चीनच्या राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता; शी जिनपिंग यांची राष्ट्राध्यक्षपदाची तिसरी टर्म हुकणार?

क्षी जिनपिंग यांच्या युद्धखोरीमुळे जागतिक पातळीवर चीन टीकेच्या भोवऱ्यात सापडला आहे. | Xi Jinping

चीनच्या राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता; शी जिनपिंग यांची राष्ट्राध्यक्षपदाची तिसरी टर्म हुकणार?
क्षी जिनपिंग

बीजिंग: चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना लवकरच या पदावरून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे. अनेक जाणकार शी जिनपिंग यांना राष्ट्राध्यक्षपदाची तिसरी टर्म मिळणार नाही, असा अंदाज वर्तवताना दिसत आहेत. शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या कार्यकाळात चीनने अनेक देशांच्या हद्दीत घुसखोरी केल्याचे प्रकार घडले आहेत. शी जिनपिंग यांच्या युद्धखोरीमुळे जागतिक पातळीवर चीन टीकेच्या भोवऱ्यात सापडला आहे. परिणामी शी जिनपिंग यांना आता फार काळ राष्ट्राध्यक्षपदी राहता येणार नाही, असे ठोकताळे जागतिक पातळीवर बांधले जात आहेत. (Doubts emerge over Xi Jinping’s chances of securing 3rd term as Chinese President)

तैवानाच्या सागरी आणि हवाई हद्दीतील घुसखोरी, मानवी हक्कांचे उल्लंघन आणि इतर अनेक मुद्द्यांवर जाब विचारण्यासाठी G7 परिषदेने नुकतेच शी जिनपिंग यांना बोलावले होते. त्याच आठवड्यात चीन सरकारने सामाजिक कार्यकर्ते जोशुआ वाँग यांच्या कारावासाच्या शिक्षेत आणखी 10 महिन्यांनी वाढ केली. त्याचेवळी चीनने ऑस्ट्रेलियाशीही पंगा घेतला आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची मानसिकता शीतयुद्ध खेळण्याची आहे. या वैचारिक मतदभेदांमुळे क्षी जिनपिंग यांनी ऐनवेळी चीन आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणारी मंत्र्यांच्या पातळीवरील आर्थिक बैठक रद्द केली होती.

शेजारी देशांशी चीनचे संबंध बिघडले

गेल्या काही काळात चीनच्या आक्रमक धोरणामुळे दक्षिण आशियातील शेजारी देशांशीही चीनचे हितसंबंध बिघडताना दिसत आहेत. मध्यंतरी दक्षिण कोरियाने त्यांच्या देशातील सर्वाधिक उंचावर असणाऱ्या लष्करी क्षेत्रात अमेरिकन शिष्टमंडळाला प्रवेश दिला होता. त्यानंतर दक्षिण कोरियाने अमेरिकेकडून THAAD ही क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा विकत घेतली होती. तेव्हापासून चीन आणि दक्षिण कोरियातील संवाद बिघडला आहे.

याशिवाय, अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्धामुळेही शी जिनपिंग यांच्याविरोधात नाराजीचे वातावरण आहे. हाँगकाँग, तैवान आणि भारतासोबत सुरु असलेल्या सीमावादामुळेही क्षी जिनपिंग टीकेच्या केंद्रस्थानी आहेत. या सगळ्या बाबी पाहता शी जिनपिंग यांना राष्ट्राध्यक्षपदाची तिसरी टर्म मिळणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

संबंधित बातम्या:

राजपक्षे सरकारनं श्रीलंका चीनला विकल्याचा आरोप, जनता बंडाच्या तयारीत; समजून घ्या संपूर्ण प्रकरण

‘चीनचे राष्ट्राध्यक्ष युद्धाची गर्जना करतायंत, तरीही मोदी सरकारमधील नेते शांत का?’

चिनी राष्ट्रपतीशी पंगा घेणं महागात पडलं?; ‘अलीबाबा’चे जॅक मा दोन महिन्यांपासून गायब

(Doubts emerge over Xi Jinping’s chances of securing 3rd term as Chinese President)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI