी एक दहशतवाद्यास यमसदनी पाठवले आहे. खैबर पख्तूनवा भागातील स्वाबी जिल्ह्यात अज्ञात मोटरसायकल स्वरांनी एका अतिरेक्यास संपवले. मौलाना काशिफ अली असे त्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो कुख्यात दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर होता. मोटरसायकलवर आलेल्या बंदुकधाऱ्यांनी मौलाना काशिफ अली याच्यावर अनेक गोळ्या झाडल्या.

कोण आहे काशिफ अली, हाफीज सईदचा मेहुणा

दहशतवादी काशिफ अली युवकांचे ब्रेनवॉश करत होतो. ते जिहादच्या नावावर तरुणांना भडकवून त्यांचा समावेश दहशतवादी संघटनेत करत होता. काशिफ अनेक मशिदी आणि मदरसांचा प्रमुख होता. तो पाकिस्तानमधील युवकांना लष्करमध्ये भरती करुन भारताविरोधात तयार करत होता. तसेच दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रात तो जिहादी लेक्चर देत होता. काशिफ अली दहशतवादी संघटना लष्करची राजकीय संघटना पीएमएमएलसोबत काम करत होता. कुप्रसिद्ध अतिरेकी हाफीज सईद याचा काशिफ अली हा मेहुणा होता.

अतिरेकी संघटनांनी मागणी

दहशतवादी काशिफ अली याच्या हत्येनंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. दहशतवादी संघटनांनी या प्रकरणात पाकिस्तान सरकारवर टीका केली आहे. काशिफ अली याची हत्या करणाऱ्या लोकांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांनी केली आहे. तो पाकिस्तानवर प्रेम करत होतो, हाच त्याचा दोष असल्याचे या दहशतवादी संघटनांनी म्हटले आहे.

महिन्याभरात चौथ्या अतिरेक्यास संपवले,

मागील महिन्याभरात लष्कर ए तैयबाच्या चौथ्या दहशतवाद्याची हत्या झाली आहे. यापूर्वी तीन जणांचा रहस्यम मृत्यू झाला होता. त्यातील दोन अतिरेकी रस्ते अपघातात मारले गेले होते. महिन्यभरात मरणारा काशिफ अली हा चौथा दहशतवादी आहे. काशिफ अली यांच्या हत्येनंतर दहशतवादी संघटनांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांनी पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्करावर टीका केली आहे.