5

कोरोना काळात कंपनीने नोकरीवरुन काढलं, काही दिवसातच महिला 437 कोटींची मालक

कोरोना काळात कंपनीने नोकरीवरुन काढलेल्या महिलेचं नशिब चांगलंच फळफळलं आहे. या महिलेला नोकरीवरुन काढल्यानंतर काही दिवसातच ही महिला कोट्याधीश झाली.

कोरोना काळात कंपनीने नोकरीवरुन काढलं, काही दिवसातच महिला 437 कोटींची मालक
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 8:31 PM

टोरंटो : कोरोना काळात कंपनीने नोकरीवरुन काढलेल्या महिलेचं नशिब चांगलंच फळफळलं आहे. या महिलेला नोकरीवरुन काढल्यानंतर काही दिवसातच ही महिला कोट्याधीश झाली. ती अचानक खेट तब्बल 437 कोटी रुपयांची मालक झाली. ही घटना घडलीय कॅनडामधील टोरंटो शहरात. या महिलेचं नशिब अचानक उजळलं असलं तरी यामागे तिच्या पतीचा अनेक वर्षांपूर्वीचा संकल्प आहे. हा संकल्प होता आपल्या लॉटरी तिकिटाच्या नंबरविषयीचा (Woman won lottery worth hundreds of crores rupees due to husband dream).

सीएनएन वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, 57 वर्षीय डेंग प्रवतुडोम यांना 437 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्यांच्या पतीला 20 वर्षांपूर्वी एक स्वप्न पडलं होतं. या स्वप्नात त्यांना काही क्रमांक दिसले. याच क्रमांकांमुळे डेंग यांना ही बंपर लॉटरी लागलीय. डेंग यांना दोन मुलं आहेत. मागील 20 वर्षांपासून त्या आपल्या पतीच्या स्वप्नातील आकड्यांप्रमाणे लॉटरीचं तिकिट विकत घेत होत्या. इतके वर्ष लॉटरी लागली नाही तरीही त्यांनी या आकड्यांचा पिछा काही सोडला नाही आणि आता त्यांना याचं फळ मिळालंय.

कॅनडाच्या ओंटरियो लॉटरी अँड गेमिंगने डेंग यांनी 437 कोटी रुपये जिंकल्याचं जाहीर केलंय. विशेष म्हणजे आपल्याला लॉटरीत इतकी मोठी रक्कम मिळाल्याची माहिती या महिलेला आपल्या पतीकडूनच मिळाली. डेंग म्हणाल्या, “437 कोटी रुपये जिंकल्याची बातमी ऐकून मी खूप आनंदी आहे. मला हे ऐकून अगदी रडूच आलं. सुरुवातीला तर माझा यावर विश्वासच बसला नाही.” डेंग यांना नुकताच एका व्हर्च्युअल कार्यक्रमात आपल्या लॉटरीच्या रकमेचा चेक देण्यात आला. डेंग आता या पैशातून सर्वात आधी स्वतःचं एक घर खरेदी करणार आहेत. त्यानंतर त्यांचं दुसरं स्वप्न आहे या पैशातून जग फिरायचं.

डेंग 40 वर्षांपूर्वी आपल्या 14 भाऊ बहिणींसोबत अमेरिकेतील लाओसमधून कॅनडाला आल्या. त्यानंतर कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घ्यावी लागली. मात्र, या लॉटरीनं त्यांचं आयुष्यच बदललं आहे.

हेही वाचा :

Trending | रात्री सहज उठला आणि बनला 75 कोटींचा मालक, जाणून घ्या संपूर्ण कहाणी

न विकलेल्या तिकिटाने नशीब फळफळलं, लॉटरी विक्रेताच बारा कोटींचा धनी

कोरोनाकाळात बेरोजगारीची कुऱ्हाड, भारतीय तरुणाला दुबईत सात कोटींची लॉटरी

व्हिडीओ पाहा :

Woman won lottery worth hundreds of crores rupees due to husband dream

Non Stop LIVE Update
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
AC Local वर दगडफेक, कांदिवली ते बोरिवली स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
इंडिया आघाडीची रॅली म्हणजे टोपी लावण्याचे काम? दीपक केसरकर म्हणाले...
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'सैन्य कशाला हवं, ...तरी राऊत पळून जातील', कुणी उडवली राऊतांची खिल्ली?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
'संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले की काय?', कुणी केला खोचक सवाल?
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
भुजबळांचा जरांगे यांना सल्ला; 'मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा...'
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'त्या' दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांचा उद्योगमंत्र्यांना खोचक सवाल
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
'ढेकणांना मारण्यासाठी लष्कराची गरज नसते', राऊतांवर कुणाचा निशाणा?
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
आदित्य ठाकरे यांना भाजपचा खोचक सवाल, 'अफझलखान तुमचा पाहुणा लागतो का?'
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...
शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून राऊत यांचं आव्हान काय? थेट म्हणाले...