भारतावर टॅरिफपेक्षाही भयानक संकट, खळबळ उडवणारी मोठी अपडेट; थेट अमेरिकेतून…
अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलेला आहे. या टॅरिफमुळे भारताचे काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. असे असतानाच आता भारतावर टॅरिफपेक्षाही मोठे संकट असल्याचे संगितले जात आहे.

Tariffs On India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलेला आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याचे थांबवावे तसेच व्यापार तूट भरून काढण्यासाठीच अमेरिकेने हा टॅरिफ लागू केलेला आहे. विशे, म्हणजे हा टॅरिफ अजूनही मागे घेण्यात आलेला नाही. अमेरिकेच्या या टॅरिफ बॉम्बनंतर भारताच्या निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम झालेला आहे. परंतु भारताने नवी बाजारपेठ शोधून टॅरिफमुळे होणारा आर्थिक तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे असतानाच आता भारतापुढे टरिफपेक्षाही मोठे संकट उभे असल्याचे सांगितले जात आहे. या एका संकटामुळे भारताच आर्थिक, पार्यावरण, मनुष्यबळ अशा सर्वच पातळ्यांवर मोठा तोटा होत असल्याचे म्हटले जात आहे.
भारतापुढील सर्वात मोठे संकट कोणते?
भारतीय वंशाच्या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि हार्वर्ड विद्यापठातील प्राध्यापक गीता गोपीनाथ यांनी भारतापुढे असलेल्या संकटावर भाष्य केले आहे. त्यांच्या मतानुसार अमेरिकेने लादलेल्या टॅरिफपेक्षाही भारतावरील हे संकट मोठे आहे. हे संकट म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून प्रदूषण आहे. भारतात दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे या वाढत्या प्रदूषणाचा भारताला मोठा फटका बसत आहे, असे मत गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केले आहे. या प्रदूषणामुळे भारताच्या विकासावर हळूहळू नकारात्मक परिणाम पडतोय. तसेच भारतापुढे हे एक मोठे आव्हान बनून उभे राहात आहे. प्रदूषण वाढत असल्याने भारताचा आर्थिक खर्चही वाढत आहे. यासोबतच त्याचा मानवी जीवनावर परिणाम पडतोय, असेही गोपीनाथ यांनी सांगितले. त्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये बोलत होत्या.
दरवर्षी 17 लाख मृत्यू
व्यापार, टॅरिफ तसेच अन्य नियमांची तर मोठी चर्चा होते. परंतु प्रदूषणावर फारच कमी लोक बोलतात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. भारताच्या अर्थव्यवस्थेवर प्रदूषणाचा होणारा नकारात्मक परिणाम सांगण्यासाठी गीता गोपीनाथ यांनी जागतिक बँकेच्या 2022 सालाच्या एका रिपोर्टचा दाखला दिला. या रिपोर्टनुसार भारतात दरवर्षी 17 लाख मृत्यू हे प्रदूषणामुळे होतात. यामुळे अर्थव्यवस्था, मनुष्यबळ, दीर्घकालीन विकास यावर परिणाम पडतो, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
