AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात हाहाकार! अमेरिका इराण युद्धात थेट हा देश उतरणार मैदानात? मोठी खळबळ, इशारा देत..

इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळले जात आहे. स्थिती भयंकर आणि गंभीर आहे. त्यामध्येच अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाने जगाचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुज खाडीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

जगात हाहाकार! अमेरिका इराण युद्धात थेट हा देश उतरणार मैदानात? मोठी खळबळ, इशारा देत..
Iran and America war
| Updated on: Apr 14, 2026 | 8:41 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. अमेरिकेने मोठे हल्ले करण्याची धमकी इराणला दिली. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांसोबतच मोठा पुलांना टार्गेट करून हल्ले केले जाणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी मोठी पलटी मारली. थेट दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा केली. इस्लामाबादमध्ये झालेल्या शांतता करार बैठकीत काही यश मिळाले नाही. इराण आपल्या काही मागण्यांवर ठाम आहे. होर्मुज खाडीत अमेरिकेने नाकेबंदी केली. अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणने सर्वात अगोदर होर्मुज खाडी बंद केली. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देश संकटात आहेत. इराणकडून फक्त आपल्या मित्र देशांचे जहाज सोडले जात आहेत. युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणकडून काही काळाकरिता होर्मुज खाडी खुली करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर इस्त्रायलने लेबनॉनवर हल्ले केले. लगेचच इराणकडून पुन्हा होर्मुज खाडी बंद करण्यात आली.

चीनने अमेरिकेला होर्मुज खाडीतील नाकेबंदी न करण्याचा आणि चीन इराण यांच्यातील संबंधात हस्तक्षेप न करण्याचा मोठा इशारा दिला. अमेरिकेच्या नौदलाने नाकेबंदी सुरू केल्यानंतर लगेचच चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून यांनी थेट म्हटले की, आमचे इराणसोबत व्यापार आणि ऊर्जेचे जुने संबंध आहेत. त्यामुळे अमेरिकेने आमच्या अंतर्गत बाबी अजिबात ढवळाढवळ करू नये.

अमेरिका यात लक्ष घालणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही, अशी नक्कीच अपेक्षा आहे, असे चीनने स्पष्ट शब्दात म्हटले. ज्या प्रकारे अमेरिका होर्मुज खाडीत घुसखोरी करत आहे, हे कोणालाही अजिबात पटत नाही. अमेरिकेच्या तटबंदीमुळे स्थिती अधिक बिघडू शकते, असा अंदाज आहे.

इराण होर्मुज खाडी शुल्क आकारत असल्याने अमेरिकेने हस्तक्षेप घेतला. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, इराणसोबतचे युद्ध आम्ही जिंकले आहे. यामुळे होर्मुज खाडीत शुल्क आकारण्याचा अधिकार आमचा आहे. होर्मुज खाडी स्वत: कडे घेण्याकरिता अमेरिकेकडून विविध योजना आखण्यात आल्या. मात्र, त्यांना अपयश मिळाले.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?