धरतीच्या खाली सापडलं अजब जीवन, भूकंप येताच मिळते ताकद; नव्या शोधाने सगळेच अवाक्!

या पृथ्वीतलावर बऱ्याच अजब आणि अचंबित करणाऱ्या गोष्टी आहेत. पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. मात्र या विश्वात पृथ्वीव्यतिरिक्त अन्य काही ठिकाणी जीवसृष्टी आहे का? याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. विशेष म्हणजे काही सास्त्रज्ञांना पृथ्वीव्यतिरिक्त अन्य ग्रहांवर जीवसृष्टी आहे, असे वाटते. विशेष म्हणजे दूर कुठेतरी एलियन्सही वास्तव्य करतात, असे दावे रोज केले जातात.

धरतीच्या खाली सापडलं अजब जीवन, भूकंप येताच मिळते ताकद; नव्या शोधाने सगळेच अवाक्!
prokaryotes living in deep earth
| Updated on: Aug 05, 2025 | 10:01 PM

या पृथ्वीतलावर बऱ्याच अजब आणि अचंबित करणाऱ्या गोष्टी आहेत. पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. मात्र या विश्वात पृथ्वीव्यतिरिक्त अन्य काही ठिकाणी जीवसृष्टी आहे का? याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. विशेष म्हणजे काही सास्त्रज्ञांना पृथ्वीव्यतिरिक्त अन्य ग्रहांवर जीवसृष्टी आहे, असे वाटते. विशेष म्हणजे दूर कुठेतरी एलियन्सही वास्तव्य करतात, असे दावे रोज केले जातात. दरम्यान, आता चीनच्या शास्त्रज्ञांनी एक अनोखा शोध लावला आहे. अन्य ग्रहांवर नव्हे तर पृथ्वीच्या खोल पोटात एक वेगळं जीवन आहे, असा दावा या शास्त्रज्ञांनी केलाय. चीनच्या शास्त्रज्ञांच्या या शोधाची आता जगभरात चर्चा होत आहे. विशेष म्हणजे पृथ्वीचं हे रहस्य समोर आल्यानंतर आता त्याचा मानवी प्रगतीसाठी काय उपयोग होतो? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

नेमका शोध काय लागला आहे?

मिळालेल्या माहितीनुसार चीनच्या वैज्ञानिकांनी कॅनडाच्या वैज्ञानिकांच्या साथीने एक मोठा शोध लावला आहे. पृथ्वीच्या पोटात खोल अंधारात जीव आहेत, असं या संशोधकांना समजलं आहे. विशेष म्हणजे खोल पृथ्वीत राहात असलेल्या जीवांना भूकंपापासून ऊर्जा मिळते, असे या संशोधकांचे मत आहे.

खोल भूगर्भात राहतात हे जीव

आतापर्यंत पृथ्वीच्या खोल जीवन अस्तित्त्वात नाही, असे मानलेज ता होते. मात्र नुकत्याच केलेल्या संशोधनातून भूगर्भात कित्येक किलोमीटर खोलवर जीवन आहे, असे समोर आले आहे. या शोधातून भूगर्भात खोलवर प्रोकॅरियोट्स राहतात. तसेच प्रोकॅरियोट्स हे एकपेशीय जीव असतात.

भूगर्भात सूक्ष्मजीव कसे जिवंत राहतात?

चीनच्या गुआंगझोऊ इन्स्टिट्यूट ऑफ जिओकेमिस्ट्रीचे प्राध्यापक झू जियान्सकी आणि हे होंगपिंग तसेच अल्बर्टा व्हिव्हीचे प्राध्यापक कर्ट कोनहॉसर यांनी भूगर्भात कित्येक किलोमीटर खोलीवर सूक्ष्मजीव कसे जिवंत राहतात याचा शोध घेण्यााच प्रयत्न केला. त्यांचे हे संशोधन सायन्स अॅडव्हान्सेज जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले. खोल भूगर्भात भूकंपीय घडामोडी घडतात त्यामुळे या सूक्ष्मजीवांना ऊर्जा मिळते. याच्याच मदतीने हे जीव जगतात, असे या संशोधकांचे मत आहे.