
एकीकडे बांगलादेशच्या पीएम शेख मेहबुबा पदच्युत झाल्यानंतर भारत आणि बांगलादेशातील संबंध तितकेचे चांगले राहीलेले नाहीत. तेथील अंतरिम सरकारने देखील भारतावर टीका करणे सुरु ठेवले आहे. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्याला लागून असलेल्या बांगलादेशाच्या सुखदेव सीमेवर भारत आणि बांग्लादेश यांच्या सीमेवर शनिवारी जोरदार चकमक उडाली आहे. काही लोक बांगलादेशची सीमा ओलांडून घुसखोरी करीत होते. त्यावेळी सुखदेवपुरच्या गावकऱ्यांनी बांगलादेशी नागरिकांचा पाठलाग केला, तेव्हा दोन्ही गटात मोठी दगडफेक झाली. परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर बीएएसएफने अश्रुधऱांच्या नळकांड्या फोडत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
शुक्रवारी रात्रीपासून बांगलादेश आणि भारत सीमेवर मोठा तणाव आहे. आता स्थिती तणावाची असली तरी नियंत्रणात आहे. दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यात मोठी चकमक उडाली आहे. परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर बीएसएफ अश्रुधरुच्या नळकांड्या फोडत परस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. बांगलादेशातील सीमावर्ती भागातील शेतकरी पळून गेले आहेत. याआधी बीजीबीने सीमांवर काटेरी कुंपण घालायला वारंवार विरोध केला होता.
बीएसएफने प्रसिद्धी पत्रक जारी करीत शनिवारी सकाळी ११.४५ वाजता ११९ व्या वाहिनीच्या सीमाचौकी सुखदेवपूरच्या भारत आणि बांगलादेशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय आणि बांगलादेश शेतकऱ्यांमध्ये छोट्याशा कारणावरुन वादंग निर्माण झाला आहे. हा प्रकार तेव्हा झाला तेव्हा काही भारतीय शेतकरी नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असणार्या शेतात काम करण्यासाठी पुढे गेले होते.
भारतीय शेतकऱ्यांनी बांगलादेशच्या शेतकऱ्यांवर पिक चोरल्याचा आरोप केला आहे.ज्यामुळे दोन्ही देशांच्या शेतकऱ्यांमध्ये वाद झाला.या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही बाजूने मोठा जमाव जमल्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करणे सुरु झाले.त्यानंतर एकमेकांवर दगड फेक केल्याचा आरोप दोन्ही गटांनी केला आहे. सीमेवर अनेक भागात तारांचे कुंपण नसल्याने भारतीय शेतकरी दूरपर्यंत सीमेपलिकडील आपल्या शेतात जात असतात.