AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वुहान: ज्या शहरातून कोरोना संसर्ग झाला तिथे एका वर्षानंतर काय चाललेय?

कडक लॉकडाऊन आणि इतर उपाययोजनांच्यामदतीनं वुहान शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. Wuhan city in China preparing for Christmas

वुहान: ज्या शहरातून कोरोना संसर्ग झाला तिथे एका वर्षानंतर काय चाललेय?
| Updated on: Dec 09, 2020 | 11:01 AM
Share

बीजिंग : कोरोना विषाणू संसर्गामुळे जगातील 210 देशांना फटका बसला आहे. जगभरातील 6 कोटी 80 लाख लोक कोरोनाबाधित झाले. तर, 15 लाख 53 हजार नागरिकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. कोरोना विषाणू संसर्गाची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून झाली होती. वुहानमधील वेट मार्केटमधून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. कडक लॉकडाऊन आणि इतर उपाययोजनांच्यामदतीनं वुहान शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. जगातील इतर देश कोरोना संकटाचा सामना करत असताना,वुहानमध्ये ख्रिसमसची तयारी सुरु आहे. (Peoples Wuhan city in China preparing for Christmas where corona emerged one year before)

चीनमधून जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर सुरुवातीला जगातील अनेक देशांकडे लॉकडाऊन करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. जगातील विविध देश कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करत आहेत. कोरोनारोधक लसींची निर्मिती अंतिम टप्प्यात आलेली आहे. कोरोना विषाणू संसर्गातून 4 कोटी 71 लाख नागरिक बरे झाले आहेत. लॉकडाऊनमधून बाहेर पडून लोकांचे जीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नागरिकांना कोरोनाविषयक खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

चीनच्या वुहान शहरात सध्या काय चाललेय?

कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानंतर चीनमधील वुहान शहरात प्रथम लॉकडाऊन करण्यात आले होते. जगातील प्रमुख देश कोरोना विषाणूचा सामना करत असताना वुहान शहरातील जनजीवन सामान्य झाले आहे. रॉयटर्स या वृतसंस्थेनुसार वुहान शहरातील मासे विक्री करणाऱ्या नी गाउंजजेन यांनी “कोणत्याही गोष्टींची भीती वाटत नसल्याचे म्हटले आहे”. मासेबाजारातील अनेक विक्रेते मास्कचाही वापर करत नसल्याचे दिसून आले. (Peoples Wuhan city in China preparing for Christmas where corona emerged one year before)

चीनने 31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक आरोग्य संघटनेला वुहानमध्ये विषाणू संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. सुरुवातीला चीननं या संसर्गाला ‘व्हायरल निमोनिया’ असं नाव दिलं होते. वुहानमधील रुग्णांमध्ये मासळी बाजारातील डीलर आणि प्रमुख विक्रेत्यांचा समावेश असल्याचे लक्षात आल्यानंतर कडक लॉकडाऊन लावण्यात आले. बाजार बंद ठेवण्यात आले होते आणि नागरिकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले. लॉकडाऊनची कडक स्वरुपात अंमलबजावणी करण्यात आल्याने वुहानमधील कोरोनाची परिस्थिती सुधारली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वुहानमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.

ख्रिसमसची तयारी सुरु

जगातील प्रमुख देश कोरोना विषाणू संसर्गामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमांवर निर्बंध आणू शकतात. मात्र, वुहानमध्ये परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र आहे. वुहानच्या बाजारांमध्ये ख्रिसमससंबंधी उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. वुहान मधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणांवर गर्दी पाहायला मिळत आहे. फुलांची विक्री करणारे विक्रेतेही रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. (Peoples Wuhan city in China preparing for Christmas where corona emerged one year before)

ब्रिटन आणि अमेरिकेतील शहरांमध्ये मात्र ख्रिसमसच्या तयारीचा उत्साह दिसून येत नाही. अमेरिकेतील नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्यावर कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्याचे आव्हान आहे. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोरोनाची सर्वात खराब परिस्थिती येणे बाकी आहे. यामुळे युरोपातील अनेक देशांमध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची प्रकरणं समोर आल्यास मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जाते. प्रशासन मोठ्या प्रमाणावर सतर्क होते. डीडब्ल्यूच्या अहवालानुसार निवासी परिसरात आरोग्य विभागाचे कर्मचारी स्मार्टफोनद्वारे आरोग्य कोडची चाचणी करतात. वुहानमधील बागांमध्ये मोठे संसर्गाविषयी जागृती करणारे होर्डिंग्ज लावण्यात आलेले आहेत. मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलेले नाही, मात्र, मास्क नसल्यास दंड करण्यात येतो.

चीनमधील वुहान शहरात लोकांचे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. पण, वुहानमधील दुकानदारांनी पहिल्यासारखी विक्री होत नसल्याचे सांगितले आहे. विक्रीमध्ये झालेली घट चांगली नसल्याचे दुकानदारांनी म्हटले. वुहानची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे.

संबंधित बातम्या:

कोरोना लशीच्या नोंदणीसाठी ‘हे’ अ‍ॅप लोकांना मदत करणार, आरोग्य मंत्रालयाची माहिती

PHOTOS : जगातील सर्वात सुंदर संसदेच्या इमारती; काही नदीकाठी, तर काहींचं गुप्त बोगद्यांवर निर्माण

(Peoples Wuhan city in China preparing for Christmas where corona emerged one year before)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.