
15 वर्षाच्या गृह युद्धानंतर बाशर अल-असाद यांना सत्तेवरुन बेदखल करण्यासाठी फक्त 15 दिवस लागले. रविवार 8 डिसेंबरला बंडखोरांच्या फौजांनी सीरियाची राजधानी दामास्कसवर ताबा मिळवला. बंडखोरांनी सीरियाच्या राजधानी प्रवेश करताच बाशर अल-असाद कुटुंबियांसह देश सोडून पळून गेले. ते रशियात आश्रयाला गेल्याची दाट शक्यता आहे. कारण सीरियाच हे गृहयुद्ध इतकी वर्ष खेचलं गेलं, बाशर आपली सत्ता टिकवू शकले ते रशियाच्या मदतीमुळेच. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या संघर्षात त्यांना साथ दिली. पण रशिया आता आपल्या युद्धात अडकला आहे. इराणचा इस्रायलबरोबर संघर्ष सुरु आहे. युक्रेन युद्ध अजून कधीपर्यंत चालेल हे सांगता येत नाही. त्यामुळे बंडखोरांच्या फौजा सीरियामधील एक-एक शहर ताब्यात घेत असताना रशिया आणि इराणकडून बाशर यांना मदत मिळू शकली नाही. बंडखोरांच सैन्य सीरियामधील एक-एक शहर ताब्यात घेत असताना सीरियन सैनिकांनी शस्त्र टाकण्यास सुरुवात केली. अखेर बंडखोरांनी दमास्कसमधून सीरिया ताब्यात घेतल्याचा काल संदेश दिला....