AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे चीनच्या चिंता वाढल्या, राजधानी बीजिंगमध्ये पुन्हा लॉकडाऊन

कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठिस धरलेले असताना चीनने मात्र त्यांच्या देशातील परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळत देशातील लॉकडाऊन काही महिन्यांपूर्वीच उठवले.

कोरोनामुळे चीनच्या चिंता वाढल्या, राजधानी बीजिंगमध्ये पुन्हा लॉकडाऊन
| Updated on: Dec 29, 2020 | 6:14 PM
Share

बीजिंग : गेल्या 10-12 महिन्यांपासून जगभरात कोरोना व्हायरसचं (Coronavirus) थैमान सुरु आहे. चीनने कितीही नाकारलं तरी कोरोना हा विषाणू त्यांच्याच देशातून आला आहे हे आतापर्यंत अनेकांनी पटवून दिलं आहे. चीनमधील वुहान (Wuhan) शहरात कोरोना व्हायरसचा जन्म झाला असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला अनेक राष्ट्रांनी, तज्ज्ञांनी, आरोग्य संघटनांनी, संस्थांनी तसा दावा केला होता, पुढे तो खरा ठरला. दरम्यान या विषाणूने संपूर्ण जगाला वेठिस धरलेले असताना चीनने मात्र त्यांच्या देशातील परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळत देशातील लॉकडाऊन काही महिन्यांपूर्वीच उठवले. परंतु कोरोनाने पुन्हा एकदा चीनच्या चिंता वाढवल्या आहेत. (China’s capital Beijing parts locksdown Corona)

चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच राजधानी बीजिंगमधील काही भागांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मंगळवारी बीजिंगच्या उत्तर पूर्वेकडील शुनाई जिल्ह्यातील 10 ठिकाणं सिल करण्यात आली आहेत. जून-जुलैनंतर पहिल्यांदाच चीनमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. बीजिंग शहरात 18 डिसेंबरपासून जवळपास 16 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच तीन रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं दिसून आली आहेत. अनेक कोरोनाबाधित रुग्ण हे शुनाई जिल्ह्यात आढळले आहेत.

बीजिंग नगर निगमने दिलेल्या माहितीनुसार सहा गावांमधील तीन इमारती आणि एका औद्योगिक वसाहतीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. चीनमध्ये सध्या खूपच कमी कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या परिसरांमध्ये मिळून 20 पेक्षाही कमी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तरीदेखील आगामी काळात या परिसरांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून लॉकडाऊनचा मार्ग निवडण्यात आला आहे. दरम्यान या विभागांमध्ये एक हजाराहून अधिक लोकांच्या कोरोना चाचण्यादेखील करण्यात आल्या आहेत.

जगभरात 8 कोटी 17 लाख कोरोनाबाधितांची नोंद

वर्ल्डोमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात 8 कोटी 17 लाख 72 हजार 669 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 5 कोटी 79 लाख 35 हजार 86 रुग्ण बरे झाले आहेत, तर 17 लाख 84 हजार 244 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या 2 कोटी 20 लाख 53 हजार 338 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरीकेत 1 कोटी 97 लाख 81 हजार 718 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 1 कोटी 16 लाख 96 हजार 882 रुग्ण बरे झाले आहेत, तर 3 लाख 43 हजार 182 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या नंबरवर आहे. भारतात आतापर्यंत 1 कोटी 2 लाख 24 हजार 529 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 98 लाख 7 हजार 959 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 48 हजार 190 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले टॉप 10 देश

अमेरिका : एकूण कोरोनाबाधित – 19,781,718, मृत्यू – 343,182 भारत : एकूण कोरोनाबाधित – 10,224,797, मृत्यू – 148,190 ब्रझील : एकूण कोरोनाबाधित – 7,506,890, मृत्यू – 191,641 रशिया : एकूण कोरोनाबाधित – 3,105,037, मृत्यू – 55,827 फ्रान्स : एकूण कोरोनाबाधित – 2,562,646, मृत्यू – 63,109 यूके : एकूण कोरोनाबाधित – 2,329,730, मृत्यू – 71,109 तुर्की : एकूण कोरोनाबाधित – 2,162,775, मृत्यू – 20,135 इटली : एकूण कोरोनाबाधित – 1,964,054 , मृत्यू – 69,214 स्पेन : एकूण कोरोनाबाधित – 1,830,110, मृत्यू – 49,260 अर्जेंटिना : एकूण कोरोनाबाधित – 1,547,138, मृत्यू – 41,997

संबंधित बातम्या

चोराच्या उलट्या बोंबा; कोरोना विषाणूचा जन्म भारतात झाला, चिनी संशोधकांचा दावा

चीनच्या वुहानमधील कोरोना संसर्गाचं सत्य जगासमोर आणलं, महिला पत्रकाराला 4 वर्षांची शिक्षा

चिन्यांना विमानात पाय ठेवू देऊ नका, भारताने का उचललंय हे मोठं पाऊलं, वाचा सविस्तर…

कोरोना व्हायरसचा नवा अवतार सुस्साट; ब्रिटनमधून थेट ‘या’ 19 देशांमध्ये पोहोचला

(China’s capital Beijing parts locksdown Corona)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.