मुलींना टाईट जीन्स, हायहिल्स घालण्यास बंदी; पाकिस्तानमधील विद्यापीठाचा गजब कारभार

| Updated on: Jan 30, 2021 | 4:08 PM

पाकिस्तान (Pakistan) मधील एका विद्यापीठात मुली तसेच महिला शिक्षिकांना टाईट जिन्स घालण्यावर बंदी घातली आहे. (tight jeans pakistan bacha khan university)

मुलींना टाईट जीन्स, हायहिल्स घालण्यास बंदी; पाकिस्तानमधील विद्यापीठाचा गजब कारभार
Follow us on

इस्लामाबाद : आपला शेजारी देश म्हणजेच पाकिस्तामध्ये सामान्य नागरिकांवर कधी कोणते नियम लादले जातील याचा काही नेम नाही. पाकिस्तान (Pakistan) मधील एका विद्यापीठात मुली तसेच महिला शिक्षिकांना टाईट जिन्स घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, विद्यापीठात प्रवेश करताच विद्यार्थीनींना स्कार्फ म्हणजेच हिजाब घालणे बंधनकारक केले आहे. विद्यापीठाच्या या अजब नियमामुळे पाकिस्तानमध्ये काही नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. जारी केलेल्या या नियमांची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. (Ban on wearing of tight jeans in pakistan’s bacha khan university)

पाकिस्तानमधील खैबरपख्तुनवा प्रांतातील (Khyber Pakhtunkhwa Province) बाचा खान विद्यापीठाने (bacha khan university) विद्यार्थ्यांसाठी एक ड्रेस कोड निश्चित केलाय.विद्यापीठाने जारी केलेल्या सर्कुलारनुसार विद्यापीठात शिकत असलेल्या मुलींना टाइट जींस, टी-शर्ट, छोटे कपड़े, मेकअप, दागीने, फॅन्सी पर्स, पारदर्शी कपड़े तसचे हायहिल्स घालण्यास बंदी घातली आहे.

शिक्षिकांनासुद्धा नियम पाळणे गरजेचे

पाकिस्तानच्या या विद्यापीठाने लागू केलेले नियम फक्त विद्यार्थिनींसाठीच नाहीत. तर विद्यापीठात शिकवत असलेल्या शिक्षिकांनासुद्धा काही नियम पाळावे लागणार आहेत. नव्या नियमांनुसार महिला शिक्षिकांना सॅन्डल, इयररिंग्स, जीन्स घालण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच हा नवा नियम लागू झाल्यानंतर महिला शिक्षिक शॉर्ट स्कर्टसुद्धा घालू शकणार नाहीत.

मुलांसाठीसुद्धा नियम बदलले

बाचा खान विद्यापाठीने फक्त मुलींसाठीच नियम बदलले असे नाही. तर मुलांसाठीसुद्धा अनेक नियम कडक करण्यात आले आहेत. मुलांना निळा, काळ्या रंगाची पॅन्ट, कोट आणि जॅकेट, शॉर्ट, कटऑफ जीन्स, टाइट जीन्स, स्पोर्ट्स शूज, हातांवर बँड घालण्यास मनाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येथील कुलगुरुंनी अभ्यासक्रमामध्ये कुराणचा अभ्यास आणि भाषांतरित केलेल्या कुराणचाही समावेश केला आहे. विद्यापीठातील विद्यार्थी भविष्यात चांगले नागरिक म्हणून समोर यावेत, त्यामुळे हे नियम लागू करण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, अशा प्रकारचे नियम लागू करणारे पाकिस्तानमधील हे पहिलेच विद्यापीठ आहे, असे नाही. यापूर्वीसुद्धा अनेक विद्यापीठांनी आश्चर्यकारक नियम लागू केलेले आहेत.

संबधित बातम्या :

पाकिस्तान जिंदाबाद म्हणणे हा देशद्रोह?, वाचा कायदा काय म्हणतो?

Pakistan ने कोरोना लस मागितली तर भारत देणार का? परराष्ट्र मंत्रालयाने केलं स्पष्ट

पाकिस्तानची बर्बादीकडे वाटचाल तर बांग्लादेशची श्रीमंतीकडे, असं का घडतंय? वाचा सविस्तर

(Ban on wearing of tight jeans in pakistan’s bacha khan university)