चिनी राष्ट्रपतीशी पंगा घेणं महागात पडलं?; ‘अलीबाबा’चे जॅक मा दोन महिन्यांपासून गायब

श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्या जगभरातील तरुणांचे आदर्श असलेले अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि चीनमधील सर्वात श्रीमंत उद्योगपती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत. (chinese Tech Billionaire Jack Ma Missing For Two Months)

चिनी राष्ट्रपतीशी पंगा घेणं महागात पडलं?; 'अलीबाबा'चे जॅक मा दोन महिन्यांपासून गायब

बीजिंग: श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्या जगभरातील तरुणांचे आदर्श असलेले अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि चीनमधील सर्वात श्रीमंत उद्योगपती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी पंगा घेतल्यापासूनच ते गायब झाल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. (chinese Tech Billionaire Jack Ma Missing For Two Months)

जॅक मा यांनी ऑक्टोबर महिन्यात शांघायमध्ये एक भाषण केलं होतं. त्यात त्यांनी जागतिक बँकिंग नियमांना ‘ज्येष्ठ नागरिकांचा क्लब’ म्हणत जोरदार टीका केली होती. तसेच चीनच्या व्याजखोर वित्तीय नियम आणि सरकारी बँकांच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली होती. शिवाय चिनी कम्युनिस्ट सरकारवरही त्यांनी कठोर शब्दात टीका केली होती. त्यामुळे जिनपिंग सरकारविरोधात चिनी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने जिनपिंग सरकार भडकले होते. या टीकेनंतर जॅक मा पुन्हा दिसलेच नाहीत. त्यामुळे जॅक मा गेले कुठे? असा सवाल केला जात आहे.

उद्योग क्षेत्रात होणाऱ्या बदलांना बळ देण्यासाठी सरकारी सिस्टिममध्ये बदल घडवून आणण्याचे आवाहन जॅक मा यांनी केलं होतं. तसेच वैश्विक बँकिंग नियमांवरही टीका केली होती. त्यांच्या या भाषणाने सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचा तिळपापड उडाला. त्यानंतर जॅक मा यांचे दिवस फिरले. त्यांच्यामागे कम्युनिस्ट सरकारने चौकशीचा ससेमिरा लावला. त्यांच्या अँट ग्रुपच्या 37 अब्ज डॉलरचा आयपीओलाही रद्द करण्यात आले होते. एका वृत्तानुसार थेट जिनपिंग यांच्या आदेशानंतरच अँट ग्रुपचा आयपीओ रद्द करण्यात आला आहे.

चीनबाहेर जाण्यास मज्जाव

त्यानंतर चीनी सरकारने नाताळच्या दिवशी जॅक मा यांना पुढील आदेश येईपर्यंत चीन सोडण्यास मज्जाव केला होता. अलिबाब समूहाची चौकशी सुरू असल्याने हा मज्जाव करण्यात आला होता. मात्र, त्याआधीपासूनच जॅक मा यांचा कुठेच ठाव ठिकाणा लागत नसल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

आयपीओवर बंदी, जॅक मा यांना झटका

नोव्हेंबर 2020मध्ये जॅक यांच्या Ant Group चे 37 अरब डॉलरचे ‘इनिशियल पब्लिक ऑफरींग’ (IPO) रद्द केले होते. जॅक-माच्या या कंपनीच्या IPO ला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. हा जगातील सर्वात मोठा IPO होता. मात्र, शांघाय आणि हाँगकाँगच्या मार्केटमध्ये शेअर्सच्या यादीत केवळ 2 दिवस आधीच चीन सरकारने या IPO वर बंदी घातली.

चौकशीच्या आदेशानंतर हाँगकाँग बाजारात अलीबाबाच्या शेअर्सची 6 टक्के पडझड झाली. चीन सरकारने याआधी देखील ई-कॉमर्समधील दिग्गज कंपनी असलेल्या अलीबाबाला दोनपैकी एक गोष्ट स्वीकारण्यास सांगत इशारा दिला होता. अलीबाबा कंपनीकडून छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांशी इतर कुणाशीही व्यापार न करण्याचा करार केला जात असल्याचाही आरोप आहे. यामागे प्रतिस्पर्धी कंपन्यांचा माल विकला जाऊ नये अशी रणनीती होती. म्हणजेच जे व्यापारी अलीबाबासोबत व्यवसाय करत होते ते इतर कुणाशीही व्यवसाय करु शकत नाही.

अलीबाबाच्या कराराची चौकशी करण्याचे आदेश

पीपल्स बँक ऑफ चायनाने 24 डिसेंबर 2020 रोजी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांमध्ये आर्थिक नियंत्रण संस्था अलीबाबाच्या Ant Group fintech ची चौकशी करतील. Ant Group ला संबंधित सरकारी संस्थेकडून नोटीसही मिळाली असून अलीबाबा ग्रुपकडून लवकरच अटींची पुर्तता केली जाईल, अशी माहिती मिळते आहे. असं असलं तरी अलीबाबा ग्रुपकडून अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. चीनमधील सरकारी माध्यमांनी देखील सरकारच्या या कारवाईच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय. (chinese Tech Billionaire Jack Ma Missing For Two Months)

 

संबंधित बातम्या:

इराणकडून आंतरराष्ट्रीय अणुकराराचे उल्लंघन; जगावर आण्विक संकटाचे ढग

पाकिस्तानमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता, प्रसिद्ध ज्योतिषी सामिया खान यांची भविष्यवाणी

वटवाघूळ-उंदीर खाणाऱ्या चीनचा कानाला खडा; कोरोनाच्या भीतीने शाकाहाराकडे वाटचाल?

(chinese Tech Billionaire Jack Ma Missing For Two Months)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI