प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानचा काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट

प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानचा काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवण्याचा कट पाकिस्तानने आखला आहे (Pakistan plans a terrorist attack in Jammu Kashmir on the occasion of republic day)

चेतन पाटील

|

Jan 19, 2021 | 9:21 PM

श्रीनगर : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवण्याचा कट पाकिस्तानने आखला आहे. पाकिस्तान लष्कारातील एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात अल-बद्र या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Pakistan plans a terrorist attack in Jammu Kashmir on the occasion of republic day).

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी अल-बद्रचे अतिरेकी आणि पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील फोनवरील चर्चेची ऑडिओ क्लिप मिळवली आहे. या चर्चेत ते काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवण्याचा डाव आखत असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल-बद्र दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांची एक टीम आणि त्या व्यतिरिक्त आणखी आठ अतिरेक्यांना गेल्या दोन महिन्यांपासून प्रशिक्षण दिलं जात आहे.

अल-बद्रचे अतिरेकी आयईडी हल्ल्यांमध्ये पटाईत असल्याची माहिती समोर येत आहे. आयएसआयचे दोन कर्नल, रॅक ऑफिसर कर्नल वसीम आणि कर्नल रियाज संबंधित अतिरेक्यांच्या गटाला प्रशिक्षण देत आहेत. हत्यारांचा वापर कसा करावा, मोठे स्फोटक हल्ले करण्यासाठी मिनी ड्रोनचा उपयोग कसा करावा, याबाबतचे प्रशिक्षण अतिरेक्यांना देण्यात येत आहे.

पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी ब्रिगेडियर काशिफ यांनी अलीकडेच छंब येथील टिल्ला परिसरातील दहशतवादी गटाच्या प्रशिक्षणाच्या प्रगतीची माहिती दिली. या गटाला स्फोटकांचा मुकाबला करण्यासाठी, आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे (Pakistan plans a terrorist attack in Jammu Kashmir on the occasion of republic day).

पोलीस प्रशासन सतर्क

गुप्तचर यंत्रणांकडून अतिरेकी हल्ल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. जम्मू-काश्मीरच्या महामार्गांवर जागोजागी चेकिंग केली जात आहे. सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व महत्त्वपूर्ण ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा : अहमदनगरमध्ये दरोड्याच्या प्रयत्नात भरदिवसा एका महिलेचा खून

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें