जगावर आणखी एका युद्धाचे सावट, फायटर जेट्स-जहाजे सज्ज, चीन ‘या’ देशावर आक्रमण करणार?

China Taiwan Conflict: भारत-पाकिस्तान तणाव, इराण-इस्रायल युद्ध, इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध जगाने पाहिले आहे. आता आणखी एक युद्ध पेटण्याची शक्यता आहे. चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढला आहे. चीनने तैवानवर हल्ल्याची तयारी सुरू केली आहे.

जगावर आणखी एका युद्धाचे सावट, फायटर जेट्स-जहाजे सज्ज, चीन या देशावर आक्रमण करणार?
china taiwan conflict
| Updated on: Oct 18, 2025 | 3:24 PM

गेल्या काही काळापासून अनेक देशांमधील तणाव वाढला आहे. भारत-पाकिस्तान तणाव, इराण-इस्रायल युद्ध, इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध जगाने पाहिले आहे. आता आणखी एक युद्ध पेटण्याची शक्यता आहे. चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढला आहे. चीनने तैवानवर हल्ल्याची तयारी सुरू केली आहे. चीनने तैवानच्या समुद्रात लढाऊ जहाजे आणि फायटर जेट्स तैनात केले आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी समुद्रात 27 चिनी लष्करी विमाने आणि आठ जहाजे आढळून आले आहेत. यातील काही विमानवाहू नौका आणि जहाजांनी तैवानच्या हद्दीत प्रवेश केल्याचेही समोर आले आहे.

चीन-तैवान युद्ध सुरू होणार?

चीनच्या या हालचालींबाबत तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात मंत्रालाने म्हटले की, आज सकाळी 6 वाजता तैवानच्या आजूबाजूला 27 PLA विमाने आणि आठ PLAN जहाजे आढळून आली. यापैकी 19 विमानांनी मध्यरेषा ओलांडून तैवानच्या उत्तर, मध्य आणि नैऋत्य ADIZ मध्ये प्रवेश केला. आम्ही परिस्थितीचे निरीक्षण केले आणि योग्य उत्तर दिले.

चीनच्या अणु ताकद वेगाने वाढत आहे

शुक्रवारी चीनची जहाजे आणि विमाने आढळल्यानंतर आज (18 ऑक्टोबर) सकाळीही जे 16, केजे 500 अशी 21 विमाने दिसून आली. यातील 17 विमानांनी मध्य रेषा ओलांडून तैवानच्या उत्तर, मध्य आणि नैऋत्य एडीआयझेडमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर तैवानच्या अधिकाऱ्यांनी या घुसखोरीला योग्य प्रतिसाद दिला आहे. मात्र तैवानसाठी चिंतेचे कारण म्हणजे चीनची अणुताकद वेगाने वाढत आहे. जर इतर देशांनी हस्तक्षेप केला तर चीन अणुयुद्धाची धमकी देऊ शकतो. त्यामुळे तैवानची चिंता वाढली आहे.

चीनकडून तीन क्षेपणास्त्रांची चाचणी

गेल्या महिन्याच्या सुरुवातील चीनने तियानमेन स्क्वेअरमध्ये झालेल्या लष्करी परेडमध्ये तीन क्षेपणास्त्रे प्रदर्शित केली आहेत. यात जेएल-1, जेएल-3, डीएफ-61 या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. या क्षेपणास्त्रांच्या मदतीने चीन हवा, जमीन आणी पाण्यातूनही हल्ला करण्यास सक्षम आहे. त्यामुळे चीनची ताकद वाढली आहे. यामुळे आता आगामी काळात चीन आणि तैवान यांच्यात युद्ध झाल्यास इतर कोणताही देश मध्यस्थी करण्याची शक्यता कमी आहे.