US Vs Iran : दररोज 4000 कोटी रुपयांचे नुकसान, अमेरिकेच्या त्या निर्णयाने हाहाकाराला सुरूवात, थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात भडका उडताना दिसत आहे. इराणविरोधात मोठी चाल अमेरिकेने खेळली आहे. ज्यामुळे त्याचा फटका थेटपणे इराणच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो. तणाव वाढताना दिसत आहे. युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही.

US Vs Iran : दररोज 4000 कोटी रुपयांचे नुकसान, अमेरिकेच्या त्या निर्णयाने हाहाकाराला सुरूवात, थेट..
Blockade in the Strait of Hormuz
| Updated on: Apr 14, 2026 | 9:22 AM

इराण आणि अमेरिका युद्धात मोठा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. तेलाचे संकट आहे. 21 तास इस्लामाबादमध्ये युद्धबंदी करार बैठक चालली, पण यश मिळाले नाही. या बैठकीत काहीतरी तोडगा निघेल, असे सांगितले जात होते. मात्र, अपयश आले. इराण आणि अमेरिका दोन्ही देश युद्धात माघार घेत नाहीत. याचा फटका जगाला बसत आहे. त्यामध्येच अमेरिकेने इराणच्या होर्मुज खाडीत तटबंदी केली. या तटबंदीमुळे खळबळ उडाली. इराणचे यामुळे नुकसान होणार हे स्पष्ट आहे. यामुळे युद्ध कमी होण्याऐवजी अधिक भडकण्याची शक्यता आहे. नुकताच धक्कादायक रिपोर्टपुढे आला. इराणचे अमेरिकेच्या तटबंदीमुळे एका दिवशी 4,000 कोटींपेक्षा अधिक नुकसान होणार. हा इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का मानले जात आहे. इतक्या मोठ्या युद्धात इराण ताट उभा होता. मात्र, आता इराणच्या अर्थव्यवस्थेवर घाव देण्याचे काम अमेरिकेने केले.

13 एप्रिल रोजी अमेरिकेकडून नाकेबंदीची घोषणा करण्यात आली. एका रात्रीत त्यांनी सर्व नाकेबंदी केली. या नाकेबंदीमुळे इराणचे प्रत्येक दिवशी 435 मिलियन डॉलरचे नुकसान होईल. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटले आहे, ही नौदल नाकेबंदी इराणच्या बंदरांमध्ये आणि अरबी आखात यासोबतच ओमानच्या आखातासह किनारी भागांमध्ये प्रवेश रोखण्याकरिता करण्यात आली.

तज्ज्ञांचे मत आहे की, ही नाकेबंदी इराणला जास्त धोकादायक आहे. त्यांना थेटपणे फटका बसू शकतो. एफडीडी या परराष्ट्र धोरण संस्थेचे वरिष्ठ फेलो, मियाद मलेकी यांनी म्हटले की, अमेरिकेच्या या निर्णयाचा इराणवर होणारा आर्थिक परिणाम तात्काळ आणि गंभीर असू शकतो. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर स्पष्टपणे आपले मत मांडले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटले की, होर्मुज खाडीत अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे इराणचे 276 मिलियन डॉलर नुकसान होऊ शकते. हे नुकसान एका दिवसाचे असेल. दररोज होणाऱ्या या नुकसानामुळे इराणची अर्थव्यवस्थाही धोक्यात येऊ शकते. आता यावरून इराण नक्की काय मार्ग काढतो, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us