Bangladesh Eurofighter Typhoon : बांग्लादेशचा घातक युरोफायटर टायफून खरेदीचा प्लान, पण भारताला अजिबात चिंता करण्याची गरज नाही, कारण…

Bangladesh Eurofighter Typhoon : बांग्लादेशात अजून निवडणुका झालेल्या नाहीत. तिथे पाच वर्षांसाठी सरकार निवडून आलेलं नाही. मात्र सध्याच्या अंतरिम सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांना युरोपियन देशांकडून युरोफायटर टायफून हे घातक फायटर जेट खरेदी करायचं आहे. त्यामुळे भारताने चिंता करण्याची गरज आहे का? भारताकडे हे विमान पाडण्याची क्षमता आहे का?

Bangladesh Eurofighter Typhoon : बांग्लादेशचा घातक युरोफायटर टायफून खरेदीचा प्लान, पण भारताला अजिबात चिंता करण्याची गरज नाही, कारण...
Eurofighter Typhoon
Image Credit source: wikipedia
| Updated on: Dec 23, 2025 | 2:15 PM

बांग्लादेशात मागच्यावर्षी मोठं जनआंदोलन झालं. त्यातून शेख हसीना यांना सत्तेवरुन पायउतार व्हाव लागलं. तेव्हापासून बांग्लादेशची पावलं सातत्याने भारताविरोधात पडत आहेत. बांग्लादेशचे सध्याचे सत्ताधारी पाकिस्तानच्या नादाला लागले आहेत. त्यातून अनेक भारताच्या हिताला दुखावणारे निर्णय घेण्यात आले. आता बांग्लादेशला आपल्या एअरफोर्सचं आधुनिकीकरण करायचं आहे. यासाठी बांग्लादेश चांगल्या फायटर जेट्सच्या शोधात आहे. बांग्लादेश आधी चीनची J-10C फायटर विमानं खरेदी करण्यात इंटरेस्टेड आहे अशा बातम्या आल्या होत्या. पण बांग्लादेशने आता आपला मोर्चा युरोफायटर टायफूनकडे वळवला आहे. युरोफायटर टायफून हे 4.5 जनरेशनचं घातक फायटर विमान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या राफेलचा मुख्य स्पर्धक म्हणून युरोफायटर टायफूनकडे पाहिलं जातं. युरोपातील काही देशांनी एकत्र येऊन या फायटर जेटची निर्मिती केली आहे. बांग्लादेशने आता युरोफायटर टायफूनच्या खरेदीत रस दाखवला आहे. ही विमानं खरेदी करण्याची आपली इच्छा आहे. त्यासाठी चर्चा सुरु करावी अशा मजकूराचं पत्र त्यांनी इटलीला पाठवलं आहे. भारताने काही...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा