करामती पोरगी… डॉक्टरीपेक्षा भंगारातून सर्वाधिक कमावते; पगार ऐकून हैराण व्हाल

चीनमधील 26 वर्षीय एका महिला डॉक्टरची कहाणी अलीकडेच चर्चेत आली आहे. ती एका खासगी रुग्णालयात काम करते आणि फक्त 46,000 रुपये पगार मिळवते. परंतु, ती पार्ट-टाइम तिच्या आई-वडिलांच्या भंगार रिसायकलिंग स्टेशनवर काम करून 50,000 ते 60,000 रुपये कमवते. तिच्या कमाईची ही तुलना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तिची कहाणी चर्चेत आली आहे.

करामती पोरगी... डॉक्टरीपेक्षा भंगारातून सर्वाधिक कमावते; पगार ऐकून हैराण व्हाल
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: May 31, 2025 | 3:55 PM

एक मुलगी व्यवसायाने डॉक्टर आहे. तिने वैद्यकीय शिक्षण घेतलं. या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले. त्यानंतर तिने एका चांगल्या रुग्णालयात नोकरीही पत्करली. पण पाहिजे तेवढी मिळकत होत नव्हती. आता डॉक्टरीतून जेवढी कमाई होत नाही तेवढी ती पार्ट टाइम भंगार विकून कमावते. हे ऐकून तुम्हाला थोडसं विचित्र वाटेल. पण वास्तव हे आहे की ही मुलगी डॉक्टरीपेक्षा भंगारातून अधिक पैसा कमावते. चीनमधील एका महिला डॉक्टरची ही कहाणी आहे. ती रुग्णालयात काम डॉक्टर म्हणून काम करते. पण कामावरून आल्यावर ती कचरा एकत्र करू लागली.

या मुलीचे आईवडील एक रिसायक्लिंग स्टेशन चालवतात. रुग्णालयातून आल्यावर ती रिसायक्लिंग स्टेशनवर काम करते. भंगार एकत्र करणे, त्याला रिसायक्लिंग स्टेशनवर नेऊन त्याचं वर्गीकरण करण्याचं काम ती करते. मुलगी घरातील कामातही मदत करत असल्याने आईवडील तिला पॉकेटमनी देतात.

भंगारातून अधिक मिळकत

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्यानुसार, या महिला डॉक्टरने तिला भंगारातून अधिक कमाई होत असल्याचं सांगितलं. माझे आई वडील भंगाराचं काम केल्याबद्दल मला जो पॉकेटमनी देतात तो माझ्या डॉक्टरकीच्या पगारापेक्षाही अधिक आहे. मला रुग्णालयात फक्त 4,000 युआन (46 हजार रुपये) मिळतात. तर माझे आईवडील मला भंगाराचं काम केल्याबद्दल सुमारे 50 ते 60 हजार रुपये देतात.

तरुणीची गावभर चर्चा

26 वर्षीय या डॉक्टर तरुणीचं नाव जिओंग आहे. दक्षिण पश्चिम चीनच्या सिचुआन प्रांतातील चेंग्दूमध्ये एका छोट्या खासगी रुग्णालयात ती फुल टाइम राहते. शियाओशियांग मॉर्निंग हेराल्डच्या रिपोर्टनुसार, त्यांनी रिसायक्लिंग स्टेशनवर आपल्या दैनंदिन कामाचा एक व्हिडीओ चिनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यात तिने रुग्णालयातून मिळणारी सॅलरी आणि भंगारातून होणाऱ्या कमाईची तुलना केली होती. त्याची आता चर्चा सुरू झाली आहे.

रिसायक्लिंग स्टेशनवर फक्त तीन ते चार तास

जिओंग रुग्णालयात सकाळी 8 वाजता जाते. संध्याकाळी 5.30 वाजता तिची ड्युटी संपते. कामातून सुटल्यावर ती थेट भंगार रिसायक्लिंग स्टेशनवर जाते. तिचे आईवडील हे स्टेशन चालवतात. जिओंग या ठिकाणी भंगार एकत्र करून त्याचं वर्गीकरण करते. भंगाराची ने-आण करते. तसेच हे भंगार विकण्यास मदतही करते. रात्री 9 वाजता काम संपवून ती घरी येत असते.