
जगातील सर्वात महागडं घर कोणतं माहीत आहे का? तुम्हाला जर असा प्रश्न केला तर तुम्ही थेट रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांचं नाव घ्याल. त्यांचं मुंबईतील अँटालिया हे अलिशान घर जगातील सर्वात महागडं असल्याचं तुम्ही सांगाल. कारण अँटालियाची किंमत 12 हजार कोटी आहे. जगभरातून साहित्य मागवून अँटालियाची 27 मजली इमारत उभी राहिलेली आहे. एखाद्या राजमहालालाही लाजवेल असं हे घर आहे. पण अँटालिया हे जगातील सर्वात महागडं घर असलं तरी ते दुसऱ्या क्रमांकाचं महागडं घर आहे. ब्रिटनच्या शाही घराण्याचा बकिंगहॅम पॅलेस हे जगातील सर्वात महागडं घर आहे. या पॅलेसचं गार्डनच लंडनमधील सर्वात मोठं खासगी गार्डन आहे.
बकिंगहॅम पॅलेस हे जगातील सर्वात महागडं आणि मोठं घर आहे. त्यामुळे या घराची खासियतही तशी वेगळीच आहे. या घराचं सौंदर्य जगातील एक आश्चर्यच मानलं जातं. अत्यंत सुंदर आणि अलिशान असा हा प्रासाद आहे. या घराचं सौंदर्य पाहिल्यानंतरच हे घर किती यूनिक आणि महागडं असेल याचा अंदाजा येतो.
बकिंगहॅम पॅलेस हे जगातील मौल्यवान घर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या या शाही कुटुंबाच्या घराची किंमत 2.24 बिलियन अमेरिकन डॉलर आहे. म्हणजे भारतीय रुपयानुसार 1,90,54,52,14,496.00 इतकी किंमत या घराची आहे. कोरोना काळापूर्वी या घराची किंमत 100 मिलियन पाऊंड होती.
आतून आणि बाहेरून हे घर अत्यंत सुंदर आणि आलिशान आहे. या घरात 775 खोल्या आहेत. त्यातील 52 शाही खोल्या आहेत. बकिंगहम पॅलेस एवढा मोठा आहे की या घरात 350 घड्याळं लावलेली आहेत. या घरात 40 हजार लाईट्स लावल्या आहेत. या जगातील सर्वात महागड्या घराला 1514 दरवाजे आहेत.
बकिंगहॅम पॅलेमध्ये सेव्हन स्टार हॉटेलाप्रमाणे सर्व सुविधा आहेत. या महालाचं खास वैशिष्ट्ये म्हणजे याच्या बेसमेंटमध्ये एटीएम मशीन लावलेली आहे. केवळ राजघराण्याशी संबंधित लोकांच्या वापरासाठीच ही मशीन आहे.
हे घर काल परवाचं नाहीये. हे घर 319 वर्ष जुनं आहे. या घराला मोठा इतिहास आहे. हे घर 1703 मध्ये बनवलं गेलं होतं. जगातील हे सर्वात जुनं आणि ऐतिहासिक परंपरा असलेलं घर आहे. हे घर म्हणजे नुसतं घर नाही, तर ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार आहे.
बकिंगहॅम पॅलेस अनेक एकरावर पसरलेलं आहे. या पॅलेसचं गार्डनही भलं मोठं आहे. बकिंगहॅम पॅलेसचं गार्डन हे लंडनमधील सर्वात मोठं खासगी गार्डन आहे.