
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तान देशात दहशतवादी पोसले जातात. मुंबई, पहलगामवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानमधूनच दहशतवादी भारतात आले होते. पाकिस्तान गेल्या कित्येक दिवसांपासून दहशतवाद पोसत आला आहे. दरम्यान, आता याच दहशतवादामुळे खुद्द पाकिस्तानचेदेखील मोठे नुकसान होत आहे. बलूचिस्तान लिबरेशन फ्रंट (BLF), तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या सारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानवर हल्ले करत आहेत. नुकतेच बलुचिस्तान लिबरेशन फ्रँट या दहशतवादी संघनटेने पाकिस्तानवर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तान सैन्याचे 5 दहशतवादी जागीच ठार झाले आहेत. दोन पाकिस्तानी जवानांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर भारताविरोधात कारवाया करण्यासाठी दहशतवाद्यांना पोसतो. आता मात्र हेच दहशतवादी मुनीरपुढे मोठं संकट म्हणून उभे राहिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्यावर बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेने मोठा हल्ला केला आहे. हा हल्ला सोमवारी (20 ऑक्टोबर) झाला असून यात 5 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. तर दोन सैनिकांची प्रकृती गंभीर आहे. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. 20 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता हा हल्ला झाला. बलुचिस्तानातील मंड या भागातील माहीर आणि रुदिग या परिसरात हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला करताना बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तान अर्धसैनिक बलाच्या जवानांच्या वाहनाला लक्ष्य केले.
याआदी 19 ऑक्टोबर रोजीदेखील खैबर पख्तुनख्वा येथे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या संघटनेच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सेनेवर हल्ला केला होता.. या हल्ल्यातही 5 पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. टीटीपीच्या दहशतवाद्यांनी डेरा इस्माईल जिल्ह्यातील सुई नॉर्दन गॅस पाईपलाईन उडवून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भविष्यात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी तेथील सुरक्षा वाढवण्यात आली होती. याच भागात तैनात असलेल्या सैनिकांवर टीटीपीच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात पाच पाकिस्तानी सैनिक मारले गेले. तर पाकिस्तानी लष्कराच्या माहितीनुसार सैनिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात 8 दहशतवादी ठार झाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतावर दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या पाकिस्तानालाही आता दहशतवादीची झळ पोहोचत आहे. दहशतवाद्यांच्या उच्छादामध्ये पाकिस्तानी सैनिक मारले जात आहेत. त्यामुळे पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यापुढे या दहशतवादी कारवाया थांबवण्याचे मोठे आव्हान आहे.