चीनच्या वुहानमधील कोरोना संसर्गाचं सत्य जगासमोर आणलं, महिला पत्रकाराला 4 वर्षांची शिक्षा

चीनमधील वुहान शहरात सुरु झालेल्या कोरोना विषाणू संसर्गाचं सत्य जगासमोर आणणाऱ्या चीनच्या एका महिला पत्रकाराला तब्बल 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय.

चीनच्या वुहानमधील कोरोना संसर्गाचं सत्य जगासमोर आणलं, महिला पत्रकाराला 4 वर्षांची शिक्षा
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 12:13 AM

बिजींग : चीनमधील वुहान शहरात सुरु झालेल्या कोरोना विषाणू संसर्गाचं सत्य जगासमोर आणणाऱ्या चीनच्या एका महिला पत्रकाराला तब्बल 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. चीन सरकारने तिच्यावर तणाव तयार करणं आणि संकटाची स्थिती निर्माण करण्याचे आरोप केले होते. या प्रकरणी चिनी न्यायालयाने या महिला पत्रकाराला दोषी ठरवले. जँग जान असं या पत्रकाराचं नाव आहे (Penalty of 4 year prison to women for reporting on Wuhan Corona in China).

चीन सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांवर कायमच अशाप्रकारचे गुन्हे दाखल केले जातात. 37 वर्षीय माजी वकील जानला मेमध्ये आधी चिनी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्या मागील अनेक महिन्यांपासून उपोषणावर आहेत. तसेच त्यांची तब्येतही खराब असल्याची माहिती जान यांच्या वकिलाने दिलीय. जँग जान उन अशा अनेक नागरिकांपैकी एक आहेत ज्यांना कोरोनावर रिपोर्टिंग केल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चीनमध्ये माध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर

चीनमध्ये कोणत्याही माध्यमाला स्वातंत्र्य नाही. याशिवाय जे नागरिक सरकारच्या धोरणाविरोधात आवाज उठवत आहेत त्यांचा आवाज दाबला जात आहे. हेच कोरोनावरील रिपोर्टिंगवरुन महिला पत्रकाराला झालेल्या शिक्षेतून स्पष्ट झालंय. जँग जान सोमवारी (28 डिसेंबर) सकाळी आपल्या वकिलासोबत शांघायच्या न्यायालयात पोहचली. त्यांच्यावर फेब्रुवारीत कोरोनावरील रिपोर्ट करण्यासाठी वुहानला गेल्याचा आरोप आहे. त्यांचा हा रिपोर्ट सोशल मीडियावर चांगलाच शेअर झालाय. त्यामुळेच चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

नेटवर्क ऑफ चायनीज ह्यूमन राईट्स डिफेंडर्स (सीएचआरडी) या संस्थेने म्हटलं आहे, “जान यांच्या रिपोर्टमध्ये अन्य स्वतंत्र पत्रकारांना अटक करणे आणि पीडितांच्या कुटुंबीयांना त्रास देण्यावर भाष्य करण्यात आलं होतं. यात सरकारची जबाबदारी देखील निश्चित करण्याची मागणी करण्यात आली होती.” सीएचआरडीच्या माहितीनुसार, जान 14 मे रोजी वुहानमधून बेपत्ता झाल्या होत्या. एक दिवसानंतर समजलं की त्या 640 किलोमीटर दूर शांघायमध्ये पोलिसांच्या ताब्यात आहेत.

हेही वाचा :

वुहान: ज्या शहरातून कोरोना संसर्ग झाला तिथे एका वर्षानंतर काय चाललेय?

China Flood | पुरावे मिटवण्यासाठी चीनने वुहानमध्ये महापूर आणला?

वुहानमधील सर्व ‘कोरोना’ग्रस्त ठणठणीत, चीनचा दावा

Penalty of 4 year prison to women for reporting on Wuhan Corona in China

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.