AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाकाळात बेरोजगारीची कुऱ्हाड, भारतीय तरुणाला दुबईत सात कोटींची लॉटरी

मूळ केरळाचा रहिवासी असलेल्या 30 वर्षांचा नवनीत संजीवन अबुधाबीतील कंपनीत नोकरी करत होता.

कोरोनाकाळात बेरोजगारीची कुऱ्हाड, भारतीय तरुणाला दुबईत सात कोटींची लॉटरी
| Updated on: Dec 22, 2020 | 9:29 AM
Share

दुबई : कोरोना संसर्गाच्या काळात जगभरात अनेक जणांच्या नोकरीवर गदा आली. दुबईत राहणाऱ्या 30 वर्षांच्या तरुणावरही अचानक बेरोजगारीची वेळ आली. बायको आणि चिमुकल्या मुलाचं पोट भरायचं कसं, हा यक्ष प्रश्न केरळच्या नवनीत संजीवनसमोर (Navaneeth Sajeevan) उभा ठाकला होता. लॉटरीचं तिकीट काढून नवनीतने नशीब आजमावायचं ठरवलं. “देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के” या बॉलिवूड गाण्याची प्रचिती त्याला आली. कारण थोड्या-थोडक्या नव्हे, तर तब्बल सव्वासात कोटींची लॉटरी नवनीतला लागली आणि त्याचं नशीब फळफळलं. (Indian man in Lost job due to COVID in Abu Dhabi wins 1 million dollar Dubai raffle)

मूळ केरळाचा रहिवासी असलेल्या 30 वर्षांचा नवनीत संजीवन अबुधाबीतील कंपनीत नोकरी करत होता. मात्र कोव्हिडकाळात कंपनीला बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. नोटीस पिरीएडवर असलेला नवनीत नव्या नोकरीसाठी मुलाखत देत होता. त्याचवेळी एक फोन आला आणि त्याचं आयुष्य 360 अंशात फिरलं.

नोकरीच्या मुलाखतीवेळी लॉटरीचा फोन

आयुष्य पालटून टाकणारा हा फोन होता दुबई ड्युटी फ्रीमधून (Dubai Duty-Free (DDF). डीडीएफ मिलेनियम मिलियनेअर ड्रॉमध्ये (DDF Millennium Millionaire Draw) तुम्हाला एक मिलियन यूएस डॉलरची (USD 1 million) लॉटरी लागली आहे, असं त्याला सांगण्यात आलं. म्हणजेच अंदाजे सात कोटी 30 लाखांचीही लॉटरी. नवनीतचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना.

नवनीत संजीवन हा केरळातील कासारगोडचा रहिवासी. सध्या तो पत्नी आणि मुलासोबत अबुधाबीत राहतो. 22 नोव्हेंबरला त्याने रॅफल तिकीट ऑनलाईन विकत घेतलं. (Indian man in Lost job due to COVID in Abu Dhabi wins 1 million dollar Dubai raffle)

वीस लाखांचं कर्ज डोक्यावर

“माझी पत्नी अबुधाबीत नोकरी करते. मात्र मला मनाजोगता जॉब मिळाला नाही, तर घरी परतण्याचं नियोजन मी सुरु केलं होतं. माझ्यावर एक लाख दिरामचं (अंदाजे वीस लाख रुपये) कर्ज आहे. मात्र या लॉटरीमुळे मी ते फेडू शकेन” असं संजीवनने सांगितलं.

मेगा प्राईझ जिंकणारा 171 वा भारतीय

डीडीएफ मिलेनियम मिलियनेअर ड्रॉमध्ये अनेक वेळा भारतीय नागरिकांचं नशीब फळपळलं आहे. सात कोटींचं मेगा प्राईझ जिंकणारा संजीवन हा 171 वा भारतीय ठरला आहे.

दुबईहून भारतात परतलेल्या परापरंबील जॉर्ज वर्गीस यांना एप्रिल महिन्यात सात कोटींची लॉटरी लागली होती. मात्र कोरोनाच्या बंधनांमुळे ऑगस्टपर्यंत त्यांना भारतातून दुबईला जाताही आले नाही. चार दशकांपासून दुबईत राहणारे परापरंबील चार महिने आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होण्याची वाट पाहत राहिले.

संबंधित बातम्या :

दुबईत भारतीयाचं नशीब फळफळलं, बिग तिकिट ‘ड्रॉ’मध्ये तब्बल 24 कोटी रुपये जिंकले

(Indian man in Lost job due to COVID in Abu Dhabi wins 1 million dollar Dubai raffle)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.