Team India | जेव्हा शार्दुल, अजिंक्यचा दिवाना झाला पाकिस्तान

Team India |  जेव्हा शार्दुल, अजिंक्यचा दिवाना झाला पाकिस्तान
पाकिस्तानच्या क्रीडा विश्लेषकाकडून टीम इंडियाचं कौतुक

पाकिस्तानी विश्लेषकाकडून टीम इंडियाचं कौतुक करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

sanjay patil

|

Jan 21, 2021 | 4:33 PM

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानचे India vs Pakistan) संबंध हे फार तणावापूर्वक आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांवर टीका करण्यात येते. अशा प्रकारचे संबंध हे क्रिकेटबाबतीतही आहेत. पाकिस्तानचे अनेक आजी माजी क्रिकेटपटू (Cricket) तसेच त्यांचे क्रिकेट चाहते टीम इंडियावर (Team India) टीका करत असतात. मात्र आता उलट परिस्थिती पाहायला मिळत आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधात (Border Gavskar Trophy) ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचं चहुबाजुने कौतुक करण्यात आलं. त्यात आता भारतीय संघाचं पाकिस्तानच्या एका विश्लेषकाने प्रशंसा केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक क्रीडा विश्लेषक (Paksitani Sports Analyst टीम इंडियाच्या शार्दुल ठाकूर, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदरसह टीम इंडियाचे गुणगाण गात आहे. (Pakistan sports analyst praises Team India)

टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील वाहिनीने चर्चासत्राचं आयोजन केलं. या चर्चासत्रात अनेक तज्ज्ञ सहभागी झाले. यापैकी एका विश्लेषकाने भारताचं मनापासून कौतुक केलं.

व्हिडीओत काय म्हटलंय?

“नवख्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाची धुलाई केली. शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत या आणि इतर सर्व खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. वर्णभेदी टीका, दुखापतग्रस्त खेळाडू, नियमित कर्णधार मायदेशात परतलेला, असं सर्व काही प्रतिकूल असूनही ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवला. टीम इंडियाचा हा बेस्ट एवर मालिका विजय आहे”, असं हा विश्लेषक म्हणाला.

या विश्लेषकाने मोहम्मद सिराजंचही कौतुक केलं. “सिराजने विकेट्स घेतल्या. या दौऱ्यादरम्यान त्याच्या वडीलांचं निधन झालं. या मालिकेत सर्व काही घडलं. कसोटीमध्ये तुमच्यातील कौशल्याची कसोटी लागते. भारताने जोरदार कामगिरी केली. यामुळे मी भारताचा दिवाना झालोय”, अशी कबुली या विश्लेषकाने दिली.

दरम्यान या व्हिडीओवरुन दोन भूमिका पाहायला मिळत आहेत. अशाच प्रकारे पाकिस्तानचं कौतुक करण्याचं धाडसं कोणत्याही भारतीयात नाही, जर कोणी असं केलं तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशा कॅप्शनद्वारे हा व्हिडीओ एका युझरने शेअर केला आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 4th Test | नवखे खेळाडू कांगारुंवर भारी, शोएब अख्तरकडून टीम इंडियाच्या युवासेनेचं कौतुक

आधी मुंबई लोकलमधून पालघरला परतला, आता शार्दूल ठाकूर मुंबई विमानतळावरुन कुठे गेला?

घरी येताना चांगले कपडे घालून ये, बायकोच्या प्रश्नावर अजिंक्य क्लीन बोल्ड, म्हणाला….

(Pakistan sports analyst praises Team India)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें