
Thailand And Colombia War : सध्या जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही संपलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध संपवण्यात यश मिळवले आहे. परंतु अजूनही हमास आणि इस्रायलमधील तणावाची स्थिती पूर्णपणे निवळलेली नाही. चीन आणि जपान यांच्यातही वेगवेगळ्या मुद्द्यांवरून वाद सुरू आहे. असे असतानाच आता जगापुढे नव्या युद्धाने डोके वर काडळे आहे. थायलंड आणि कंबोडिया हे दोन्ही देश एममेकांविरोधात आक्रमक झाले असून मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा संघर्ष असाच चालू राहिला तर जगापुढ नव्या युद्धाचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशाचे सैनिक एकमेकांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करत आहेत. अमेरिकेच्या मध्यस्थीने त्यांच्यात शस्त्रसंधी करार घडवून आणण्यात आला होता. परंतु या संघर्षानंतर थायलंडने आपल्या बाजूने शस्त्रसंधीचा करार संपूष्टात आणला आहे. त्यामुळे आता हे युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. थायलंडच्या लष्काराच्या माहितीनुसार कंबोडियाच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात थायलंडचा एक सैनिक मारला गेला आहे. कंबोडियाच्या हल्ल्यानंतर थायलंडनेही प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला आहे.
दोन्ही देशांतील या तणावाबद्दल थायलंडच्या लष्करातील मेजर जनरल विंथाई सुवारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार थायलंडमधील चोंग अन मा या प्रदेशाजवळ कंबोडियाच्या सैनिकांकडून गोळीबार केला जातो. तर कंबोडियाच्या दाव्यानुसार अगोदर थायलंडच्या सैनिकांनीच गोळीबार केला. त्यानंतर हा संघर्ष पेटला.
दरम्यान, हा संघर्ष पेटल्यानंतर थायलंडने कंबोडियाच्या सीमेजवळ असलेल्या गावातील 70 टक्के लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेत कंबोडिया आणि थायलंड यांच्यात शस्त्रसंधीचा करार घडवून आणला होता. परंतु आता या कराराला धुडकावून दोन्ही देश एकमेकांना भिडले आहेत. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.