भारताचा मोठा विजय, भारतीयांना जे हवे ते अखेर मिळालेच… अमेरिकेतून आनंदाची बातमी, थेट..

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात असल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, आता अनेक महिन्यांनंतर अमेरिकेतून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी आल्याचे बघायला मिळत आहे.

भारताचा मोठा विजय, भारतीयांना जे हवे ते अखेर मिळालेच... अमेरिकेतून आनंदाची बातमी, थेट..
US india
| Updated on: Jan 24, 2026 | 12:48 PM

भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला. फक्त टॅरिफच नाही तर अनेक निर्बंधही लादली. कोणत्याही पद्धतीने  भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, याकरिता अमेरिकेचा दबाव भारतावर राहिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक धमक्यांनंंतरही भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली नाही यामुळे भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला. त्यानंतर भारताने जवळपास रशियाकडून तेल खरेदी कमी केली. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशिया युक्रेन युद्ध सुरू असल्याचाही गंभीर आरोप अमेरिकेने भारतावर केला. मात्र, रशियाकडून सर्वात जास्त तेल खरेदी करणारा देश चीन आहे. मात्र, चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ अमेरिकेने लावला नाही. ज्यामुळे अमेरिकेची दुटप्पी भूमिका पुढे आली. चीन अजूनही रशियाकडून तेल खरेदी करतो. मात्र, भारताने तेल खरेदी बंद केली.

भारताने आपल्या देशाची ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी इतर पर्याय निवडले आहेत. इतर देशांकडून तेल खरेदी भारताकडून केली जात आहे. भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू होती. मात्र, काही मार्ग निघू शकला नाही. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय मार्केट हवे आहे. मात्र, यातून भारतीय शेतकऱ्यांच नुकसान होण्याची शक्यता असल्याने भारताकडून सावध भूमिका घेतली जात आहे.

शिवाय जर तुम्हाला व्यापार करार करायची असतील तर टॅरिफ 19 टक्क्यांपेक्षा कमी असला पाहिजे, ही भारताची भूमिका आहे. आता भारतावरील टॅरिफचे संकट दूर होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेतून भारतासाठी चांगली बातमी पुढे येताना दिसत आहे. कोणत्याही क्षणी भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ कमी होऊ शकतो. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी भारताच्या टॅरिफबद्दल मोठे विधान केले. बेसेंट यांनी म्हटले की, भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हटवण्याचा विचार आम्ही करत आहोत.

त्यांनी स्पष्ट म्हटले की, ज्या उद्धेशासाठी भारतावर टॅरिफ लावला होता, तो आता पूर्ण झाला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता आम्ही त्यांच्यावर टॅरिफ लावला होता. आता तो उद्देश पूर्ण झाला. हे मोठे यश आहे. आमच्या या पावलाने भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली. त्यामध्ये 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ कमी केला जाऊ शकतो. टॅरिफ सध्या आहे पण भारतावरील टॅरिफ कमी करण्यासाठी महत्वाचा मार्ग मिळाला आहे.