पाकिस्तान जिंदाबाद म्हणणे हा देशद्रोह?, वाचा कायदा काय म्हणतो?

prajwal dhage

|

Updated on: Jan 26, 2021 | 12:19 PM

पाकिस्तान जिंदाबाद म्हणणे खरंच देशद्रोह आहे का?, कायद्यामध्ये याबद्दल काही तरतूद आहे का? (Pakistan zindabad crime India)

पाकिस्तान जिंदाबाद म्हणणे हा देशद्रोह?, वाचा कायदा काय म्हणतो?
Follow us

मुंबई : पाकिस्तानसोबत भारताचे ताणलेले संबंध प्रत्येकालाच माहीत आहेत. पाकिस्तान देशाची वाहवा करणे म्हणजे आपल्या देशाबद्दल प्रेम नसणे असाही अर्थ आजकाल काढला जात आहे. ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हटलं तर कित्येजण आपल्याला देशद्रोही ठरवून टाकतात. मात्र, पाकिस्तान जिंदाबाद म्हणणे खरंच देशद्रोह आहे का?, कायद्यामध्ये याबद्दल काही तरतूद आहे का?, याबद्दल जाणून घेऊयात. (Is saying Pakistan zindabad crime in India)

पोलीस काय कारवाई करणार?

देशातील नागरिकाने पाकिस्तान जिंदाबाद म्हणणे यात काही गैर नाही. मात्र, असे प्रकार घडल्यास पोलिसांना कारवाई करण्याचे अधिकार दिलेले आहेत. असा प्रकार आढळल्यास पोलीस संशयिताला ताब्यात घेऊ शकतात.  पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तान जिंदाबाद म्हणण्यामागे नेमके कारण आहे?, याबद्दल ते विचारू शकतात. तसेच, पोलीस सर्व बाजूंनी चौकशीसुद्धा करु शकतात.

पोलीस अटक करु शकतात

पाकिस्तान जिंदाबाद अशा प्रकारची घोषणा देण्यामागे सुनियोजित कट असल्याची शंका आल्यास संबंधित व्यक्तीला पोलीस अटकही करु शकतात. फक्त घोषणा दिल्यामुळे अटक केली जाऊ शकत नाही, मात्र, त्यामागे एखादा सुनियोजित कट असेल तर पोलीस संबंधित व्यक्तीला अटक करु शकतात.

कोणता गुन्हा दाखल होणार?

पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिल्यानंतर शांतता भंग केल्याप्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करु शकतात. तसेच आयपीसीचे कलम 151 अंतर्गत पोलीस संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊ शकतात. अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला तरी, यामध्ये जामिन मिळू शकतो.

राजद्रोहाचा गुन्हा

पाकिस्तान जिंदाबाद म्हणण्यामागे खरंच काही घातपात करण्याचा विचार असेल तर अशा प्रकारामध्ये पोलीस राजद्रोहाचाही गुन्हा दाखल करु शकतात. आयपीसीचे कलम 124-ए नुसार हा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

तज्ज्ञ काय म्हणातात?

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर काय होऊ शकते या बद्दल सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन म्हणातात की, अशा प्रकारच्या घोषणा दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी इंडियन पिनल कोडमध्ये कोणतीही तरतूद नाही. तसेच, अमेरिका जिंदाबाद, ट्रंम्प जिंदाबाद म्हटल्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मग पाकिस्तान जिंदाबाद म्हटल्यावरचा का म्हणून कारवाई होईल, असा सवालही ते करतात. तसेच, पाकिस्तान जिंदाबाद म्हटल्यावर गुन्हेगारी कृत्य केले, असा त्याचा अर्थ होत नाही, असे बी. सुदर्शन म्हणतात.

दरम्यान, भारत देशाचे कोणते देश शत्रू आहेत, याबाबत सरकारला विचारण्यात आले होते. त्याला उत्तर देताना सरकारने आपल्या देशाचा कोणताही इतर देश शत्रू नसल्याचे सरकारने सांगितलेले आहे. त्यामुळे पाकिस्तान जिंदाबाद म्हणणे हा गुन्हा नसला तरी पोलीस विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करु शकतात.

संबंधित बातम्या :

Team India | जेव्हा शार्दुल, अजिंक्यचा दिवाना झाला पाकिस्तान

अब्जावधींची सोन्याची खाण बघून पाकिस्तानची नजर फिरली, पैशांच्या मोहात मोठी चूक, आता 44 हजार कोटींचा दंड

(Is saying Pakistan zindabad crime in India)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI