
बांगलादेशमध्ये महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, बांगलादेशात सध्या हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध आणि अन्य अल्पसंख्यांक समाजाच्या महिला आणि मुलांना टारगेट केलं जात आहे, बांगदेशात सध्या मुहम्मद यूनुस यांचं सरकार आहे, या सरकारच्या काळात ही परिस्थिती एवढी भीषण बनली आहे की, ती एखाद्या महामारीसारखी झपाट्यानं वाढत आहे. बांगलादेशमधील मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून याबाबतची एक धक्कादायक आकडेवारी सादर करण्यात आली आहे.
या आकडेवारीनुसार 2025 च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये देशात तब्बल 342 बलात्कार प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे, हा आकडा आणखी देखील मोठा असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या महिलांवर अत्याचार झाला, त्यातील जवळपास 87 टक्के महिलांचं वय हे 18 वर्षांपेक्षा कमी आहे. आरोपींकडून मुलांना देखील टार्गेट करण्यात आलं आहे, ज्यामध्ये सहा वर्षांच्या मुलांचा देखील समावेश आहे. तर दुसरीकडे सामूहिक बलात्कारासारख्या गंभीर गु्न्ह्यांचं प्रमाणत देखील देशात प्रचंड वाढलं आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित महिला देखील अल्पवयीन आहेत.
मानवअधिकार संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 342 हा केवळ एक छोटा आकडा आहे, देशभरात असे हजारो प्रकरणं घडले आहेत, मात्र भीतीपोटी अनेकांनी तक्रारच दिलेली नाहीये. ज्या महिलांवर अत्याचार झाला, त्यांना येथील पोलीस यंत्रणेवर आणि न्यायव्यवस्थेवर आता विश्वास राहिलेला नाहीये, त्यामुळे अनेक जण तक्रार देणं टाळतं असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ज्या महिलांवर अत्याचार झाला आहे, त्यातील अनेक महिलांचे तर मृतदेहच मिळाले आहेत, त्यांच डोकं त्यांच्या शरीरापासून वेगळं करण्यात आलं आहे, त्यांचं मुंडक गायब आहे. मुंडकं नसलेल्या अनेक महिलांचे मृतदेह बांगलादेशमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे या महिलांची ओळख पटवण्याचा मोठं आव्हान येथील पोलीस यंत्रणेसमोर निर्माण झालं आहे. बांगलादेशात सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.