Maharashtra Election News LIVE : राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर
BMC, Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यात एकूण 29 महापालिका आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमध्ये पक्षांतर, फोडाफोडीच राजकारण सुरु आहे.

नाशिकचे दोन माजी महापौर भाजपच्या गळाला लागले आहेत. माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ भाजपात प्रवेश करणारं. काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरे देखील भाजपाच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा. विनायक पांडे ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते, तर शाहू खैरे देखील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. भाजपाचा एकच वेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला धक्का. ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन माजी नगरसेवक भाजपत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मनपा गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा भाजपत प्रवेश. शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही भाजपत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मध्यरात्री हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे. एकीकडे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शरद पवार गटासोबत युती केली असतानाच दुसरीकडे सोलापुरात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन हुकमी एक्के फोडलेत.
LIVE NEWS & UPDATES
-
विदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीसाठी महत्त्वाची बैठक
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर चार महापालिकांबद्दल भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीसाठी महत्त्वाची बैठक भाजपच्या विदर्भ कार्यालयात सुरू झाली आहे. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे तर शिवसेनेकडून उदय सामंत, संजय राठोड आणि आनंद अडसूळ या बैठकीत सहभागी आहेत. ‘विदर्भातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेऊन ती एकनाथ शिंदे यांना कळवण्यासाठी आज मी नागपुरात आलोय.महायुती संदर्भात आम्ही भाजप सोबत चर्चा करून जो प्रस्ताव येईल, तो आम्ही एकनाथ शिंदे यांना कळवू’, असं उदय सामंत म्हणाले…
-
धुळे महानगरपालिकेची निवडणूक महायुतीत लढण्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मानस
धुळे महानगरपालिकेची निवडणूक महायुतीतून लढण्याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मानस आहे. युती झाली नाही तर राष्ट्रवादी थांबणार नाही, असं माजी मंत्री आमदार अनिल पाटील स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क केला आहे. मात्र अद्याप भाजप तर्फे कोणताही प्रतिसाद नाही. आमची युतीसाठी पूर्ण तयारी असून प्रस्ताव आल्यास आम्ही युती करू मात्र युती न झाल्यास राष्ट्रवादी थांबणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
-
-
महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. यात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या बांधकामादरम्यान कार 50 फूट खोल खड्ड्यात पडली. मृतांमध्ये तेलंगणातील कागजनगर येथील रहिवासी असल्याचे वृत्त आहे आणि ते नागपूरहून आर्टिका कारने परतत होते.
-
छत्रपती संभाजी नगर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा आणि शिवसेनेची बैठक
छत्रपती संभाजी नगर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची पुन्हा बैठक पार पडली. पण आजही कुठला निर्णय ना झाल्याने युतीची बैठक निष्फळ ठरली. या बैठकीनंतर मंत्री अतुल सावे यांनी आम्हाला युती करायची आहे, आणि तसे पक्षाचे आदेश आहेत. सकारात्मक चर्चा झाली आणि जे काही बैठकीचे निर्णय होतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना कळवल्यानंतरच युतीचा निर्णय जाहीर केला जाईल. तर भागवत कराड यांनी युती संदर्भात 90 टक्के चर्चा झाली आहे, शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांना काही काम असल्याने ते या बैठकीला येऊ शकले नाही. तर संजय केनेकर यांनी आम्ही ही निवडणूक हिंदू मतदानाची विभागणी होऊ आणि आम्ही ही निवडणूक एमआयएम विरुद्ध लढणार आहोत असे सांगितले. तर भाजपा जिल्ह्याध्यक्ष किशोर शितोळे यांनी पुन्हा एकदा उद्या आम्ही युती संदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले..
-
राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अजित पवारांसह 40 जणांचा समावेश आहे.
१. अजित पवार
२. प्रफुल पटेल
३. सुनील तटकरे
४. हसन मुश्रीफ
५. धनंजय मुंडे
६. नरहरी झिरवाळ
७. बाबासाहेब पाटील
८. मकरंद जाधव-पाटील
९. दत्तात्रय भरणे
१०. अण्णा बनसोडे
११. अदिती तटकरे
१२. इंद्रनील नाईक
१३. धर्मराव आत्राम
१४. अनिल पाटील
१५. संजय बनसोडे
१६. प्रताप पाटील चिखलीकर
१७. नवाब मलिक
१८. सयाजी शिंदे
१९. मुश्ताक अंतुले
२०. समीर भुजबळ
२१. अमोल मिटकरी
२२. सना मलिक
२३. रूपाली चाकणकर
२४. इद्रिस नायकवडी
२५. अनिकेत तटकरे
२६. झिशान सिद्धिकी
२७. राजेंद्र जैन
२८. शरद पाटील
२९. सिद्धार्थ टी. कांबळे
३०. सुरज चव्हाण
३१. लहूजी कानडे
३२. कल्याण आखाडे
३३. सुनील मगरे
३४. नाझेर काझी
३५. महेश शिंदे
३६. राजलक्ष्मी भोसले
३७. सुरेखा ठाकरे
३८. नजीब मुल्ला
३९. प्रतिभा शिंदे
४०. विकास पासलकर
-
-
महापालिका निवडणुकीसंदर्भात नागपुरात शिवसेनेची महत्त्वाची बैठक
महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात शिंदेंच्या शिवसेनेची नागपुरात महत्वपूर्ण बैठक
उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री संजय राठोड, मंत्री आशिष जयस्वाल, उपनेते कृपाल तुमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक
नागपूर, अमरावती,चंद्रपूर आणि अकोला महानगरपालिका निवडणुकी संदर्भात होणार बैठकीत चर्चा
विदर्भातील या चारही शहरातील शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित
-
ब्रम्हपुरी शहर परिसरात डिझेल टँकरने घेतला पेट
ब्रम्हपुरी शहर परिसरात डिझेल टँकरने घेतला पेट
डिझेल टँकरने पेट घेतल्यानं परिसरात भीतीचं वातावरण
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
आगीवर नियंत्रण कोणतीही जीवितहानी नाही
-
अखेर ठरलं! नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युती म्हणून लढणार
नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युती म्हणून लढणार
सूत्रांची माहिती थोड्याच वेळात चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत करणार युतीची घोषणा
आज युतीची घोषणा झाल्यानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार
नागपूरमध्ये भाजप कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त करत असले तरी वरिष्ठ नेते युतीसाठी होते आग्रही
थोड्याच वेळात होणार युतीवर शिक्कामोर्तब
-
पुणे-नाशिक महामार्गावर चाकण जवळ मोठी वाहतूक कोंडी
पुणे-नाशिक महामार्गावर चाकण जवळ मोठी वाहतूक कोंडी
पाच ते सहा किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
ख्रिसमस सुट्टीमुळे पुणे-नाशिक महामार्गावर पर्यटकांची गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडी
पर्यटकांसह वाहनचालकांना तासनतास महामार्गावर ठप्प उभं राहण्याची वेळ
दोन्ही बाजूने पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू
-
संजय राऊत यांनी त्यांच्या दहा कामांची यादी द्यावी – शायना एनसी
संजय राऊत यांनी त्यांच्या दहा कामांची यादी द्यावी, उत्तरं वक्तव्यांत नाही तर प्रत्यक्ष कामांत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी माणसासाठी ठोस विकासकामे सुरू आहेत. बीडीडी चाळ पुनर्विकासात पात्र रहिवाशांना लवकरच घरांचे वाटप होणार असल्याचे शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी म्हटले आहे.
-
वसई – विरार महापालिका निवडणूक ; महायुतीत जागावाटपासाठी जोर बैठका सुरु
वसई – विरार महापालिका निवडणूकीसाठी महायुतीच्या जगावाटपासाठी ३ तासांपासून बैठका सुरू असून अद्यापी तोडगा निघालेला नाही. आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयात भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची दुपारी अडीच वाजल्यापासून बैठक सुरु असून अद्याप तोडगा निघालेला नाही.
-
धुळे महानगरपालिकेच्या अजितदादा गटाच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे. माजी मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे. कार्यालयाचे उद्घाटन करून आजपासून महापालिकेचा प्रचार सुरु करण्यात आला आहे.
-
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची पुन्हा एकदा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपुरात चंद्रपूर मनपातील तिकीतवाटपासंदर्भात चंद्रपूरच्या भाजप नेत्यांची बैठक पुढ्यात असताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी हे स्पष्ट पत्र काढले आहे.
तसेच चैनसुख संचेती यांची चंद्रपूर जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चैनसुख संचेती हे भाजपचे बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार आहेत,
तर माजी खासदार अशोक नेते यांना जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. मात्र विशेष म्हणजे संपूर्ण निवडणूक भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व्हावी असा पत्रात उल्लेख आहे.
-
सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेकडून महापालिकेच्या संपर्क फेरीला सुरुवात
सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेकडून महापालिकेच्या संपर्क फेरीला सुरुवात झाली आहे. सेना भाजप युती होण्यापूर्वीच शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करत संपर्क फेरीला सुरुवात करण्यात आली.
-
ठाण्यातील शिंदे सेनेचे विक्रांत वायचळ शाखाप्रमुख पदावरून निलंबित
ठाण्यातून मोठी अपडेट समोर आली आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवेसेनेकडून ठाण्यातील विक्रांत वायचळ यांना शाखाप्रमुख या पदावरून हटवण्यात आलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून सोशल मीडियावरुन ही माहिती देण्यात आली आहे.
-
व्हीव्हीएमसी पालिकेसाठी जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीची बैठक
वसई विरार महापालिका निवडणुकीचा जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीच्या अंतिम बैठकीला सुरूवात झाली आहे. आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयात एक तासापासून बैठक सुरू आहे. या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे निवडणूक प्रभारी आण माजी आमदार रवींद्र फाटक, बोईसरचे आमदार विलास तरे, जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर, तालुकाप्रमुख सुदेश चौधरी, आमदार स्नेहा दुबे पंडित आणि जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील उपस्थित आहेत. त्यामुळे आता या बैठकीत जागावाटपाबाबत तोडगा निघतो का? याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून आहे.
-
संजय शिरसाट यांची राऊतांवर टीका
काल ठाकरे बंधू युती झाली,त्यांनी असे म्हटले की पोरं पळवणारी टोळी अली आहे, त्यांना भीती आली आहे की त्यांची पोर पळवणार आहे, संजय राऊत म्हणतात शिवसेनेचे पोरं पळवणार, एक दिवसात एकमत नसल्याचे दिसत आहे. आमच्याकडे मनसे जिल्हाध्यक्ष आमच्या पक्षात आला, त्याच्या डोळ्यावर पट्टी नव्हती, युती झाल्याने महाराष्ट्र राजकारण बदल होणार असे नाही.30 वर्ष सत्ता कुणाची होती, म्हणतात मराठी माणसासाठी एकत्र आले.तेव्हा मराठी माणूस कुठे गेला, तुम्ही आता स्वतःच हित पहा आम्ही मराठी माणसासाठी सक्षम आहोत, असा टोला संजय शिरसाट यांनी राऊतांना लगावला.
-
सांगलीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. सांगलीतल्या आमराई क्लब या ठिकाणी आमदार जयंत पाटील,आमदार कदम आणि खासदार विशाल पाटलांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती घेण्यात येत आहेत.महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित करून लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.त्या दृष्टीने आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील एकत्रित पार पडत असून ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्धघाटन
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकसाठी भाजपा प्रचार कार्यालयाचे उदघाटन मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीत होत आहे..आरती आणि रिबीन कापत आणि नारळ फोडून प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात येत आहे
-
आमदार किशोर जोरगेवार यांचा मोठा खुलासा
चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या संदर्भातील भाजपच्या निवडणूक प्रमुख पदावरून स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना हटविल्याच्या मुद्द्यावर स्वतः किशोर जोरगेवार यांनी दिली माहिती, अशा पद्धतीची कुठलीही सूचना पक्षाने दिली नसल्याची केला खुलासा केला आहे. माध्यमाच्या माध्यमातून आज सकाळपासून मला माहिती मिळत आहे,पक्षाची रचना जी मला माहित आहे निवडणूक प्रमुख त्या विधानसभा क्षेत्रातला रहिवासी हा प्रमुख असतो,नेमक्या कोणत्या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे मला काही माहीत नाही त्याची मी आता शहानिशा करेल आणि सायंकाळी तशी बैठकी आहे आणि याबाबतची स्पष्टता होईल.मुनगंटीवार हे मुख्यमंत्री दोन दिवसात अगोदर भेटले काल मीही मुख्यमंत्र्यांशी भेटलो रुटीन भेटलो त्यामध्ये काय बोलणं झालं मला कसे कळणार ते दोन्ही मोठे वरिष्ठ नेते आहे, अशी माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.
-
प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सवाल
आम्ही इमर्जन्सी भोगली आहे तुम्ही ती पाहिलेली नाही.राहुल गांधी हे एपस्टीन मध्ये आपल्या पंतप्रधानांचे फोटो आहेत का याबाबत प्रश्न विचारत नाही.पेगेसीस किंवा इतर विषयात कोणताही विरोधी पक्षातील नेता प्रश्न विचारत नाही. विरोधी पक्षातील नेत्यांना ईडी सीबीआयचा सासेमीरा लावलेला आहे.त्यामुळे कोणताही विरोधी पक्षनेता बोलायला तयार नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
-
तुम्ही किंवा कुटुंब धर्मांतर करणार आहात का?
जे धर्माला पाहून मतदान करतात त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही किंवा कुटुंब धर्मांतर करणार आहात का? तुम्ही जर धर्मांतर करणार नसाल तर मग आरएसएस, बीजेपीचा जो मुद्दा आहे तो खरा आहे का? लोकशाहीला हुकूमशाहीत परवर्तीत करण्याची प्रक्रिया भाजप, आरएसएसनें सुरु केली आहे, असा आरोप वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला.
-
विजयस्तंभ पेरणेफाटा येथील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल
विजयस्तंभ पेरणेफाटा येथील कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्याकरिता ३१ डिसेंबर २०२५ राेजी सकाळी १० वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२६ राेजी रात्री १२ वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्याबाबतचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी आदेश निर्गमित केले आहेत.चाकण ते शिक्रापूर-शिक्रापूर ते चाकण या दोन्ही बाजुकडील वाहतुकीस सर्व प्रकारच्या खाजगी चालकांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. या मार्गावर अनुयायांच्या बसेसना प्रवेश देण्यात येणार आहे. तथापि अनुयायांच्या कार, जीप आदी हलक्या वाहनांना प्रवेश असणार नाही.
-
वसई-विरार महापालिकेत जागावाटपाचा तिढा, शिवसेनेचा ४० जागांवर दावा, तर भाजप ३० जागांवर ठाम
वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील जागावाटपाचा पेच आता थेट मुंबईतील प्रदेश कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जागांच्या संख्येवरून रस्सीखेच सुरू असून, शिवसेनेने ४० जागांची आग्रही मागणी केली आहे. मात्र, भाजप केवळ २५ ते ३० जागा सोडण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक स्तरावर तोडगा न निघाल्याने हा प्रश्न आता वरिष्ठ स्तरावर सोपवण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात होणाऱ्या अंतिम चर्चेनंतरच वसई-विरारमधील जागावाटपाचा तिढा सुटणार आहे. महायुतीमधील या ओढाताणीमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली असून, वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
महापालिकेत शिवशक्ती-भीमशक्तीचा एल्गार! २९ महानगरपालिका निवडणुकीत युती
महाराष्ट्रातील आगामी २९ महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात एक मोठी युती झाली आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत, राज्यातील सर्व २९ महानगरपालिका निवडणुका एकत्रितपणे लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबईसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये ही युती प्रभावीपणे लढणार असून, संभाव्य जागावाटपाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे.
-
शिवसेनेत ४३ वर्ष देऊनही मुलावर अन्याय, विनायक पांडे यांचा उद्धव ठाकरेंची साथ सोडणार, भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय
गेल्या ४३ वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले ज्येष्ठ नेते विनायक पांडे यांनी अखेर पक्षाला जयहिंद करण्याचा निर्णय घेत भाजपची वाट धरली आहे. मागील निवडणुकीत माझ्या मुलाचे तिकीट कापले गेले आणि आताही तीच परिस्थिती आहे. संजय राऊत यांच्याशी बोलूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही,” अशी खंत पांडे यांनी व्यक्त केली आहे. विनायक पांडे यांच्यासह त्यांचे संपूर्ण पॅनल भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेतही मिळत आहेत.
-
मंत्रालयातील पीए आता निवडणूक ड्युटीवर; राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्या १५ डिसेंबर २०२५ च्या आदेशानुसार, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम २९ अंतर्गत मंत्र्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या वैयक्तिक सहाय्यकांची (PA) निवडणूक कामांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक नियमावली २००२ च्या नियम २२ नुसार ही कारवाई करण्यात आली असून, या कर्मचाऱ्यांवर मतदान, मतदार यादी अद्ययावत करणे, मतपत्रिका, मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची ‘सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी’ (APRO) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना निवडणूकविषयक प्रशिक्षणाला उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईतील विविध विभागांमध्ये या नियुक्त्या जाहीर झाल्याने निवडणूक यंत्रणा आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आली आहे.
-
माऊंट मेरी चर्चमध्ये ख्रिसमसचा जल्लोष, प्रभू येशूच्या जन्मोत्सवासाठी वांद्र्यात गर्दी
मुंबईतील ख्रिसमस सेलिब्रेशनचे प्रमुख केंद्र असलेल्या वांद्रे येथील ऐतिहासिक माऊंट मेरी चर्चमध्ये आज ख्रिसमसचा सण अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन साजरा करण्यासाठी आणि विशेष प्रार्थनेसाठी पहाटेपासूनच हजारो भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. चर्चला करण्यात आलेली मनमोहक रोषणाई आणि आकर्षक सजावटीमुळे संपूर्ण परिसरात उत्सवी चैतन्य पसरले आहे. आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेण्यासाठी केवळ ख्रिस्ती बांधवच नव्हे, तर सर्वधर्मीय नागरिक येथे पोहोचत आहेत. प्रेम, दया आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या या सणानिमित्त परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
मीरा-भाईंदरच्या राजकारणात नेक्स्ट जनरेशनची एन्ट्री? नरेंद्र मेहतांचे चिरंजीव तकशील मेहता महापालिका लढवण्यास इच्छुक
मीरा-भाईंदर शहराच्या राजकारणात आता आमदार नरेंद्र मेहता यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबातील पुढची पिढी सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे स्थानिक सामर्थ्यवान नेते आणि आमदार नरेंद्र मेहता यांचे चिरंजीव तकशील नरेंद्र मेहता हे आगामी मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी इच्छुक असल्याची विश्वासार्ह माहिती समोर येत आहे. तकशील मेहता यांनी स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, मेहता समर्थकांमध्ये या निर्णयामुळे मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
-
नाशिकमध्ये युती फिसकटण्याच्या मार्गावर .. !
50 जागा दिल्या तरच युती करणार – शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी असा दावा केला आहे. तर भाजप 38 ते 40 जागा देण्याच्या भूमिकेत आहेत. 50 जागा न मिळाल्यास आमची स्वबळाची तयारी आहे… असं वक्तव्य गोडसे यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून युतीमध्ये जागावा वाटपावरून सुरु रस्सीखेच आहे. आज गिरीश महाजन नाशिक मध्ये युती संदर्भात आढावा घेणार आहेत.
-
शिवसेनेला ७० जागा देणार अशा बातम्या माध्यमात येत असल्याने एकनाथ शिंदेंकडून चिंता व्यक्त
खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा विरोधकांचा कट हाणून पाडा अशा नेत्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार शिवसेना ११२ जागांवर तडजोड करायला तयार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याखालील जागा लढवणार नाही असाही सेना नेत्यांचा निर्धार आहे.. मुंबईत शिवसेनेचा वोटबॅंक , मित्रपक्षाने हे समजून घ्यावं अन्यथा फायदा विरोधकांना होईल , महायुतीच्या बैठकीत शिवसेना नेत्यांचा सूर… अशा माहिती सुत्रांनी दिला आहे.
-
ठाकरेंमुळे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री – संजय राऊत
ठाकरेंमुळे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं आहे.. भाजपने मराठी माणसासाठी काय केलं… असं म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्यानंतर प्रशांत जगताप यांच्यासमोर कार्यकर्त्यांकडून दोन पक्षाचा प्रस्ताव
मशाल किंवा हाताचा पंजा यावर पुढील वाटचाल करावी यासाठी प्रशांत जगताप यांच्याकडे कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे. महापालिका निवडणुकीत प्रशांत जगताप काय निर्णय घेणार याकडे लक्ष मात्र वरिष्ठ स्तराकडून प्रशांत जगताप यांना अनेक पक्षांचे फोन येत आहेत. प्रशांत जगताप यांच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी या दोन्हीपैकी एक पक्षाची निवड करण्याचं विनंती केली.
-
नांदेडच्या जवळा येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
दोन मुलांची रेल्वेखाली आत्महत्या तर आई-वडील आढळले गळफास घेतलेल्या अवस्थेत. आई-वडिलांचा घातपात की आत्महत्या पोलीस तपासून होणार उघड. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा लखे कुटुंबातील दुर्दैवी घटना.
-
प्रशांत जगताप यांच्याबाबत सुप्रिया सुळे यांची थेट प्रतिक्रिया
रात गई बात गई रोज नही सुबह होती है…प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. प्रशांत जगपात यांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार गटाला धक्का.
-
लोणी गावात ट्रक आणि कारचा भीषण अपघात
मंत्री विखे पाटलांनी अपघाताची पाहणी करत प्रशासनाला केल्या मदतीच्या सूचना. काल रात्री 10 वाजेच्या सुमारास लोणी गावात ट्रक आणि कारचा अपघात. अपघातात कारचे मोठे नुकसान.. सुदैवाने जीवितहानी नाही. नेवासा दौऱ्यावरून परतणाऱ्या विखे पाटलांनी अपघातस्थळी ताफा थांबवत घेतला आढावा…
-
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी दोन दिवसात 1 हजार 395 अर्ज विक्री
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी दोन दिवसात 1 हजार 395 अर्ज विक्री, मात्र दाखल एकही नाही. पहिल्या दिवशी 777 अर्जाची विक्री, तर दुसऱ्या दिवशी 618 जणांनी नामनिर्देशन अर्ज विकत घेतले.आज आणि रविवारी अशा दोन सुट्यांमुळे अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना केवळ 4 दिवस शिल्लक. महापालिकेत आतापर्यंत इच्छुक उमेदवारांना 268 ना-हरकत प्रमाणपत्रे वितरित झाली आहेत.
-
जागा वाटपाबाबत शिवसेनेत नारा, पुण्यात शिवसेनेची वरिष्ठ नेत्याची मनमानी
निवडणुकीच्या धामधुमीत ऐका वरिष्ठ नेत्याची घरी झाली बैठक. बैठकीत दोनच वरिष्ठ नेते ,शहर प्रमुख ,महानगर प्रमुख यांना ही या बैठकीतून डावलाल. या दोन वरिष्ठ नेत्यांनी काही जागांवर तीच चर्चा केल्याची माहिती. सर्व नेत्यांना डावल्याने कार्यकर्त्यांचा मोठा उद्रेक शिवसेना कार्यकर्त्यांची भूमिका वेगळे लढण्याच्या तयारीत. वरिष्ठ नेत्यांच्या मनमानीला शिवसैनिक शहर प्रमुख महानगर प्रमुख व इतर नेते कार्यकर्ते वैतागले
-
तुझी भावजय नगरसेवक पदी निवडुन कशी काय आली? असे म्हणत कोयता फिरवत दहशत
बीडच्या नगरपरिषद निवडणुकीत संत नामदेवनगर येथील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आरती बनसोडे या नगरसेवक पदी निवडुन आल्या. निकालानंतर शेजारीच राहणाऱ्या कौशल्य मस्के याने आरती बनसोडे यांचे दीर अजिंक्य बनसोडे यांच्या घरासमोर धारदार कोयता घेऊन जात तुझी भावजय नगरसेवक पदी निवडून कशी काय आली? असा जाब विचारत कोयत्याने दोन दुचाकींची तोडफोड केली आणि कोयता मिरवत दहशत माजवली.
-
बस आणि कंटेनर ट्रकचा अपघात, 17 जणांचा मृत्यू
चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर येथे एक धक्कादायक अपघाताची घटना घडली. बस आणि कंटेनर ट्रकचा अपघात होऊन लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला. बस बंगळूरूहून गोकर्ण येथे जात होती तर कंटेनर ट्रक बंगळूरूला निघाला होता. कंटेनर ट्रक डिव्हायडरला धडकला आणि नंतर बसला धडकल्याने पहाटे हा मोठा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
-
कल्याण पूर्वेत शिवसेना-भाजप पुन्हा आमने सामने
भाजप ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी शिवसेना शिंदे गटावर ‘युतीत पाठीत खंजीर खुपसल्याचा’ आरोप केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक. आमच्या नेत्यांचा अपमान बंद करा. कल्याण पूर्वेत भाजपचा एकही नगरसेवक स्वबळावर निवडून येण्याचे नाकीनऊ होते. युतीमुळेच तो निवडून येत होता.आमची ताकद दाखविण्याची वेळ आणू नका, स्वबळावर एकदा होऊन जाऊ द्या. विधानसभा निवडणुकीत एक मावळा भारी पडू शकतो; सगळे जुंपले तर तुमचा सुपडा साफ होईल. शिवसेन संपर्कप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचं भाजप नेते जगन्नाथ पाटील यांना सडेतोड प्रत्युत्तर.
-
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचात माकडांची दहशत
तेलंगणा राज्यातून आलेले वानर सिरोंच्या तालुक्यात धुमाकूळ घालत आहेत. सकाळ आणि सायंकाळच्या वेळेस शहरातील अनेक घरांमध्ये खाद्यपदार्थ नेणे, भांडे नेणे अशी माकडांनी नागरिकांना त्रास देत आहेत. अनेक नागरिकांवर हल्ले करण्याचे काम हे माकड करीत आहेत. मोठ्या संख्येत तेलंगणा राज्यातून काही दिवसा अगोदर हे माकड महाराष्ट्रातील सीमावरती भागात आली. वन विभाग माकडाच्या हायदोसमुळे चिंताजनक
-
भाजपाचा एकच वेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला धक्का
नाशिकचे दोन माजी महापौर भाजपच्या गळाला. माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ करणार भाजपात प्रवेश. तर काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरे देखील भाजपाच्या वाटेवर. सूत्रांची माहिती. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा. विनायक पांडे ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते तर शाहू खैरे देखील काँग्रेसचे मोठे नेते. भाजपाचा एकच वेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला धक्का.
Published On - Dec 25,2025 8:30 AM
