पाकिस्तानची बर्बादीकडे वाटचाल तर बांग्लादेशची श्रीमंतीकडे, असं का घडतंय? वाचा सविस्तर

दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत जिथे बांग्लादेशनं पाकिस्तानला मागे टाकले आहे, आता जीडीपीच्या बाबतीतही असंच घडत आहे. (Bangladesh Pakistan)

पाकिस्तानची बर्बादीकडे वाटचाल तर बांग्लादेशची श्रीमंतीकडे, असं का घडतंय? वाचा सविस्तर
पाकिस्तान भारत
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 12:14 PM

नवी दिल्ली : 1971 मध्ये पाकिस्तानपासून वेगळा झालेला बांगलादेश हा एकेकाळी दारिद्र्य, भ्रष्टाचार आणि दहशतवादाचा गड होता. हुकूमशाही व नैसर्गिक आपत्तींचाही बांग्लादेशला फटका बसला. सर्व संकटांचा सामना करत बांग्लादेश ज्या प्रकारे देशाचं चित्र बदलण्याचा प्रयत्न करत आहे, तो पाकिस्तानसाठी एक धडा आहे. लोकसंख्या आणि दारिद्र्य झेलत बांगलादेश आता आशियातील ‘नवा वाघ’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कर्ज आणि दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत जिथे बांग्लादेशनं पाकिस्तानला मागे टाकले आहे, आता जीडीपीच्या बाबतीतही असंच घडत आहे. (How Bangladesh is taking over Pakistan in terms of economy)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार बांग्लादेश 2021 पर्यंत 322 बिलीयन डॉलर म्हणजेच 23.18 लाख कोटी पर्यंत पोहोचेल. 2021 च्या शेवटापर्यंत बांग्लादेशी नागरिक पाकिस्तानी नागरिकापेक्षा श्रीमंत असेल. बांग्लादेशात 1990 मध्ये लोकशाहीला सुरुवात झाल्यापासून त्यांनी विकासाचा मार्ग पकडला आहे. पाकिस्तान पेक्षा बांग्लादेशनं विकासाच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे. 2012 मध्ये बांग्लादेशची जीडीपी ग्रॉस सेव्हिंग्ज 39.9 तर पाकिस्तान 2012 मध्ये 20.4 आणि 2013 मध्ये 20.8 पाईंटस वर होता.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार 2010 पासून बांग्लादेशातील 80 लाख लोक दारिद्रय रेषेच्या वर आले आहेत. एवढंच नाहीत र देशातील नागरिकांच्या वैयक्तिक उत्पन्नात तीन पट वाढ झाली आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार येत्या 10 वर्षांमध्ये बांग्लादेश जगातील गरिबीशी संघर्ष करणाऱ्या देशांसाठी आदर्श उदाहारण ठरण्याची शक्यता आहे.

जीडीपीमध्ये पाकिस्तानला पछाडलं

2018 मधील अहवालानुसार 2017 मध्ये बांग्लादेशचं सकल राष्ट्रीय उत्पन्न 7.8 तर भारताचं 8 इतक होतं. दोन्ही देशांच्या तुलनेत पाकिस्तानचा जीडीपी 5.8 वर होता. देशातील प्रत्येक व्यक्तीवर असलेल्या कर्जाच्या बाबतीत बांग्लादेशमध्ये प्रति व्यक्तीवर 434 डॉलरचं कर्ज होतं तर पाकिस्तानत 974 डॉलर कर्ज प्रत्येक व्यक्तीवर होते. बांग्लादेशकडील विदेशी चलनाचा साठा देखील पाकिस्तानच्या चार पट वाढला आहे.2017 मध्ये बांग्लादेशकडे 32 बिलीयन डॉलर विदेशी चलन होते तर पाकिस्तानकडे 8 मिलीयन डॉलर विदेशी चलन होते.

बांग्लादेशच्या प्रगतीचं रहस्य

गेल्या काही वर्षांमध्ये बांग्लादेशनं केलेल्या प्रगतीचं रहस्य त्यांनी सामाजिकदृष्ट्या केलेली प्रगती हे आहे. बांग्लादेशात वाढलेल्या गुंतवणुकीमुळे कर्मचाऱ्यांची वाढलेली उत्पादकता, एनजीओजं काम या सर्वांमुळे बांग्लादेशनं प्रगती साधली आहे. आरोग्य सेवा, शाळा, बँका आणि डेअरी क्षेत्रातील वाढती प्रगती बांग्लादेशला पाकिस्तानच्या पुढे घेऊन जाणारी ठरली.

बांग्लादेशची झेप

जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीमध्ये बांग्लादेश 42 व्या क्रमांकावरून 26 व्या क्रमांकावर आला आहे.2017 मध्ये बांग्लादेशातील मानव विकास निर्देशांक 0.608 तर पाकिस्तान 0.560 वर होता. पाकिस्तानातील उत्पन्नातील विषमता 25.6 टक्के होती. जागतिक बँकेच्या अहवालानुसार बांग्लादेशनं साधलेल्या प्रगतीमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना विचार करावा लागणार आहे.

संबंधित बातम्या:

नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात उभी फूट, पंतप्रधान ओलींची स्वपक्षातूनच हकालपट्टी

कोरोना काळात कंपनीने नोकरीवरुन काढलं, काही दिवसातच महिला 437 कोटींची मालक

(How Bangladesh is taking over Pakistan in terms of economy)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.