ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता, 100 हून अधिक खासदारांचा बंड..

ब्रिटीशमध्ये मोठी खळबळ उडाली. एका वृत्तानुसार, पंतप्रधान कीर स्टार्मर आपल्या राजीनाम्याची घोषणा करू शकतात आणि 'डाऊनिंग स्ट्रीट' सोडण्याबाबतचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करू शकतात. हा मोठा भूकंप म्हणावा लागणार आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता, 100 हून अधिक खासदारांचा बंड..
British Prime Minister Starmer
| Updated on: Jun 21, 2026 | 9:58 AM

ब्रिटीशमध्ये मोठी खळबळ उडाली. ब्रिटीश वृत्तपत्र ‘द ऑब्झर्व्हर’च्या एका वृत्तानुसार, पंतप्रधान कीर स्टार्मर आपल्या राजीनाम्याची घोषणा करू शकतात आणि ‘डाऊनिंग स्ट्रीट’ सोडण्याबाबतचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करू शकतात. ब्रिटीशमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अखेर ते आपल्या राजीनामा लवकर देऊ शकतात. यादरम्यान ते देशातील जनतेसोबत संवादही साधू शकतात. ब्रिटीश वृत्तपत्र ‘द ऑब्झर्व्हर’ दावा केला की, पंतप्रधान कीर स्टारमर आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, तर दुसरीकडे पंतप्रधानांच्या जवळच्या लोकांनी हा दावा खोटा असल्याचाही दावा केला. त्यांचे म्हणणे आहे की, पंतप्रधान स्टार्मर यांचे सध्याचे संपूर्ण लक्ष देश चालवणे आणि त्यांच्या कामावर आहे. 19 जून रोजी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी अँडी बर्नहॅम यांनी संसदीय निवडणूक जिंकली.

या विजयानंतर बर्नहॅम यांना स्टार्मर यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संकटात असलेल्या कीर स्टार्मर यांची समस्या अधिक वाढली. पंतप्रधान स्टार्मर सध्या त्यांच्या चेकर्स या अधिकृत ग्रामीण निवासस्थानी आहेत. काही निर्णय घेण्यापूर्वी ते तिथे आपल्या पत्नीसोबत सर्व मुद्द्यांवर अगोदर चर्चा करतात.

लेबर पार्टीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनाही असे वाटते की, सोमवारपर्यंत स्टार्मर यांच्या मोठा निर्णय घेऊ शकतात, तिथेच त्यांचे राजकीय भविष्य ठरेल आणि सर्व गोष्टी स्पष्ट होतील. सरकारी सूत्रांनी या मुद्द्यावर बोलताना म्हटले की, स्टार्मर आपले काम करत आहेत. मात्र, ब्रिटनमध्ये मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. स्वतःच्या पक्षात स्टारमर यांच्यासाठी पुढील मार्ग सोपा दिसत नाही.

हाऊस ऑफ कॉमन्स (ब्रिटीश संसद) मधील लेबर पक्षाच्या जवळपास एक चतुर्थांश खासदारांनी म्हणजेच 100 हून अधिक निवडून आलेल्या प्रतिनिधींनी उघडपणे त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. ज्यामुळे त्यांच्या खुर्चीवर मोठा धोका आहे. थेट त्यांचे खुर्ची जाण्याची शक्यता आहे. त्यामध्येच आता कीर स्टार्मर राजीनामा देणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. काही तासात सर्वकाही स्पष्ट होऊ शकते.

Follow Us