Trending | रात्री सहज उठला आणि बनला 75 कोटींचा मालक, जाणून घ्या संपूर्ण कहाणी

Trending | रात्री सहज उठला आणि बनला 75 कोटींचा मालक, जाणून घ्या संपूर्ण कहाणी

लॉटरी आणि ट्रेडिंगची आवड असणाऱ्या एका व्यक्तीने 1 कोटी डॉलर्स म्हणजेच तब्बल 75 कोटी रुपये जिंकले आहेत. (lottery trading rupees)

prajwal dhage

|

Jan 23, 2021 | 8:15 AM

कॅनबेरा : कोणाच्या आयुष्यात कधी काय होईल याचा काही नेम नसतो. कधी कोणाच्या वाट्याला अचानकपणे न विसरता येणारं दु:ख येतं. तर कधी कोणाच्या वाट्याला गगनात न मावणारा आनंद. ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीच्या आयुष्यातही असाच एक अतिशय आश्चर्यकारक आणि अविस्मरणीय असा प्रसंग घडला आहे. लॉटरी (lottery) आणि ट्रेडिंगची (trading) आवड असणाऱ्या या व्यक्तीने 1 कोटी डॉलर्स म्हणजेच तब्बल 75 कोटी रुपये जिंकले आहेत. गुरुवारी लवकर झोपल्यामुळे रात्री उशिराने जाग आल्यानंतर सहज मेल चाळत बसल्यावर त्याला ही गोष्ट समजली. काही क्षणात करोडपती झाल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावत नाहीये. (A lottery and trading enthusiast has won 75 crore rupees)

मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीने प्रसिद्ध अशा पावरबॉल लॉरटीमध्ये पैसे गंतवले होते. पैसे गुंतवून तो विसरूनही गेला होता. मात्र, झोपेतून उठल्यावर मेल चेक करत असताना ही लॉटरी जिंकल्याचे त्याला समजले. अचानकपणे या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे त्याला आपल्यासबोत काय घडत आहे हे सुरुवातीला कळलंच नाही. पण नंतर अनेकवेळा शहानिशा केल्यानंतर आपण खरंच लॉरटी जिंकलो असून तब्बल 75 कोटी रुपयांचा गॅकपॉट लागण्यावर त्याला विश्वास बसला.

याविषयी बोलताना या व्यक्तीने आनंद गगनात मावत नसल्याचे सांगितले. “मी या लॉटरीमध्ये 10 हजार डॉलर जिंकले, असं मला सुरुवातील वाटलं होतं. मात्र, एवढी सारी रक्कम मी जिंकलो आहे. मला काय करु ते समजत नाहीये,” असं ही व्यक्ती म्हणाली.

यानंतरही काम करत राहणार

अशा प्रकारची लॉटरी किंवा जवळ एवढ्या प्रमाणात पैसे आल्यानंतर अनेकजण काम करणं सोडून देतात. पैशांची उधळपट्टी आणि मौजमजेकडे अनेकांचा कल असतो. मात्र राहत एवढे सारे रुपये जिंकलेलो असलो तरी यापुढेही काम करत राहणार असल्याचे या व्यक्तीने सांगितले. काम करण्याची आवड असल्यामुळे आणि घरी राहिलो तर उदासवणं वाटतं त्यामुळे तो त्याचे रोजचे काम वेळेवर आणि नियमितपणे करणार असल्याचे या व्यक्तीने सांगितले.

आई वडिलांसाठी घर घेणार

दरम्यान, तब्बल 75 कोटी रुपये जिंकल्यामुळे या व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक चणचण काही प्रमाणात कमी झाली आहे. त्याच्या सर्व अडचणी नाहीशा झाल्याचे तो सांगतो. तसेच, आलेल्या पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा आई-वडील आणि स्वत:साठी एक चांगलं घर खरेदी करण्याचं त्याचं स्वप्न आहे. सध्या या व्यक्तीच्या मनात अनेक गोष्टी आहेत. त्याला कित्येक गोष्टी करायच्या आहेत. मात्र, अचानपणे करोडपती होण्यावर अजूनही त्याला विश्वास बसत नाहीये.

संबंधित बातम्या :

‘दिल टूटा आशिक’ नावानं तरुणानं उघडलं चहाचं दुकान; लोकांची उसळली गर्दी

गावानं नाकारलं, देश स्वीकारणार, बारा मतदारांचे जाहीर आभार, लातूरच्या पठ्ठ्याचं बॅनर

एका क्षणात झाला करोडपती! मच्छिमाराच्या हाती काय लागलं हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल

(A lottery and trading enthusiast has won 75 crore rupees)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें