किताही पैसा घ्या, फक्त येथून बाहेर काढा!; पैशांनी भरलेल्या बॅगा घेऊन श्रीमंत तयार, विमानाचे तिकिट 3.2 करोडला

सध्या आखाती देशांमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकजण देश सोडून बाहेर पळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे श्रीमंत लोक यासाठी कितीही पैसे देण्यास तयार आहेत.

किताही पैसा घ्या, फक्त येथून बाहेर काढा!; पैशांनी भरलेल्या बॅगा घेऊन श्रीमंत तयार, विमानाचे तिकिट 3.2 करोडला
airport
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 03, 2026 | 4:51 PM

कल पर्यंतजे आखाती देशांतील आलिशान हॉटेल्समध्ये शँपेनचा घोट घेत श्रीमंत लोक मजा मारत होते, आज त्यांच्या हातात दारु नाही तर प्रायव्हेट सिक्युरिटी कंपन्यांचे नंबर आहेत. मध्य पूर्वेत (Middle East) अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या युद्धाने गल्फमधील ‘सुपर रिच’ लोकांची झोप उडवली आहे. जसा तेहरानने इस्त्रायल-अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी ड्रोन आणि मिसाइल्सची पाऊस पाडला, तसाच दुबई आणि अबू धाबीतील आलिशान व्हिलांमध्ये राहणाऱ्या अतिशय श्रीमंत लोकांमध्ये बोरिया-बिस्तर गुंडाळण्याची धावपळ सुरू झाली. हे दृश्य एखाद्या हॉलिवूड डिझास्टर फिल्मसारखे झाले.

न्यूयॉर्क पोस्टच्या एका अहवालानुसार, या श्रीमंतांमध्ये भीतीचे वातावरण इतके आहे की, ते गल्फ सोडून जाण्यासाठी एका प्रायव्हेट जेटसाठी ३,५०,००० डॉलर (सुमारे ३.२ कोटी रुपये) पर्यंतची मोठी रक्कम त्वरित देण्यास तयार आहेत. प्रायव्हेट जेट ब्रोकरेज कंपनी विमान प्रायव्हेट (Vimana Private)चे सीईओ अमीरह नरन (Ameerh Naran) यांनी सांगितले की, सध्या या श्रीमंतांकडे त्यांच्या महागड्या गाड्या आणि हिरे मागे सोडून पळून जाण्याशिवाय दुसरा ‘खरा पर्याय’ उरलेला नाही. विमाने कमी आहेत आणि पळणारे जास्त. त्यामुळे भाडे दर तासाला वाढत आहे.

पहिले 10 तासांची रोड ट्रिप आणि नंतर युरोपचे तिकीट

हवाईतळांवर मलबे आणि स्फोटांच्या बातम्यांनी या श्रीमंतांना जमिनीवर उतरायला भाग पाडले आहे. आता हे श्रीमंत आपल्या कोट्यवधींच्या लॅम्बोर्गिनी आणि फरारी गाड्यांमध्ये सौदी अरेबियापर्यंत १०-१० तासांची रस्त्याने प्रवास करत आहेत. का? कारण सौदी सध्या त्यांच्यासाठी ती खिडकी आहे जिथून ते सुरक्षितपणे युरोपसाठी प्रायव्हेट चार्टर प्लेन पकडू शकतात. सुरक्षा फर्म अल्मा रिस्क (Alma Risk)चे इयान मॅककॉल (Ian McCall) यांनी सांगितले की, त्यांच्याकडे वैयक्तिक ग्राहक आणि कॉर्पोरेट घराण्यांच्या कॉल्सचा पूर आला आहे. प्रत्येकजण फक्त एकच प्रश्न विचारत आहे, “किताही पैसा घ्या, फक्त येथून बाहेर काढा!”

प्रायव्हेट जेटचे भाडे आकाशा एवढे

श्रीमंतांमध्ये चढाओढ सुरु असल्यामुळे प्रायव्हेट विमान कंपन्या याचा फायदा घेत आहेत. युरोपपर्यंतच्या एका छोट्या उड्डाणाचे भाडे आता साडेतीन लाख डॉलरच्या पलीकडे गेले आहे. श्रीमंत आता आपल्या त्या लक्झरी मालमत्ता सोडून युरोपला जाण्याच्या तयारीत आहेत, जेणेकरून जीव वाचवता येईल. सध्या गल्फच्या आकाशात बिझनेस क्लास सीटांसाठी नव्हे, तर जीव वाचवणाऱ्या ‘प्रायव्हेट टेक-ऑफ’ साठीच स्पर्धा सुरू आहे.

Follow Us