5

अब्जावधींची सोन्याची खाण बघून पाकिस्तानची नजर फिरली, पैशांच्या मोहात मोठी चूक, आता 44 हजार कोटींचा दंड

'परमेश्वर देतो, पण काहींना खाता येत नाही', अशा म्हणीप्रमाणे पाकिस्तानची गत झाली आहे (Gold mine in Pakistan).

अब्जावधींची सोन्याची खाण बघून पाकिस्तानची नजर फिरली, पैशांच्या मोहात मोठी चूक, आता 44 हजार कोटींचा दंड
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 3:55 PM

लाहौर : ‘परमेश्वर देतो, पण काहींना खाता येत नाही’, अशा म्हणीप्रमाणे पाकिस्तानची गत झाली आहे. निसर्गाने पाकिस्तानच्या हद्दीत जगातील पाचवी सर्वात मोठी सोन्याची खाण दिली. मात्र, या सोन्याच्या खाणीपाई पाकिस्तानची नजर फिरली. पाकिस्तानने या खाणीच्या उत्खननासाठी ज्या कंपन्यांशी करार केला होता लोभापाई त्यांनी ते करार पुढे रद्द केले. पाकिस्तानला त्याच्या या चुकीचं फळ आता भोगावं लागणार आहे. कारण वेस्ट इंडिजच्या एका कोर्टाने पाकिस्तान विरोधात मोठा निर्णय जाहीर केला आहे (Gold mine in Pakistan).

आर्थिक संकटात होरपळणाऱ्या पाकिस्तानाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. वेस्ट इंडिजच्या British Virgin Islands च्या एका कोर्टाने पाकिस्तान सरकारला तब्बल 6 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 44 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे कोर्टाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या फ्रान्स आणि अमेरिकेतील मालकी हक्काच्या इमारती जप्त होऊ शकतात (Gold mine in Pakistan).

पाकिस्तान सरकारने 28 वर्षांपूर्वी सोन्याचं उत्खनन करणाऱ्या कंपनींसोबत करार केला होता. मात्र, उत्खननात अब्जावधी डॉलरचे सोने मिळाल्यानंतर पाकिस्तान सरकारची नजर फिरली. पाकिस्तान सरकारने उत्खनन करणाऱ्या कंपन्यांसोबतचे सर्व करार रद्द केले. त्याप्रकरणी संबंधित कंपन्या कोर्टात गेल्या होत्या. याप्रकरणी कोर्टाने पाकिस्तानला दंड ठोठावला आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानच्या अमेरिका आणि फान्समधील संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यामध्ये पाकिस्तानच्या अमेरिकेतील रुजवेल्ट हॉटेल आणि पॅरिसमधील स्काईब हॉटेलचा समावेश आहे. कारण या दोन्ही हॉटेल पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय वैमानिक कंपनीच्या अंतर्गत असलेल्या एका कंपनीच्या मालकीच्या आहेत. या कंपनीचं नाव British Virgin Islands मध्ये रजिस्टर आहे.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. 

याआधी जागतिक बँकेनेदेखील सोन्याच्या खाणींवरुन पाकिस्तानला 5.9 अब्ज डॉलरचा दंड ठोठावला आहे. पाकिस्तानातील सोन्याच्या खाणीला आस्ट्रेलिया आणि चिलीच्या उत्खनन कंपन्यांनी खरेदी केले होते. हा करार सुरुवातीला पाकिस्तानच्या बलुचिस्तान सरकार आणि ऑस्ट्रेलियाची उत्खनन कंपनी ब्रोकेन हिल यांच्यात होता.

बलुचिस्तानात जगातील सर्वात मोठी पाचवी सोन्याची खाण

पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील रेको डिक ही खाण जगातील पाचवी सर्वात मोठी सोने आणि तांब्याची खाण आहे. सोन्याची खाण अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेजवळ आहे. या खाणीतून दरवर्षी दोन लाख टन कॉपर आणि अडीच लाख औंस सोनं काढलं जातं. या खाणीतून पाकिस्तानला दरवर्षी 3.64 अब्ज डॉलरचा फायदा होतो. विशेष म्हणजे पुढच्या 55 वर्षांपर्यंत या खाणीतून सोनं आणि तांबे काढले जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा : मी सुद्धा भरपूर खाज असलेला खासदार आहे; उदयनराजेंची फटकेबाजी

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, '... ते वेळीच थांबवलं पाहिजे'
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
वाघनखांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादादरम्यान शरद पवार म्हणाले...
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
शिवेंद्रराजेंचं चॅलेंज, म्हणाले, 'शिवरायांची वाघनखं खोटी असतील तर...'
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
'एकनाथ शिंदे हे वाघ', असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी कुणाला डिवचलं?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, कुणाची शिंदे सरकारवर टीका?
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
वंदेभारतची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार चकाचक
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
कोकणातील गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा बंद, काय कारण?
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
'मला आदू बाळ म्हटलं याचा अभिमान कारण...', आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, 'मी बालबुद्धीला उत्तर...'
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू
पावसानं बंद असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन हंगाम पुन्हा सुरू