AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात खळबळ, रशियाने उडवली अमेरिकेची झोप, थेट चीनलाच…

इराण आणि अमेरिका युद्ध पेटलेले असून चर्चेतून मार्ग काही निघत नाहीये. यादरम्यानच अमेरिकेने थेटपणे चीनला मोठी धमकी दिली. चीन इराणला मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला. रशियाने अत्यंत मोठा गेम खेळल्याचे बघायला मिळत आहे.

जगात खळबळ, रशियाने उडवली अमेरिकेची झोप, थेट चीनलाच...
Donald Trump and Vladimir Putin
| Updated on: Apr 13, 2026 | 8:00 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मे महिन्यात चीनला भेट देणार होते. मात्र, इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला चीन साथ देत नसल्याने ते नाराज आहेत. होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता त्यांनी चीनला मदत मागितली होती. पण चीन काही त्यांच्या मदतीकरिता पुढे आला नाही. उलट चीनकडून इराण आणि आमच्या नात्यात हस्तक्षेप करू नये, असा थेट इशाराच देण्यात आला. नेमक्या याच वेळी इराणसोबतच्या करारावर चर्चा सुरू होती. चीनने या युद्धात भारतासारखेच आपली भूमिका स्पष्ठ ठेवली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन भेटी अगोदरच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोठा गेम खेळल्याचे बघायला मिळत आहे. पुतिन यांनी ट्रम्प यांना धोबीपछाड करण्याकरिता थेट रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांना चीनच्या दाैऱ्यावर पाठवत आहेत.

लावरोव्ह हे रशियाचे सर्वात मुरब्बी आणि अनुभवी राजनैतिक मानले जातात. त्यांचा हा चीनचा दाैरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. रशियाच्या न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, लावरोव्ह हे 14 ते 15 एप्रिल रोजी बीजिंगमध्ये असतील. त्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर म्हणजेच 14 ते 15 मे रोजी डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या दाैऱ्यावर येणार आहेत. म्हणजे हा दाैरा डोनाल्ड ट्रम्प यांचा नियोजित दाैरा आहे.

पण काही दिवसांपूर्वी त्यांनी या दाैऱ्याबद्दल भाष्य करत वेगळेच संकेत दिले जाते. जर चीनने काही गोष्टी ऐकल्या नाही तर दाैरा पुढे ढकलू. डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दाैऱ्यावर जाऊ किंवा नाही पण रशियाने आपला गेम खेळला आहे. ट्रम्प यांनी चीनवर जकातींचा बडगा उगारला आणि त्या धमकीचे पडसाद शांत होण्याआधीच मॉस्कोने घोषणा केली की, सर्गेई लावरोव्ह बीजिंगला जात आहेत.

हा केवळ एक योगायोग असू शकत नाही. ही रशियाची एक अत्यंत विचारपूर्वक केलेली प्रति-चाल आहे. हा नक्कीच मोठा धक्का डोनाल्ड ट्रम्प यांना म्हणावा लागेल. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांचा दौरा हा वाटाघाटींसाठीचा एक मंच असेल. त्यांनी थेट धमकी दिली की, जर चीनने इराणला शस्त्रे पाठवली, तर ते चिनी वस्तूंवर तब्बल 50 टक्के शुल्क लावतील. या दरम्यानच रशियाने थेट सर्गेई लावरोव्ह यांच्या चीनच्या दाैऱ्याची घोषणा केली.

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत