चक्क वाळवंटात महाप्रलय, उंटही वाहून गेले, जनजीवन विस्कळीत

रियाध : वाळंवटात जिथे पाण्याच्या एक-एक थेंबासाठी दरदर भटकावं लागतं, तिथे पुरात वाळवंटातील जहाज म्हणजे उंट वाहून गेली. हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण सौदी अरेबियातील ही खरी घटना आहे. गेल्या आठवडाभरापासून तुफान बर्फवृष्टी आणि पावसामुळे नागरिकांचं जीवन तर विस्कळीत झालंच आहे, पण त्याची सर्वाधिक झळ ही प्राणीमात्रांना बसलीय. या अवकाळी वादळ आणि पुराचा मोठा …

चक्क वाळवंटात महाप्रलय, उंटही वाहून गेले, जनजीवन विस्कळीत

रियाध : वाळंवटात जिथे पाण्याच्या एक-एक थेंबासाठी दरदर भटकावं लागतं, तिथे पुरात वाळवंटातील जहाज म्हणजे उंट वाहून गेली. हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण सौदी अरेबियातील ही खरी घटना आहे. गेल्या आठवडाभरापासून तुफान बर्फवृष्टी आणि पावसामुळे नागरिकांचं जीवन तर विस्कळीत झालंच आहे, पण त्याची सर्वाधिक झळ ही प्राणीमात्रांना बसलीय. या अवकाळी वादळ आणि पुराचा मोठा फटका अर्थव्यवस्थेलाही बसला आहे.

सौदी अरेबियाच्या पूर्व भागातील ही सर्व परिस्थिती आहे. प्राण्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. उंटच्या उंट पाण्याच्या तडाख्यात वाहून गेलेत. ना त्यांना श्वास घ्यायला उसंत मिळाली, ना ही त्यांच्या मालकांना त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवता आलं.

पाण्याचे लोंढे हे एका मागून येत गेले आणि उंट हे एखाद्या काडीप्रमाणे वाहत गेले. काही उंटानी त्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात स्वत:ला वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण उभा राहावयास गेले की त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकत होती आणि त्यांची सारी धडपड व्यर्थ गेली. एका मागून एक उंट हे पाण्याच्या लोंढ्यात वाहत गेले.

अचानक निसर्गाने धारण केलेल्या या रौद्र रूपाने बिचारे मुकेप्राणी सैरभैर झाले. त्यांच्या मालकाने वेळीच धोका ओळखून त्यांना एका जागी एकत्र आणून उभं केलं. तसेच त्यांच्या सुरक्षेकरिता चारीही बाजूंनी लोखंडी बॅरीकेड्सदेखील लावले, मात्र तरीही पाण्याचे लोंढे येत गेले आणि एकापाठी एक उंट वाहत गेले आणि पाण्याच्या प्रवाहात भरकटले. 30 ते 40 उंट पाण्याच्या लोंढ्यात अडकले होते आणि सारेच्या सारे एकामागे एक पाण्याच्या लोंढ्यासह वाहत गेले.

दुसऱ्या ठिकाणी उंट मालकाने वेळीच धोका ओळखत, आपल्या जीवावर उदार होत तुफान पावसात आणि पाण्याच्या लोंढ्यातून वाट काढत आपल्या साथीदारांसह उंट सुरक्षित ठिकाणी नेले. अक्षरशः त्याने त्या वादळात आणि पाण्याच्या लोंढ्यातून वाट काढत उंटांना दामटलं आणि सुरक्षित ठिकाणी नेल्यावरच उसंत घेतली.

एवढेच नव्हे, तर त्यांच्या पाठोपाठ इतर 40-50 उंटांचा कळप मार्ग काढत गेला आणि त्यांचेही सुदैवाने प्रलयातून प्राण वाचवण्यात यश आलं. सौदी अरेबियातील नागरिकांनी स्वप्नातही विचार केला नसेल की वाळवंटासारख्या रूक्ष प्रदेशात पूर एवढं थैमान घालेल आणि उंट जे की त्यांचं वाळवंटातील जहाज म्हणून ओळखलं जातं त्याची अशी अवस्था होईल. या प्रलयात नागरिकांसह उंटच्या उंट वाहून गेले आणि अतोनात नुकसान झालंय. तर शहरात पाण्याच्या लोंढ्यांनी जनजीवन विस्कळीत झालं होतं. गाड्या आणि घरंही वाहून गेली.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *