पाकिस्तानमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता, प्रसिद्ध ज्योतिषी सामिया खान यांची भविष्यवाणी

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Updated on: Jan 03, 2021 | 9:24 PM

पाकिस्तानमध्ये (Pakistan) आधीच आक्रमक विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांची (PM Imran Khan) नाकेबंदी केले आहे. त्यातच आता इम्रान खान यांच्यासाठी आणखी एक निराश बातमी आलीय.

पाकिस्तानमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता, प्रसिद्ध ज्योतिषी सामिया खान यांची भविष्यवाणी
काय आहे FATF? ज्याने पाकिस्तान, तुर्कीलाही टाकले ग्रे लिस्टमध्ये
Follow us

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) आधीच आक्रमक विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांची (PM Imran Khan) नाकेबंदी केले आहे. त्यातच आता इम्रान खान यांच्यासाठी आणखी एक निराश बातमी आलीय. पाकिस्तानमधील प्रसिद्ध ज्योतिषी सामिया खानने आगामी 2021 हे नववर्ष इम्रान खान यांच्यासाठी चढउताराचं असल्याची भविष्‍यवाणी केलीय. दुसरीकडे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो झरदारी आणि पीएमएल-एनच्या नेत्या मरियम नवाज शरीफ यांच्यासाठी मात्र हे वर्ष चांगलं असल्याचं दिसतंय (Pakistan famous astrologer predicts 2021 will be bad for Imran Khan).

पाकिस्तानच्या प्रसिद्ध ज्योतिषी साम‍िया खान म्हणाल्या, “यावर्षी बिलावल भुट्टो यांचं नशिब चमकताना दिसत आहे. त्यांची बहिण आसिफा भुट्टो झरदारी यांचं देखील पीपीपी पक्षात पुनरागमन होऊ शकतं. पंतप्रधान इम्रान खान यांना मात्र यापुढे प्रत्येक पाऊल विचार करुन उचलावं लागेल. कारण इम्रान खान यांचं नशिब बदलाचे संकेत देत आहे. त्यांच्यासाठी 2021 हे वर्ष निर्णायक असणार आहे.”

पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी संयुक्त आघाडी उघडली आहे. याचं नाव पाकिस्तान डेमॉक्रेटिक मुव्हमेंट (पीडीएम) असं आहे. या आघाडीकडून देशभरात रॅली आयोजित केल्या जात आहेत. या रॅलींमध्ये बिलावल आणि मरियम इम्रान खान यांच्यावर सडकून टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाजने काश्‍मीरमध्ये पाकिस्‍तानच्या पराभवावरुन इम्रान खान यांच्यावर तिखट हल्ला चढवलाय. इम्रान खान यांच्या मुर्खपणा आणि कार्यशुन्यतेमुळेच काश्‍मीर नरेंद्र मोदी यांच्या कुशीत गेलंय. त्यामुळे पाकिस्‍तानने काश्‍मीरवरी आपला दावा गमावला तर त्यामुळे पाकिस्तानच्या जनतेला मोठा धक्का बसेल.

एका रॅलीत मरियम नवाज म्हणाले, “पीएम इम्रान खान नेहमीच म्हणतात की नवाज शरीफ मोदींचे मित्र आहेत. मात्र, स्वतः त्यांनी काश्‍मीरला मोदींच्या हातात दिलंय. जेव्हा देशात कमकुवत पंतप्रधान असतो तेव्हा तो जनतेच्या मतांवर आणि पाठिंब्यावर आलेला नसतो. तेव्हा येणारं सरकार देखील कमकुवत असतं. अशावेळी भारतासारखे शत्रुराष्ट्र हल्ला करते.”

हेही वाचा :

तीन देश, कहाणी एक, आधी गायब, नंतर हत्या, इम्रान खान यांच्या मुस्कटदाबीचा नवा मार्ग

इमरान खान यांना 12 लाखांचा दंड, ‘या’ प्रकरणामुळं पंतप्रधानांनी भरले पैसे?

पाकिस्तानातील गोंधळ वाढला, इमरान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांचे नेते सामूहिक राजीनामे देणार

Pakistan famous astrologer predicts 2021 will be bad for Imran Khan

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI