China Flood | पुरावे मिटवण्यासाठी चीनने वुहानमध्ये महापूर आणला?

China Flood | पुरावे मिटवण्यासाठी चीनने वुहानमध्ये महापूर आणला?

चीनने कोरोना विषाणू संसर्गाबाबतचे वुहान शहरातील सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी कृत्रिमरित्या पूर आणल्याचा आरोप आहे (China Wuhan Flood conspiracy and Corona).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 14, 2020 | 5:16 PM

बिजिंग : कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर जगभरात चीनबाबत संशय व्यक्त केला गेला आणि हा विषाणू निसर्गनिर्मित आहे की चीननिर्मित यावर अनेक तर्कवितर्क लावले गेले. अनेकांनी तर हे चीनचं जैविक शस्त्र असल्याचाही आरोप केला. यानंतर आता पुन्हा एकदा चीनवर नवा आरोप झाला आहे. यानुसार चीनने कोरोना विषाणू संसर्गाबाबतचे वुहान शहरातील सर्व पुरावे नष्ट केले आहेत. यासाठी चीन सरकारनं कृत्रिमरित्या पूर आणल्याचा आरोप झाला आहे (China Wuhan Flood conspiracy theory and Corona).

चीनने थ्री जॉर्ज डॅम या विशालकाय धरणाच्या मदतीने वुहानमध्ये पूर आणला. यात कोरोना संसर्गात आपण दोषी सापडू नये म्हणून सर्व पुरावे पुराच्या पाण्यात नष्ट केले, असा आरोप होत आहे. थ्री जॉर्ज डॅम हे जगातलं सर्वात मोठं धरण आहे. ते आशियातील सर्वात मोठी नदी मानल्या जाणाऱ्या यांगजे नदीवर बांधण्यात आलंय. या धरणाची दुसरी ओळख म्हणजे हे धरण जगातील सर्वात मोठ्या ग्रॅव्हिटी हाइड्रोइलेक्ट्रिक सिस्टमसाठी ओळखलं जातं. हे धरण बांधल्यानंतर पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी झाला. यामुळे एका दिवसाच्या वेळेमध्ये 0.06 मायक्रो सेकंदाची भर पडलीय, असाही दावा केला गेला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

हे अजब-गजब धरण चीनसाठी मोठा धोकाही ठरण्याची शक्यता वर्तवली जाते. याच धरणाचे अनेक दरवाजे उघडून चीनमध्ये पूर आणण्यात आल्याची सध्या चर्चा होतेय. वुहान या धरणापासून 300 किलोमीटर लांब आहे. या धरणाचे दरवाजे उघडल्यानंतरच वुहानमध्ये पाणी साचलं. ज्या सी-फूड मार्केटमधून कोरोना पसरल्याचा दावा केला जातो. ते मार्केट सुद्धा पाण्यात बुडालं, असाही दावा होतोय.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

सध्या चीनमध्ये कोरोनाच्या चौकशीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथकही चीनमध्ये दाखल झालंय. हे पथक आपला अभ्यास अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला सोपवणार आहे. त्या पथकामध्ये वेगवेगळे प्रतिनिधी असले, तरी ते पूर्णतः जागतिक आरोग्य संघटनेनं पाठवलेलं पथक आहे. याआधीच चीनसोबत जागतिक आरोग्य संघटनेनं केलेली सलगी वादात सापडली. त्यामुळे आता हे पथक काय अहवाल देतंय यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत. असं असलं तरी या पथकाच्या पाहणीत काहीही सापडू नये म्हणूनच चीनने वुहानमध्ये पूरांचं कटकारस्थान रचल्याचा आरोप होत आहे.

हेही वाचा :

धुमकेतूवरील सोने लुटीसाठी अमेरिका-चीनमध्ये धुमश्चक्री, सोन्याची किंमत चक्रावून सोडणारी

चीनला आणखी एक झटका, भारतापाठोपाठ अमेरिकाही चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणण्याच्या तयारीत

चीनने भूतानलाही डिवचले, सीमा वादावर कुणीही तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप न करण्याची भाषा

China Wuhan Flood conspiracy theory and Corona

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें