चीनला आणखी एक झटका, भारतापाठोपाठ अमेरिकाही चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणण्याच्या तयारीत

अमेरिकाही चीनला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. भारतानंतर आता अमेरिकाही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या विचारात आहे.

चीनला आणखी एक झटका, भारतापाठोपाठ अमेरिकाही चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच (India Ban 59 Chinese Apps) भारत सरकारकडून चीनच्या 59 अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली (America Looking At Banning Chinese Apps). त्यामुळे सर्वात प्रसिद्ध अशा Tik Tok, यूसी ब्राऊजर, शेअर इट सारख्या अनेक चिनी अ‍ॅप्सवर भारतात आता बंदी असणार आहे. भारताच्या या निर्णयाचं अमेरिकेनेही स्वागत केलं आहे. आता अमेरिकाही चीनला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. भारतानंतर आता अमेरिकाही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या विचारात आहे (America Looking At Banning Chinese Apps).

हेही वाचा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी फॉक्स न्यूजला सांगितलं, “अमेरिका चिनी सोशल मीडिया अ‍ॅप्सवर बंदी आणण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. यामध्ये Tik Tok चाही समावेश आहे.”

वुहानपासून संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे अमेरिका सतत चीनवर निशाणा साधत आहे. यादरम्यान, भारत-चीन सीमेवर झालेल्या वादावरही अमेरिकेने भारताला समर्थन देत चीनवर टीका केली होती.

भारताने जेव्हा चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणली, तेव्हा माईक पोम्पिओ यांनी या निर्णयाचं समर्थन केलं. “आम्ही भारताच्या या निर्णयाचं स्वागत करतो”, असं ते म्हणाले होते. शिवाय, त्यांनी या अ‍ॅप्सना CCP (चिनी कम्युनिस्ट पक्ष) चा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. भारताच्या या निर्णयाने देशाच्या अखंडतेला आणि राष्ट्रीय सुरक्षेला मजबुती मिळेल, असंही माईक पोम्पिओ म्हणाले होते (America Looking At Banning Chinese Apps).

भारतात चिनी अ‍ॅप्सवर बंदी

काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या लष्करात झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यानंतर देशभरातून चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची मागणी जोर धरु लागली होती. त्याशिवाय, या अ‍ॅप्समार्फत भारतीयांची माहिती चोरली जात असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली होती.

गुप्तचर संस्थांनी 52 अ‍ॅप्सची नावं सरकारला दिली होती, ज्यांच्यावर हेरगिरीची शक्यता होती. त्यानंतर सरकारने तब्बल 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली.

America Looking At Banning Chinese Apps

संबंधित बातम्या :

TikTok | ‘टिक टॉक’ बंदीवर पहिला आवाज, ममतांची अभिनेत्री खासदार मैदानात

Chinese Apps | निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी अंमलबजावणी, Tik Tok, Helo सह 59 चिनी अ‍ॅप अखेर बंद

Chinese Apps Ban | चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी, तुमच्या मोबाईलमधील त्या अ‍ॅप्सचं पुढे काय होणार?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *