तोंडाचं ऑपरेशननंतर महिलेला धक्का, स्वतःची बोलण्याची पद्धत विसरुन दुसरीच सुरु, योगायोग नाही तर या आजाराने ग्रस्त

| Updated on: May 12, 2021 | 10:11 PM

ऑस्ट्रेलियात एका महिलेबाबत (Australian Woman) अजब प्रसंग घडलाय.

तोंडाचं ऑपरेशननंतर महिलेला धक्का, स्वतःची बोलण्याची पद्धत विसरुन दुसरीच सुरु, योगायोग नाही तर या आजाराने ग्रस्त
Follow us on

Australian Woman Talks in Irish Accent कॅनबेरा : ऑस्ट्रेलियात एका महिलेबाबत (Australian Woman) अजब प्रसंग घडलाय. गी मक्येन नावाच्या या महिलेचं एक ऑपरेशन करण्यात आलं आणि त्यानंतर ती शुद्धीवर आल्यावर थेट आयरिश एसेंटमध्ये बोलायला लागली. विशेष म्हणजे तिने एकदाही आयर्लंडमध्ये प्रवास केलेला नाही. म्हणजेच कधीच ज्या देशात नाही गेली त्या देशाच्या एसेंटमध्ये बोलायला लागल्याने तिला स्वतःलाही आश्चर्य वाटलं. गी मक्येननं नुकतंच टॉन्सिल्सचं ऑपरेशन केलं. यानंतर हा प्रकार समोर आला (Australian Woman forgot her original accent after operation Talks in Irish Accent).

गीने आपल्या टिकटॉक अकाऊंटला एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तिने आपल्याबाबत घडलेली घटना सांगितली. आता ऑस्ट्रेलियाची नागरिक असतानाही तिला ऑस्ट्रेलियाच्या एसेंटमध्ये बोलता येत नाही. तिने शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “माझं एक दिवसापूर्वीच ऑपरेशन झालं आणि त्यानंतर आज मी आयरिश एसेंटसोबत झोपेतून उठलीय. मला हे एखादं स्वप्न पाहत असल्यासारखं वाटतंय. पण माझा ऑस्ट्रेलिया एसेंट हरवला आहे.’

गीने आपल्या या अडचणीवर डॉक्टरांशी 2 आठवड्यापर्यंत सविस्तर चर्चा केली. यानंतर तिला फॉरेन एसेंट सिंड्रोम (Foreign Accent Syndrome) हा आजार झाल्याचं स्पष्ट झालंय. सामान्यपणे एखाद्या रुग्णाच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही प्रमाणात हा आजार होतो. यावेळी तो रुग्ण आपला आधीपासूनचा एसेंट गमावतो.”

जगभरात असे 100 रुग्ण

1907 मध्ये या आजाराचा शोध लागला. यानंतर आतापर्यंत जगभरात असे 100 रुग्ण आढळले आहेत. सामान्यपणे शस्त्रक्रियेनंतर 8 दिवस या महिलेला हा बदल जाणवला नाही (Foreign Accent Syndrome Cases). त्यानंतर तिला आपली बोलण्याची पद्धत बदलल्याचं लक्षात आलं. तिने आपल्या डॉक्टरांकडे जाऊन याबाबत विचारणा केली. डॉक्टरांनी ऑपरेशननंतर ती अद्याप पूर्ण रिकव्हर झाली नसल्यानं असं होत असल्याचं म्हटलं.

गी म्हणाली, ‘मी सकाळी उठले आणि माझ्या मित्रांसोबत ऑस्ट्रेलियाच्या एसेंटमध्ये बोलत होते. मला वाटलं माझा मुळ एसेंट परत आलाय. मात्र, फोनवर बोलता बोलताच 5 ते 10 मिनिटात माझा एसेंट आयरिश झाला.’

एसेंट बदलल्याने महिला नाराज

ही महिला म्हणाली, “माझी बोलण्याची पद्धतच बदलल्याने मी काय करु हेच समजेना. मी कधी आयरलंडमध्ये (Ireland) गेली नाही. मी ऑस्ट्रेलियात वाढले. तरीही माझी बोलण्याची मूळ पद्धत हरवली आहे. यामुळे खूप अडचणी येत आहेत. यावर उपाययोजना करु शकतील अशा योग्य डॉक्टरांच्या मी शोधात आहे.”

सोशल मीडियावर या महिलेच्या आजाराविषयी दोन प्रकारची मतं आहेत. काही लोक या महिलेविषयी सहानुभूती व्यक्त करत आहेत, तर काही लोक ती महिला खोटं बोलत असल्याचा आरोप करत आहे.

हेही वाचा :

चीनच्या राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता; शी जिनपिंग यांची राष्ट्राध्यक्षपदाची तिसरी टर्म हुकणार?

ऐकावं ते नवलंच! 16 बायकांचा दादला, 150 मुलं; तरीही गुडघ्याला बाशिंग बाधून तयार!

चीनचा मोठा निर्णय, माऊंट एव्हरेस्टवर आता विभाजन रेषा, कारण काय ?

व्हिडीओ पाहा :

Australian Woman forgot her original accent after operation Talks in Irish Accent