वटवाघूळ-उंदीर खाणाऱ्या चीनचा कानाला खडा; कोरोनाच्या भीतीने शाकाहाराकडे वाटचाल?

चीनने कितीही नाकारलं तरी कोरोना हा विषाणू त्यांच्याच देशातून आला आहे हे आतापर्यंत अनेकांनी पटवून दिलं आहे.

वटवाघूळ-उंदीर खाणाऱ्या चीनचा कानाला खडा; कोरोनाच्या भीतीने शाकाहाराकडे वाटचाल?

बीजिंग : गेल्या 10-12 महिन्यांपासून जगभरात कोरोना व्हायरसचं (Coronavirus) थैमान सुरु आहे. चीनने कितीही नाकारलं तरी कोरोना हा विषाणू त्यांच्याच देशातून आला आहे हे आतापर्यंत अनेकांनी पटवून दिलं आहे. चीनमधील वुहान (Wuhan) शहरात कोरोना व्हायरसचा जन्म झाला असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला अनेक राष्ट्रांनी, तज्ज्ञांनी, आरोग्य संघटनांनी, संस्थांनी तसा दावा केला होता, पुढे तो खरा ठरला. (Will China become vegetarian? Wuhan meat market closed, people avoiding Bat or mouse meat due to coronavirus)

अनेक वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की, कोरोना हा आजार चीनच्या वुहानमधील मीट मार्केटमधूनच (मांसाची विक्री केली जाते असा बाजार) मानवी शरिरात घुसला. या मीट मार्केटमध्ये वटवाघूळ, उंदीर, पँगोलिन, साप आणि इतर अनेक जंगली जनावरांना मारुन त्यांचे मांस विकले जाते. वैज्ञानिकांच्या मते वटवाघूळ किंवा पँगोलिनद्वारे कोरोना हा आजार पसरला आहे. कोरोनाचं संकट ओढवल्यानंतर वुहानमधील मीट मार्केटमधून आता अशा दुर्मिळ जंगली जनावरांचं मांस आता गायब झालं आहे.

वुहानमधील मीट मार्केटमधील जंगली जनावरांचं मांस विकणाऱ्या दुकानांना आता कुलुप लावण्यात आलं आहे. हळूहळू संपूर्ण चीनमधील लोक आता कोणत्याही जंगली जनावरांचं मांस खाणे टाळू लागले आहेत. तसेच चीनच्या सरकारनेही याबाबत काही कायदे तयार केले आहेत.

100 हून अधिक प्रकारची मांसविक्री

वुहानमधील हुआनन मार्केट संपूर्ण जगभर लोकप्रिय आहे. या मीट मार्केटमध्ये एक-दोन नव्हे तर 100 हून अधिक प्रकारच्या प्राणी आणि पक्ष्यांचे मांस विकले जाते. कोरोनापूर्वी या मार्केटमध्ये मोर, लांडगा, वटवाघूळ, उंदीर, पँगोलिन, विविध प्रकारचे साप आणि अनेक प्रकारच्या दुर्मिळ प्राण्यांचे मांस विकले जायचे. कोरोनाचा पहिला रुग्ण याच मार्केटमध्ये आढळला होता.

वुहानने कान धरले?

जुन्या चुकांमधून धडा घेत वुहानवासी आता सजग होत आहेत. येथील मीट मार्केट आणि हॉटेलांमधील मेनू बदलू लागले आहेत. विशेष म्हणजे मेनूमधून जंगली जनावरं कमी होऊ लागली आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने एका रिपोर्टमध्ये म्हटलंय की, चीनचं सरकारदेखील या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. मीट मार्केटमध्ये कोणत्या प्राण्यांचे मांस विकले जात आहे, यावर सरकारचं बारीक लक्ष आहे. येथे तपासणी पथकाकडून सातत्याने तपासणी केली जात आहे.

संबंधित बातम्या

चोराच्या उलट्या बोंबा; कोरोना विषाणूचा जन्म भारतात झाला, चिनी संशोधकांचा दावा

चीनच्या वुहानमधील कोरोना संसर्गाचं सत्य जगासमोर आणलं, महिला पत्रकाराला 4 वर्षांची शिक्षा

चिन्यांना विमानात पाय ठेवू देऊ नका, भारताने का उचललंय हे मोठं पाऊलं, वाचा सविस्तर…

कोरोना व्हायरसचा नवा अवतार सुस्साट; ब्रिटनमधून थेट ‘या’ 19 देशांमध्ये पोहोचला

कोरोनामुळे चीनच्या चिंता वाढल्या, राजधानी बीजिंगमध्ये पुन्हा लॉकडाऊन

(Will China become vegetarian? Wuhan meat market closed, people avoiding Bat or mouse meat due to coronavirus)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI